#नावातकायआहे#
हीच रुचिता ची पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. जेव्हा राहुल ने त्याचा मानस तिला बोलून दाखवला होता . आपल्या धाकट्या अपत्याचे लेकीचे नाव बदलण्याचा .....
म्हणजे तिच्या नावातील वडील म्हणून आपले असलेले नाव काढून , आई म्हणून रुचिता चे नाव घालण्याचा . आई म्हणून नुसते कर्तव्यापुरते , लाडापुरते नाही , तर दोन मुलां पैकी एकाच्या नावाशी कागदोपत्री देखील आईचे नाव जोडले जावे हा त्याचा सरळ साधा हेतू .
आता नवऱ्याचा सरळ साधा हेतू बायकोच्या सहजासहजी पचनी पडला तर कसं चालेल ? तिला असंख्य प्रश्न पडले . मुळात आत्ता हे करायची काही गरज आहे का ? त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर ? लेकीच्या पुढील कागदपत्रांमध्ये काही अडचण अली तर ? राहुल चं उत्तर तयार होतं , पुढे अडचण येऊ नये म्हणून हीच योग्य वेळ आहे . ती म्हणाली , उद्या लग्न झाल्यावर आपलं आडनाव तरी लेक पुढे लावणार आहे का हे कुठे नक्की आहे ? आडनावाचाच भरोसा नाही तर माझं नाव जोडलेलं राहील याची काय शाश्वती ? यावर तो म्हणाला लगेच १० वर्षात तिचं लग्न लावणार आहोत का आपण ? पुढचं पुढे बघू . हि लगेच म्हणाली , मग लेकाचं का नको ? राहुल चं हि बरोबर होतं मुलाच्या स्कूल लिविंग आणि मार्कशीट वर आधीच वडील म्हणून त्याचं नाव आलंय . त्या पेक्षा लेकीचं बदलणं सोपं आहे .
मग रुचिता ने ब्रम्हास्त्र काढलं . तुझ्या लेकीला चालणार आहे का विचार आधी . नाही म्हटलं तरी तो ही गडबडलाच . लेकीला एव्हाना स्वतःची मतं आहेत हे तो चांगलंच जाणून होता . लेकीसमोर हा विषय काढताच अपेक्षित रिऍक्शन आली
"हे काय ...... नाव का बदलायचं ? मला सवय झाली आहे याच नावाची , मी एकटीच शाळेत आणि बाकी सगळीकडे ऑड मॅन आऊट होईन , मग सगळे काय म्हणतील" वगैरे प्रश्नांच्या फैरी झडल्या .
रुचिता गालातल्या गालात हसत होती . राहुल ने काही दिवस जाऊ दिले . थोडे लेकीच्या कलाने वागून घेतले . लेकीने हि संधी ओळखून वरचेवर काही दिवस बाहेरून पार्सल ऑर्डर्स मागवून घेतली . पुन्हा हा विषय लेकीसमोर काढल्यावर ती परत आपल्या मागच्याच भूमिकेवर ठाम . ती बधायला तयार नाही म्हटल्यावर त्याने त्वरित खिसा आवरता घेतला आणि आपला पवित्रा बदलायचे ठरवले. लेकीला समज तशी चांगली होती , हे तो जाणून होता. त्यामुळे आता सरळ तिच्याशी आपली या विषया मागची भावना शेअर करायचे त्याने नक्की केले .
या शेअरिंग चा मात्र हवा तो परिणाम झाला आणि लेक तयार झाली.
आता त्याने मैदानच मारले म्हटल्यावर रुचिता ला नवीन काही मुद्दे उरलेच नाहीत . लगोलग राहुल कामाला लागला , आवश्यक ती तजवीज केली , आणि मनात आलेला विचार कृतीत उतरवला . इतके दिवस काथ्याकूट करता करता वारंवार कानावर पडत असलेले नवीन नाव एव्हाना घरात सर्वांच्याच सवयीचे झाले . त्यामुळे त्यातील वेगळेपणाचा अंश तर गेलाच , आणि त्या जागी नव्या समानतेची नांदी आणणारे लेकीचे बदललेले नाव सर्वांच्या मुखी शोभू लागले.
रिद्धिमा रुचिता साने.