#lingering faces
कामावर जाणारी आई नेहमी धास्तावलेली असते .
कितीही चोख व्यवस्था केली , तरी तिच्या मनात मुलांच्या सुरक्षिततेची धाकधूक असतेच .
हि धाकधूक कुठल्याही स्तरातील आई ला चुकत नाही , याचा एक हृद्य प्रत्यय नुकताच आला .
स्थळ होतं मुंबईतील एक अद्ययावत बँक्वेट हॉल . निमित्त होतं तिथे पार पडलेलं एक कौटुंबिक लग्न कार्य .
दोन दिवस त्या कार्याकरिता लग्नघराकडून बुकिंग झालं होतं .
हॉल च्या लेडीज वॉशरूम मध्ये २ संध्याकाळी मला विलक्षण दृश्य पाहायला मिळालं .
वॉशरूम ची एकमेव लेडीज अटेंडंट आपल्या ७/८ वर्ष्यांच्या मुलाला बरोबर घेऊन ड्युटी वर येत असे आणि वॉशरूम अटेंड करत असे . तिची ड्युटी बहुदा २ऱ्या शिफ्ट मध्ये असावी . पूर्ण संध्याकाळ ती व तिचा लेक वॉशरूम मध्ये बसून असत .
एरवी आपल्या डोळ्यांना लेडीज अटेंडंट ची उपथिती बोचा यचं काही कारण च नाही . किंबहुना ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं . वॉशरूम ची चकचकीत स्वच्छता त्यांच्या उपस्थितीने अधोरेखित च होत असते .
पण या वेळी हे माय लेक पाहून आत कुठेतरी चर्र होत होतं .
पूर्ण २ संध्याकाळ जवळपास ६ ते रात्री १० आमचा त्या हॉल मध्ये वावर होता . अधून मधून २/३ दा तरी त्या वॉशरूम मध्ये चक्कर टाकायला लागत होती .
दर वेळी आत गेल्यावर ते छोटुकलं लुकलुकत्या नजरेनं आल्या गेल्या कडे बघत बसे . तोच त्याचा विरंगुळा . वॉशबेसिन च्या लांबलचक कठड्यावरच्या एका कोपऱ्यात शांत बसून त्याचं निरीक्षण चालू असे .
ते त्याचं शांत बसणं ,..... ......
दार ढकलून कुणी आत आलं ,
कि नवं खेळणं मिळाल्यागत त्याच्या चेहऱ्यावरची रेष बदलणं ... ..... .
आतल्या आत कालवाकालव करून जात असे .
एका खेपेला माझा आई ला वॉशरूम मध्ये सोबत करायला गेले . त्या वेळी आईने तिची कवळी तोंडातून काढली , बेसिन मध्ये नळाखाली धुतली व परत तोंडात बसवली .
अशी विलक्षण गम्मत त्या छोट्याने बहुदा पहिल्यांदाच पहिली असणार . अतिशय आश्चर्याने त्याने आपल्या आईशी त्या बाबतीत केलेले हितगुज पाहून आम्ही त्याला हसून पोच दिली . त्यावर भयंकर कॉन्शस होऊन अशक्य लाजला तो छोटू .
अश्या कित्येक संध्याकाळी ते पोरगं आईच्या ड्युटी च्या या जागेवर घालवत असेल . त्याच्या कित्येक बालसुलभ क्रिया संध्याकाळी मोकळ्या हवेत खेळण्या बागडण्या ऐवजी या बंदिस्त जागेत विरून जात असतील .
निम्न स्तरातील असून देखील त्याच्या सजग आईच्या दक्षतेचं कौतुक करावं कि तिच्या हतबलतेची कीव करावी हे मात्र न सुटलेलं कोडं आहे .