#केहनेको_बहोत_कुछ_था#
कुणीतरी विचारलं कि बऱ्याच दिवसात नवीन काही लिहिलं नाहीस का बरं ?
खरंच, विषय संपले , शब्द गोठले कि जी अल्प प्रतिभा होती ती आटली ?
प्रतिभा म्हणा किंवा उर्मी म्हणा ती आत धगधगत असतेच . विषय तर रोज हरघडी आदळत असतात . एखाददुसरी विशेष घटना घडताच त्यातले एक एक पदर बाजूला सारत त्यातील अनेक कंगोरे , सूक्ष्म धागेदोरे लक्ख सामोरे येत राहतात .
हो , शब्द मात्र अशावेळी हमखास गोठतात .
कधी त्यावर वाढीव जबाबदारीचा दबाव पडतो म्हणून किंवा अजून कशाने पण शब्द फुटेनासे होतात खरे .
आपण स्वस्थ नसतोच आतून , खूप काही घडत असताना आपली कामे यांत्रिक पणे होत राहतात , पण डोक्यात विचारांचा उद्रेक चालूच असतो एकीकडे . मग सावकाश वेळ मिळतो , सगळ्या कल्लोळाकडे तटस्थ पणे बघत असताना , विचारांचा गुंता सोडवत असताना , एकेका घटनेचे अवलोकन करत असताना चित्र सुस्पष्ट होत जातं , पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळालेली असतात , पण हात मात्र थबकलेलेच राहतात .
लिहावं कि न लिहावं या द्वंद्वात अडकून पडलेले असतात .
घडामोडीं चा वेग इतका प्रचंड असतो कि त्या सोबत लोकांच्या प्रतिक्रिया , सवयी , सल्ले सर्व झेलता झेलता प्रचंड मानसिक थकवा जाणवतो पण काही केल्या लेखणीत मात्र उतरत नाही . ज्या लेखणीमुळे मन मोकळं होतं त्याच लेखणी मुळे आपल्या माणसांबद्दल आजवर वाटलेली काळजी , तळमळ , त्या साठी केलेले निस्पृह प्रयत्न एका क्षणात मातीमोल ठरू शकतात .
"केहनेको बहोत कुछ था अगर केहने पे आते
दुनिया कि इनायत हैं के हम कुछ नहीं केहते
कुछ केहने पे तूफ़ान उठा लेती हैं दुनिया
अब इसपे कयामत हैं के हम कुछ नहीं केहते
उनको ये शिकायत हैं के हम कुछ नहीं केहते "
- मीनल