हे ही वर्ष संपले. अशी अजून किती भयभीत वर्षे जाणार कुणास ठाऊक? युगं लोटली तरी स्त्रीचा निर्भयतेकडे प्रवास अजून संपलेला नाही. स्त्रीजन्म , मग तो कोणत्याही वातावरणात झालेला असो, मागास किंवा प्रगत, आपल्यासोबत आयुष्यभर साथ करणारी भिती घेऊनच येतो. ही भिती असते छेडले जाण्याची, पाठलाग होण्याची, घाणेरड्या स्पर्शाची, चीरहरण करणार्या भेदक नजरेची, हल्ला होण्याची, मारले जाण्याची, ॲसिड ने विद्रूप होण्याची. कधी कुठल्या वयात, कपड्यात, वेळेत, कोणा ओळखी, अनोळखी व्यक्तीच्या रूपात ही भिती येऊन आदळेल हे सांगता येत नाही. सर्व खबरदारीचे उपाय आपणच करायचे . ही यादी लांबलचकहोत राहील, पण ही भिती निर्माण करणारी मानसिकता कधी संपेल? प्रवास सुरूच आहे