Wednesday, February 26, 2020

Swapratima

आपल्या जन्माचा सोहळा होतो, बालपण देखिल कोडकौतुकात न्हाऊन निघतं.  पण मोठे होत जातो तसतसे या कौतुकाची किंमत मोजावी लागते.  परीक्षेत यश मिळवले तर शाबासकी,  करिअर मार्गी लागले तर कौतुकास पात्र. पैसा असला तर समाजात मान.

आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीत लहानाचे मोठे होतो, त्यानुसार आपली स्वप्रतिमा तयार होत जाते. अखंड मायेची पांखर मिळालेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा अतिशय बळकट असते. या उलट मायेची तहान न भागलेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा खालावलेली असते.  अशा व्यक्ती येन केन प्रकारे ही तहान भागवण्यासाठी झटत राहतात.  स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देत,  लोकांना  मदत करण्सायाठी सतत धडपडत मिळालेल्या चार कौतुकाच्या शब्दांनी आपली तडा गेलेली स्वप्रतिमा सांधायचा यांचा सतत प्रयत्न असतो.

माझीही स्वप्रतिमा काही फारशी बरी नव्हती.  हे चित्र बदललं वयाच्या 25 वीशी नंतर. स्वतःला काय हवं ते नेमकं कळल्यावर, त्या करता योग्य पावले उचलून यशाची चव चाखल्यावर या स्वप्रतिमेत अनुकूल बदल घडत गेले. आता 40 शी पार केल्यावर मनात अपार शांतता आहे. कुणाला मी आवडो न आवडो, मला काही फरक पडत नाही, मला मी आवडते हेच पुरेसं आहे.

कुणाला काही पटवून द्यायचं नाही,  कुणावरही छाप पाडायची नाही. मी जशी घडत इथवर आले या प्रवासाचा मला अभिमान आहे.  मी कधीच ओढून ताणून मैत्री केली नाही,  निव्वळ एखाद्या गटाचा भाग व्हावं म्हणून कधी भिशी ग्रुप जाॅईन केला नाही,  घरी दरी त्यागमूर्ती बनत बसले नाही. सुपरवुमन या गोंडस नावाने कधी मला भुलवलं नाही आणि बाह्यरूप तर अट्टाहासाने कधीच मिरवलं नाही.

मला जो पेहराव कमफर्टेबल वाटतो तो मी करते, घड्याळ आणि चष्मा हेच माझे दागिने आहेत, बदलणारे फॅशन ट्रेंड्स मला अस्वस्थ करत नाहीत,  त्यातलं जे आवडेल आणि सोयीचं असेल तेच मी अंगिकारते. माझ्यासाठी फॅशन आहे,  फॅशन साठी मी नाही.

या अंतर्मनातल्या क्लॅरिटीचा लिहायला सुरुवात केल्यावर तर मला फारच उपयोग झाला. काय होतं,  एकदा का सोशल मीडिया वर व्यक्त व्हायची चटक लागली कि मिळ्णर्या लाईक्स,  कमेंट्स कडे आपलं लक्ष असतंच ते कोणाला सुखावणार नाहीत. पण आपलं लिखाण सर्वांना आवडायलाच हवं असा काही माझा अट्टाहास नाही. लोकांना वाचायला वेळ, गरज किंवा ईच्छा असतेच असं  नाही,  वाचलं तरी सगळ्यांना ते रुचेल आवडेल असं नाही. अगदी आवडलं तरी लाईक,  कमेंट आणि फाॅलो करायचं का नाही हा ही अधिकार त्यांना आहेच त्यामुळेच लाईक्स किंवा फाॅलोवर्स नाही मिळाले तरी मला काही फरक पडत नाही.  मी लिहितेच मुळी स्वान्त सुखाय,  त्याउपर जे वाट्याला येईल ते बोनस मानून घेते.

प्रत्येकाकडे आरसा असतो, त्यात तुमच्या प्रतिमेवर काही डाग दिसले तर जरूर पुसा,  स्वतःला असं अधूनमधून निरखून पाहणं कधीही चांगलंच,  आपली तुलना स्वतःशीच करून आपली अधिकाधिक सुधारित आवृत्ती काढायची एकही संधी दवडू नका. पण आपल्या मनाने कौल दिलेला नसेल तर दुसर्या कोणाही करता स्वतःला बदूल

Vyavhar ki naate

आज लेक अवेळी आलेली पाहून सुनीतीताई चक्रावून गेल्या. रोज मुलांभवती फिरणारं टाईट शेड्यूल सहसा न चुकवणारी लेक आज मधल्या वारी माहेरी कशी काय अवतरली बरं? बोलेल आपोआप , उगाच शंका नको काढायला. फार वाट बघावी लागली नाहीच. चहा पाणी आटपल्यावर स्वाती ने आईजवळ मुद्द्याला हात घातला.  " आई, अगं दादाचे काय चालू आहे सध्या? काम धंदा बंद करून,  घरी बिरी बसला नाही नं? आईच्या चेहर्यावर न कळल्याचा भाव बघत स्वाती पुढे बोलत राहिली. " दादाची व्यवसाय भागीदारी संपुष्टात आली आहे ते मागे बोलला होता तो. पण बाकी काही नवीन काम चालू आहे कि नाही सध्या?पुष्कळदा घरी दिसतो म्हणून विचारलं. बाकी काही खटाटोप करताना दिसत नाही. ह्यांनी सुद्धा ऑफर दिली होती एका प्रोजेक्ट ची पण नको म्हणाला दादा. "
आता सुनीतीताई ना लेकीच्या येण्यामागचं प्रयोजन समजलं. जावयांनी बातमी काढायला पाठवलं होतं तर. त्यांनी दिलेल्या प्रपोजल बद्दल त्यांना कल्पना होती पण एकदा लेकाने नकार दिला म्हटल्यावर पुन्हा तो विषय काढला नाही.  आपल्या लेकाबद्दल स्वानंद बद्द्ल त्यांना पूर्ण खात्री होती. लेकाने आजवर घेतलेल्या सगळ्या निर्णयाबद्दल  त्यांना समाधान होतं. स्वानंद धडाडीचा होता. सर्व शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून वर्षभर त्याने नोकरीचा अनुभव घेतला. नंतर भागीदारी करून आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.  7/8 वर्ष चांगले स्थिरावण्यात गेली. नंतर मात्र भागीदारीत गैरसमजातून वितुष्ट यायला लागले.  स्वानंद ला पुढल्या अडचणींची चाहूल लागताच तो सावध झाला.  एका निर्णायक क्षणी भागीदारी वेळीच  स्थगित करण्याचे ठरवून पुढे येऊ शकणार्या आर्थिक अडचणी वेळीच रोखल्या.  आता छोट्या प्रमाणात पण एकट्याने स्वतंत्रपणे तो कामं करू लागला.  एकूणच मंदी असल्याने कामं फारशी पटापट मिळत नसत. स्वानंद मग लोकांना भेटत राही , स्वतःला विधायक उद्योगात गुंतवत राही. सुनीतीताईंना आपल्या लेकाचा अभिमान वाटे.
त्याच्या निर्णयक्षमतेवर त्यांना पूर्ण विश्वास होता. अपयशाने तो खचून जाणारा नव्हता तसेच घायकुतीला येऊन अविचाराने वागणारा ही नव्हता.
यशाने कधी हुरळून गेलेला स्वानंद त्यांनी कधीच पाहिला नाही. त्यांचे संस्कार आणि घरची मध्यमवर्गीय पार्श्वभूमी तर होतीच, शिवाय स्वानंद कधीच अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा नव्हता. व्यवसायात चांगले दिवस होते तेव्हा देखिल स्वानंद चे पाय जमिनीवरच राहिले.  त्याच्या जीवनशैलीत टोकाचा  बदल कधीच झाला नाही.  4 चाकी आली,  पण दुचाकी चालवायची त्याला कधीही लाज वाटली नाही. ब्रँडेड कपडे तो घेई पण घरच्या साध्या पेहरावात त्याला कम्फरटेबल वाटे. मधेच कधीतरी ऊंची रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेला तरी घरगुती चवीची खाणावळ त्याला कधी बिलो स्टेटस वाटली नाही.  काही सवयी मात्र त्याने कटाक्षाने लांब ठेवल्या.  4 चाकी वर कधी ड्रायव्हर ठेवला नाही आणि कुठलीच क्लब मेंबरशिप घेतली नाही.  त्याबद्दल त्याची मते अगदी स्पष्ट होती.  ड्रायव्हर आणि क्लब या चैनी खानदानी श्रीमंतांनी कराव्यात. मी धडपडत चाचपडत इथवर आलो तेवढ्यावरून मी त्यांच्याशी बरोबरी करणं मला पटत नाही. मी सदैव स्टेटस मेंटेन करायच्या प्रेशर खाली राहू शकणार नाही , मी काही जन्मजात गडगंज नाही,  धंद्यात चढउतार झाले तर सापाच्या तोंडातून गडगडत खाली येण्यापेक्षा मला सावकाश एक एक पायरी वर चढायचं आहे. नशिबात असेल तर पुढच्या पिढ्या हे चोचले करतील. स्वानंद च्या अशा वैचारिक क्लॅरिटी मुळेच सुनीतीताई निर्धास्त होत्या.
या उलट लेकीचे स्वातीच्या सासरचे वातावरण वेगळे होते. जावई आणि स्वाती ची लग्नाआधिपासून ओळख होती. त्यांनी एकमेकांना निवडून लग्न करायचं ठरवलं. सुनीतीताई जावयांच्या कुटुंबाला जुजबी ओळखत होत्या. पण जावयांचं शिक्षण धंद्याला पूरक नसणं,  तरीही अल्पावधीतच त्यांनी मारलेली मोठी उडी , झटपट आलेली श्रीमंती त्यांना काळजीत पाडत होती.  लेकीच्या निर्णयापुढे त्यांचे फार काही चालले नाही. त्यांनी देखिल घरची चांगली माणसं पाहून समाधान मानून घेतले. स्वाती आणि जावयांची जीवनशली मात्र डोळे दिपवून टाकणारी होती. दोन गाड्या,  दोन ड्रायव्हर,  मोलकरीणींचा फौजफाटा. जावयांनी स्वातीला टू व्हीलर चालवायची आता बंदी केली होती. त्यांचे निर्णय त्यांच्या पाशी असे मानून सुनीतीताई कधीही स्वाती ला या सगळ्या वरून टोकत नसत.
पण आज लेकीने भावाच्या कर्तृत्वावर बोट ठेवलेलं मात्र त्यांना मुळीच आवडलं नाही. आता तिने विषय काढला आहे तर सगळंच बोलायचं असं त्यांनी ठरवलं. " स्वाती,  अगं स्वानंद ला त्याचं त्याचं करू दे . उगीच त्याच्या सध्याच्या मनस्थितीत त्याला अजून कुठल्या भागीदारीत अडकायची गळ घालू नकोस. आपल्या नात्यात व्यवहार तर बिलकुल नको,  आपले चांगले संबंध बिघडायचे. आणि इतकं काही वेडंवाकडं घडलेलं नाही,  आमच्या गरजा मर्यादीत आहेत,  छान छोकी ची चटक आम्ही लावून घेतली नाही,  उच्चभ्रू जीवनशैली वाचून आम्ही आधीपासूनच लांब आहोत. आणि कोणी सांगितलं तुला तो हातपाय गाळून बसलाय,  त्याचे प्रयत्न चालू आहेत,  तो लोकांना भेटतोय. त्याला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा घेऊदे. आज भले त्याच्या कडे काम नसेल पण एका पैशाचे कर्ज नाही डोक्यावर हे काय कमी आहे. रात्री ची शांत झोप आणि मनःशांती आहे हेच खूप आहे. त्याला संगत आणि सवयी दोन्ही चांगल्या आहेत, अजून काय हवं,  कुणाला काही दाखवायचं नाही कि कोणापुढे उगाच मिरवायचं नाही. "
" एरवी बोलले नसते, पण आज तू स्वानंद चा विषय काढला आहेस  म्हणून मलाही जावयांबद्दल थोडं बोलायचं आहे. आज अतिशय कमी काळात खूप मोठा डोलारा उभा केलाय त्यांनी, आम्हाला आनंद आहेच. पण त्याचा पाया डळमळीत नाही ना हे बघा म्हणजे झालं. यशाची चव जरूर चाखा,  पण त्याची नशा चढत नाही ना हे तपासत राहा. उच्चभ्रू वर्तुळात स्थान मिळवायच्या  अट्टाहासापायी आपण काय किंमत मोजत आहोत याकडे लक्ष द्या. आपली जीवनशैली कर्जाच्या जोरावर असेल तर ते काही खरं नाही. उद्या दैव न करो व्यवसायात काही कमी जास्त झालं तर हा कर्जाचा डोंगर आपल्याला गाडून टाकायला कमी करणार नाही. "
" आज माझं बोलणं तुला लागेल, पण मी आई म्हणून खरं नाही बोलले, तुला आरसा नाही दाखवला तर अजून कोण दाखवणार,  सगळं जग तुला आवडेल तेच बोलेल मग भले ते तोंडदेखलं खोटं का असेना , पण फक्त मी आणि स्वानंद तुला रुचलं नाही तरी खरं तेच बोलू. बघा दोघेही शांतपणे विचार करून. आता मुलं वाट बघत असतील  तुझी, परत येशील तेव्हा फक्त भेटायला ये, मायेने विचारपूस करायला ये,  व्यवहार घराबाहेर ठेवून आलीस तर तुझं स्वागतच आहे."
स्वाती समजायचं ते समजली......