Sunday, April 12, 2020

Gulab gang

जुही चावला ही अभिनेत्री म्हणजे अस्सल 24 कॅरेट सोनं. आजवर तिच्या निरागस चेहर्यानं, अवखळ हसण्यानं आणि अचूक काॅमेडी टायमिंग नं आपल्या ह्रदयावर अधिराज्य गाजवलं आहे. गुलाब गॅन्ग या चित्रपटात तिने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या वहिल्या खलनायिकी भूमिकेला अचाट ताकदीने साकारून पुनश्च आपल्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
या भूमिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठे  ही उदात्तीकरण न करता, कुठलीही सहानुभूतीदर्शक पार्श्वभूमी न चिकटवता सुमित्रा देवी हे खलनायिकी पात्र लिहिलं गेलं आहे. आपल्या प्रत्येकात दडलेल्या वास्तववादी खलप्रवृत्ती च्या विविध छटा या भूमिकेत आहेत. ही खलनायिका परिस्थिती ने गांजलेली नाही कि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली पीडिता नाही. सुमित्रा देवी हे टोकाचं स्वार्थी, मतलबी आणि प्रचंड महत्वाकांक्षी प्रकरण आहे. तिला शोषितांचे चे प्रश्न,अडचणी काही ही जाणून घ्यायचे नाहिये. तिला काहीही विचलित करत नाही,  ना रेप, ना खून, ना छळ. तिला दिसते फक्त संधी.
जुही चावला ने सुमित्रा देवी उभी करताना कुठल्याही भडक वेशभूषेचा आधार न घेता केवळ चेहर्यातून विविध भावछटा साकारत ही भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. 

Wednesday, April 1, 2020

MainBhiDirector

#MainBhiDirector
#Cinemagully
अमेरिका स्थित पेडियाट्रिशियन नादिया हाशमी यांचं हे दुसरं बेस्ट सेलर नाॅवेल. यातील नायिका फरीबा चं बालपण आईविना गेलं होतं. त्यातील कटू आठवणी मागे सोडून प्राक्तन म्हणून फरीबा लग्न बंधन स्वीकारते. एकूणच आयुष्याकडून फार अपेक्षा नसताना तिला नवर्यामधे मित्र गवसतो. आपल्या दोन मुलांना वाढवत शिक्षिका म्हणून काम करत तिचा सुखाचा संसार चालू असतो. तालीबानी राजवट उदयास येते आणि तिच्या संसाराला दृष्ट लागते. नवरा गमावून बसलेल्या फरीबा ला लेकरांना घेऊन जिवाच्या आकांताने पळ काढावा लागतो. इथून पुढची गोष्ट म्हणजे एका असहाय आईने लेकरांसकट लंडन स्थित बहिणी कडे पोहोचण्यासाठी केलेला खडतर प्रवास. या प्रवासात तिला आलेला माणुसकी चा प्रत्यय, वाट्याला आलेलं रेफ्यूजी चं जिणं, एका देशांतून दुसर्या देशात मजल दर मजल करत  केलेलं मार्गक्रमण सगळं सगळं कल्पनेपलीकडचे आहे.
प्रवासाच्या एका टप्प्यावर थोरल्या मुलाशी ताटातूट होणं तिच्या नशिबी येतं. अकाली प्रौढ झालेला हा मुलगा आपल्या आपलं अल्पजीवी रम्य बालपण आठवत संकटांना कसं तोंड देतो याचं अचंबित करणारे चित्रण पुस्तकात आहे.
यातील दोन प्रमुख व्यक्तीरेखांकरिता दोन नावं ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहतात.
फरीबा : तब्बू
थोरला मुलगा सलीम: ह्रितिक/ आयुष्मान