Wednesday, February 26, 2020

Swapratima

आपल्या जन्माचा सोहळा होतो, बालपण देखिल कोडकौतुकात न्हाऊन निघतं.  पण मोठे होत जातो तसतसे या कौतुकाची किंमत मोजावी लागते.  परीक्षेत यश मिळवले तर शाबासकी,  करिअर मार्गी लागले तर कौतुकास पात्र. पैसा असला तर समाजात मान.

आपण ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीत लहानाचे मोठे होतो, त्यानुसार आपली स्वप्रतिमा तयार होत जाते. अखंड मायेची पांखर मिळालेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा अतिशय बळकट असते. या उलट मायेची तहान न भागलेल्या व्यक्ती ची स्वप्रतिमा खालावलेली असते.  अशा व्यक्ती येन केन प्रकारे ही तहान भागवण्यासाठी झटत राहतात.  स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देत,  लोकांना  मदत करण्सायाठी सतत धडपडत मिळालेल्या चार कौतुकाच्या शब्दांनी आपली तडा गेलेली स्वप्रतिमा सांधायचा यांचा सतत प्रयत्न असतो.

माझीही स्वप्रतिमा काही फारशी बरी नव्हती.  हे चित्र बदललं वयाच्या 25 वीशी नंतर. स्वतःला काय हवं ते नेमकं कळल्यावर, त्या करता योग्य पावले उचलून यशाची चव चाखल्यावर या स्वप्रतिमेत अनुकूल बदल घडत गेले. आता 40 शी पार केल्यावर मनात अपार शांतता आहे. कुणाला मी आवडो न आवडो, मला काही फरक पडत नाही, मला मी आवडते हेच पुरेसं आहे.

कुणाला काही पटवून द्यायचं नाही,  कुणावरही छाप पाडायची नाही. मी जशी घडत इथवर आले या प्रवासाचा मला अभिमान आहे.  मी कधीच ओढून ताणून मैत्री केली नाही,  निव्वळ एखाद्या गटाचा भाग व्हावं म्हणून कधी भिशी ग्रुप जाॅईन केला नाही,  घरी दरी त्यागमूर्ती बनत बसले नाही. सुपरवुमन या गोंडस नावाने कधी मला भुलवलं नाही आणि बाह्यरूप तर अट्टाहासाने कधीच मिरवलं नाही.

मला जो पेहराव कमफर्टेबल वाटतो तो मी करते, घड्याळ आणि चष्मा हेच माझे दागिने आहेत, बदलणारे फॅशन ट्रेंड्स मला अस्वस्थ करत नाहीत,  त्यातलं जे आवडेल आणि सोयीचं असेल तेच मी अंगिकारते. माझ्यासाठी फॅशन आहे,  फॅशन साठी मी नाही.

या अंतर्मनातल्या क्लॅरिटीचा लिहायला सुरुवात केल्यावर तर मला फारच उपयोग झाला. काय होतं,  एकदा का सोशल मीडिया वर व्यक्त व्हायची चटक लागली कि मिळ्णर्या लाईक्स,  कमेंट्स कडे आपलं लक्ष असतंच ते कोणाला सुखावणार नाहीत. पण आपलं लिखाण सर्वांना आवडायलाच हवं असा काही माझा अट्टाहास नाही. लोकांना वाचायला वेळ, गरज किंवा ईच्छा असतेच असं  नाही,  वाचलं तरी सगळ्यांना ते रुचेल आवडेल असं नाही. अगदी आवडलं तरी लाईक,  कमेंट आणि फाॅलो करायचं का नाही हा ही अधिकार त्यांना आहेच त्यामुळेच लाईक्स किंवा फाॅलोवर्स नाही मिळाले तरी मला काही फरक पडत नाही.  मी लिहितेच मुळी स्वान्त सुखाय,  त्याउपर जे वाट्याला येईल ते बोनस मानून घेते.

प्रत्येकाकडे आरसा असतो, त्यात तुमच्या प्रतिमेवर काही डाग दिसले तर जरूर पुसा,  स्वतःला असं अधूनमधून निरखून पाहणं कधीही चांगलंच,  आपली तुलना स्वतःशीच करून आपली अधिकाधिक सुधारित आवृत्ती काढायची एकही संधी दवडू नका. पण आपल्या मनाने कौल दिलेला नसेल तर दुसर्या कोणाही करता स्वतःला बदूल