#MainBhiDirector
#Cinemagully
अमेरिका स्थित पेडियाट्रिशियन नादिया हाशमी यांचं हे दुसरं बेस्ट सेलर नाॅवेल. यातील नायिका फरीबा चं बालपण आईविना गेलं होतं. त्यातील कटू आठवणी मागे सोडून प्राक्तन म्हणून फरीबा लग्न बंधन स्वीकारते. एकूणच आयुष्याकडून फार अपेक्षा नसताना तिला नवर्यामधे मित्र गवसतो. आपल्या दोन मुलांना वाढवत शिक्षिका म्हणून काम करत तिचा सुखाचा संसार चालू असतो. तालीबानी राजवट उदयास येते आणि तिच्या संसाराला दृष्ट लागते. नवरा गमावून बसलेल्या फरीबा ला लेकरांना घेऊन जिवाच्या आकांताने पळ काढावा लागतो. इथून पुढची गोष्ट म्हणजे एका असहाय आईने लेकरांसकट लंडन स्थित बहिणी कडे पोहोचण्यासाठी केलेला खडतर प्रवास. या प्रवासात तिला आलेला माणुसकी चा प्रत्यय, वाट्याला आलेलं रेफ्यूजी चं जिणं, एका देशांतून दुसर्या देशात मजल दर मजल करत केलेलं मार्गक्रमण सगळं सगळं कल्पनेपलीकडचे आहे.
प्रवासाच्या एका टप्प्यावर थोरल्या मुलाशी ताटातूट होणं तिच्या नशिबी येतं. अकाली प्रौढ झालेला हा मुलगा आपल्या आपलं अल्पजीवी रम्य बालपण आठवत संकटांना कसं तोंड देतो याचं अचंबित करणारे चित्रण पुस्तकात आहे.
यातील दोन प्रमुख व्यक्तीरेखांकरिता दोन नावं ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहतात.
फरीबा : तब्बू
थोरला मुलगा सलीम: ह्रितिक/ आयुष्मान