#आम्ही पेठी#
आपण कुठे जन्म घ्यावा हे जसं आपल्या हातात नसतं तसंच आपण कुठल्या पत्त्यावर राहावं हे देखील कधी कधी आपल्या हातात नसतं . एखाद्याला त्याच्या पत्त्यावरून जज करणारी माणसं अनुभवली कि मौज वाटते . अमुक पत्त्यावर राहणारी उचभ्रु किंवा तमुक पत्त्यावर राहणारी सबर्बन आणि ठराविक पत्त्यावर राहणारी पेठी हे किती सहज बोलून जातो आपण .
अमुक अमुक पत्त्यावर राहिलो म्हणजे आपण मॉडर्न . अमुक एका गोतावळ्यात वावरलं , अमुक प्रकारचा पेहराव केला , आपल्या राहत्या पत्त्याला साजेशी बाह्य जीवनशैली अंगिकारली म्हणजे आपण फॉरवर्ड झालो असा काहींचा समज होत असावा . या उलट आमच्यासारखे पत्ताच तो असल्याने पेठी चा शिक्का आणि त्यावरून इतरांची टीका या दोन्ही गोष्टी झेलणारे .
आम्ही मंडईत जाऊन भाजी आणतो , आम्ही ब्रह्मवृंद गुरुजींचे आमंत्रण न चुकता स्वीकारतो , दोन चारच पण व्रत वैकल्य करतो , सहकुटुंब बादशाही मध्ये जेवायला जातो , शक्यतो २ चाकीनेच ये जा करतो , पिढ्यान पिढ्या चालत आलेली नाती आणि मैत्री अभिमानाने मिरवतो - या आणि अशा आमच्या टिपिकल पेठी सवयी .
यातील काही सवयी आमच्या बालपणीचा ठेवा आहेत , काहींमुळे घरात चैतन्य आणि प्रसन्नता भरून राहते , गावाच्या वेशीवर राहत असल्यामुळे २ चाकी वापरणे हा अतिशय व्यावहारिक चॉईस असतो , ज्या वास्तू ची विशिष्ट चव जिभेवर रेंगाळते तो मेस असला तरी आम्हाला त्याने काही फरक पडत नाही .
पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मैत्रीनेच आजवर रात्री बेरात्री हाकेला ओ देऊन आम्ही आहोत' हा दिलासा दिलेला आहे . '
आमच्या या पेठी जीवनशैली चे हे नुसते वरवरचे चित्रण देऊन मी थांबणार नाहीये . त्यातील अंतरंग हि तितकेच रंजक आहेत .
माझ्या आजारी आई वडिलांना त्या त्या वेळी उपचारादरम्यान माझ्या याच पेठी घराने घरात सासरे असताना सुद्धा काही महिने ते वर्ष सामावून घेतलंय . हि शक्यता सो कॉल्ड उच्चभ्रू आणि उपनगरीय घरांमध्ये आजही स्वप्नवत आहे .
माझा पेठी नवरा मला स्वैपाकात घरकामात हर प्रकारे मदत करतो , मला माझ्या वर्तुळात वावरताना त्याचे कसलेच दडपण नसते . माझे मित्र त्याला इंसेक्युर करत नाहीत . तो माझ्याशी सर्व प्रकारचे वैचारिक आणि भावनिक शेअरिंग करतो . पाळी शी निगडित सर्व धार्मिक निर्बंध झुगारायला त्याने मला प्रोत्साहन दिले आहे . त्याला अनेक मैत्रिणी आहेत . ज्यांच्याशी तो गाठी भेटी चॅटिंग सगळं मला सांगून सवरून करतो . कारण जिथे मनात खोट असते तिथेच माणूस लपवतो . नुकतंच त्याने सावनी च्या नावातील मधले नाव बदलून माझे नाव घातले . तो माझ्या आई बाबांची वेळोवेळी आर्थिक जबाबदारी घेतो.
आजवर नवरा बायको च्या नात्यात अनेकदा आम्ही भांडलो , टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या . पण ती त्या त्या वयातली अपरिपक्वता होती. या माझ्या पेठी नवऱ्याने कालांतराने आपल्या स्वभावातील उणिवा ओळखल्या , त्या मुळात आहेत हे स्वीकारलं , त्यावर काम करून स्वतःला जमेल तितकं रिफाईन केलं . हल्लीच्या भाषेत त्याला अचिंविंग कपल गोल्स असं गोंडस नाव आहे .
तर असे हे आम्हा पेठी न चे अंतरंग. त्यात डोकावून पाहणाऱ्याला लक्खपणे काहीतरी नक्कीच गवसेल . आचार विचार आणि व्यवहारात इतरांना लाजवेल असं पुरोगामीत्व वेळ प्रसंगी अंगिकारायला पत्ता कधीच आड येत नाही हे तरी निश्चित उमजेल .