#टेढ़ा हैं पर मेरा हैं#
तुझ्याकडे काय 'गुण 'आहेत म्हणून तू व्यवसाय करायचं ठरवलंस ?
व्यावसायिक म्हणवून घ्यायचं असेल तर नुसतं -
डिस्टिंक्शन ने डिग्री मिळवून थोडंच भागतं ? इमाने इतबारे नोकरीची उमेदवारी करून सर्व प्रकारच्या कामाचा रग्गड अनुभव गाठीशी असून थोडंच भागतं ?
स्वभावाचं काय ? पैशासारखा त्याचा देखील आव आणता येत नाही .
तुझा सरळमार्गी स्वछ रोकठोक स्वभाव इथे काय कामाचा ?
इथे हवी गोड बोलून अलगद गळा कापायची वृत्ती . तत्व - बित्व गुंडाळून समोरच्याला ( त्याला कळू न देता ) जास्तीत जास्त गंडवायची 'हुशारी ' .
तुझं काय चालू असतं भलतंच ? परोपकारी गंपू च कि नाही तू . धावून धावून दुसऱ्याची सोय आधी पाहणाऱ्याला 'नफेखोरी 'कशाशी खातात हे कसं कळणार ?
बरं हे कमी म्हणून कि काय ....... ती गेंड्याची कातडी किंवा मगरीचे अश्रू का काय म्हणतात ती साधनं सुद्धा तू बाळगत नाहीस .
दुसऱ्याचं दुःख पाहून जीव कळवळतो तसंच समोरच्याने केलेला वार देखील जिव्हारी लावून घेतोस . म्हणजे आणखी दुष्काळात तेरावा महिना .
न तुला दर तीन वर्षांनी कार ची मॉडेल्स 'बदलता ' आली , न स्वतःला किंवा फॅमिली ला दर वर्षी फॉरेन टूर 'घडवता ' आली . हो एक फार्महाउस तेवढं बांधलस , पण ते देखील चैनी पेक्षा मित्रांच्या सहवासाच्या ओढीनं .
हो....... शांत झोपेची श्रीमंती मात्र तुझ्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही .
तरी मी तुला सारखी म्हणत असते .... ...... ....... ........
"दुनिया ने कितना समझाया , कौन हैं अपना कौन पराया ,
फिर भी दिल की चोट छुपाकर , हम ने आपका दिल बहलाया ,
खुद ही मर मिटने की ये ज़िद हैं हमारी ............
सच हैं दुनियावालों के हम हैं अनाड़ी "
या ओळी तुला चपखल बसतात . असो.
सरळमार्गी पिंड आणि संवेदनशील मन हा डेडली कॉम्बो असलेलं दान ( कि ध्यान ?) देवाने माझ्या पदरात घातलंय . त्याच्या दुर्लभतेची जाण आणि अपूर्वाई जगाला नसली तरी मला आहे .
त्या पायी अधे मध्ये तुझी पंचिंग बॅग होणं , empathiser होणं , आणि सतत तुझं मोराल बूस्ट करत राहणं एवढच माझ्या हातात आहे . माझ्यात क्षमता असल्याशिवाय मी ह्या रोल मध्ये आलेच नसते हा विश्वास मला आहे .
कधी परखड मत व्यक्त करेन ......
कधी काळजीने अर्धमेली होईन......
कधी ' आता काय करू मी या माणसाचं ' या टोकाला पण जाईन.....
पण शेवटी दर वेळी ...... समजून हि मीच घेईन .