- मीनल.
Sunday, March 17, 2019
एका नाटकाची गोष्ट
- मीनल.
Tuesday, March 12, 2019
रिक्षापुराण
#रिक्षापुराण#
ऑटोरिक्षा चालक संघटना, पुणे ,वार्षिक सभा.
नमस्कार मंडळी.....
"आजच्या सभेमधी आपल्या तरूण चालक संघटनेचे बच्चू भाऊ तेंचे मणोगत सांगनारै, तैंच्या सूचना आपल्या भावी चालकां साटी फायद्याच्या पडतील. या बच्चू शेट ."
" भाऊ राम राम , आज मला येवड्या शिनिअर लोकांमदे बोलायला भेटलं .....
थँक यु बरका .
तर मॅटर बिटर काय नाय , येक दोन सूचना बोलतो. पयले म्हंजे आपली गाडी जर खाली असल तर तसा शिग्नल बसवायचा ......
च्या मायला मागून पीर पीर करनारे गप तरी बस्त्याल . ते नाय का हाटील मंदी रूम भायेर डिशटर्ब् करू नका असलं कार्ड दावंत्यात टीवीत , तसलं कार्ड पण भेटलं तर कामच झालं . येकदा का शिग्नल अन कार्ड बशिवलं का .........हे मनमौजी गत रस्ता अडवून गेलं तरी कोन काय बोलल !.
" आर काय बोलतुस " " डोसकं हाय का ठिकानावर ?"
" भाऊ, ऎका तर आनी पुढं .....
दुसरं म्हंजी आपल्या हार्न ला भारीतला शेंशर लावू . "
"आं , तेचं आनि काय करायचं ?"
"ऎका कि , आता ते लेडीज आन पोरी तोंडाला वाढनी बानत्यात आन फुल्ल स्पीड मारून आपल्या गाडी पुढं जात्यात , तवा पार डोस्क्याला शॉट बसतो.......
आता त्या शेंशर न काय व्हतंय , येकदा का त्या शिग्नल आन ट्राफिक ला थांबल्या , का अटोमॅटिक फुल व्हाल्यूम हार्न वाजल आन आपल्या बोटाला आराम भेटल . "
" आर ए बाबा , चल बास झालं तुझं . धंदा बशिवशिल आमचा . "
" बास का भाऊ , अजून म्हत्वाच हाय ना ...... शिग्नल लागला का नाय , का आपुन गाडी च्या साईड ला दुसरी गाडी येऊ द्यायची नाय रिक्षा सोडून . "
" आता दर टायमाला ते आन कसं जमायचं ? आन का वो शेट ते तरी बोला ?"
" हां मंग , आता तोंडातलं थुकायला शिग्नलच भेटतो कि आपल्याला . तिकडं पन दुसरे गाडीवाले असं बगत्यात का त्येंच्या अंगावरच थुकतोय , आता रिक्षावाला असल साईड ला तर समजून घेतंय , दोगांचं बी काम भागतंय , न्हाई का !"
" झालं का , का हाय अजून काय तुजं ?"
" ओ भाऊ , थांबा कि, लाष्ट बोलू द्या .
आता स्टॅन्ड म्हंजी घरच कि आपलं दुसरं . आता तिकडं पेपर हाय, पानी हाय , पन वाय फाय कुटंय ? चार्जिंग पाईंट कुटंय ? ते तर मश्ट हाय आताच्याला .
आनी येक , आता स्टॅन्ड वर आपन बसतोय, जमतोय , गप्पा होत्यात , ते बी पाशिंजर ला बघवना . आता म्हनलं कुनाला न्हाई ट्रिप ला , तर काय कालवा करत्यात . जनु ते मालक अन आपन शेवक .
शिनेमात कुणी न्हाई म्हणताना दाखिवलं तर पाशिंजर त्यो शिनेमा डोक्यावर घेत्यात . अमिताभ बोलतो का नई " पिंक " शिनेमात " नो म्हंजी नो " तर भारी वाटतं का न्हाई त्येंना , मंग आमाला पन नो बोलायचा हक्क पायजेल . "
" बच्चू शेट , लै बोल्लात .
कसंय दिस बदलत्यात त्ये निसते मोबाईल पायी न्हाई, तर तुमच्या इचारांनी पन .
ओला , उबर ची नावं आमच्या बी कानी आलीत . त्ये लांबच्या साईड लाच न्हाई हितल्या हित पन करतात पाशिंजर .
आन सायकली पायल्या का नई, येक येक रुपयाच्या .
लोक धावत्यात , पळत्यात सायकली चालवत्यात , तब्बेत कमवत्यात .
तुमच्या नादी लागायला त्येंचा काय अडत नाय तुमच्या बिगर . जरा पैसा आला का बस न जाणारं पब्लिक लागलीच स्कुटर घेत्यात .
आज मला येकच बोलायचंय ,
आमचं दिस नई राहिलं ,
लै माज केला, पन तेवा चालून गेलं ,
आता तुमी पुडचे लोक ......
मापात ऱ्हावा तर मापात भेटल ."
- मीनल.
Friday, March 8, 2019
झगडे
नेहमीचेच, तरीही तगडे
एक स्वतःशी, एक जगाशी
खुळच ते, कवटाळले उराशी
बेसावध जीवास पकडीत घ्यावे
याचे पाहावे कि त्याचे ऐकावे
मी मी म्हणती दोन्ही बापडे
आतला भुंगा सदैव भुणभुण करी
आधी त्यालाच सामोरे जावे
आपलाच आहे, समजावून सांगावे
लावतील बोल, आणतील वात
आतले शमले तसेच बाहेरचे हि विझेल
दोघांना केले माफ तर प्रश्नच मिटेल.
- मीनल देवस्थळे