राहुल आणि रुचिता चा समानतेचा संसार आता वीस वर्षांचा झाला. त्याला आता मुरलेल्या लोणच्याची चव आली. ज्येष्ठांचं छत्र एकएक करत हरवत गेलं. सासुबाई होत्या तोवर दोघी मिळून हौशी ने सर्व सण साजरे करीत होत्या. रुचिता ची कधी पाळी ची खेप असली तरी सासूबाई एक हाती सगळं निभावून नेत होत्या. पण त्यांनी जगाचा निरोप घेतल्यावर मात्र राहुल, रुचिता ला काही प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागले. राहुल ची बहिण रेवती तोवर यूएस ला सेटल झाली होती. त्यामुळे दोघांनी विचाराअंती ठरवलं कि आता पाळी चे निर्बंध झुगारून द्यायचे. त्याही दिवसात त्याच उमेदीने आणि उत्साहाने घरचे गौरी गणपती, दिवाळी साजरे करायचे .
सासुबाई गेल्यावर सासरे अजूनच थकले. रुचिता च्या आईच्या मागे देखिल आजारपण लागले. राहुल आणि रुचिता वर दोन्ही कडच्या जेष्ठांची जबाबदारी असे. प्रत्येकाची औषधे, लॅब रिपोर्ट, चेकिंग सगळं नियमित बघावं लागे. पुन्हा एकवार सोयीचा मार्ग काढत राहुल ने त्याच्या वडिलांचं आणि रुचिता ने तिच्या आईचं बघायचं ठरवलं. यामुळे दोघांना ऐका पेशंटवर व्यवस्थित लक्ष देणं सोपं पडे.
एरवी दोघांचं ऑफिस आणि घर असं रूटीन चालूच होतं.
ऑफिसमध्ये आज एकच चर्चा चालु होती. वॅलेंटाईन डे प्लॅन्स ची. सगळे आपापले प्लॅन्स सांगत होते.
रुचिता म्हणाली, " आज मी घरीच थांबणार आहे मुलांच्या जवळ कारण राहुल चा आज मित्र मैत्रिणींच्या बरोबर डिनर प्लॅन आहे. " सगळ्यांचे डोळे विस्फारले.
कलीग म्हणाली, " तू हे इतक्या कूलली सांगत्येस? मी तुझ्या जागी असते तर घर डोक्यावर घेतलं असतं." रुचिता म्हणाली, " अगं एवढं काय त्यात? मी नाही का माझ्या मित्रमैत्रिणीं बरोबर आऊटिंग ला जात? तो ही एरवी जातोच, तसंच हे आजच्या दिवशी प्लॅन केलं तर बिघडलं कुठं? माझं काही ठरलं असतं तर मीही गेले असते.
असंच काही दिवसांनी राहुल च्या ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान वेगळे प्लॅन ठरत होते.
कलीग म्हणाला," चला या वर्षी आपण आपली जेन्टस ओन्ली बॅन्काॅक ट्रीप ठरवूनच टाकू."
" अरे पण घरी काय सांगणार?"
" सांगायचं की सरळ, त्यात काय, बाॅईज जस्ट वाॅन्ट टू हॅव सम फन, एक ब्रेक हवाच यार, एरवी संसार करतोच आहोत ना इमानेइतबारे." राहुल म्हणाला," डोन्ट काऊन्ट मी इन, तुमचं चालू द्या. "
" का रे बाबा, घाबरतोस की काय रुचिता ला सांगायला?"
" नाही रे, सांगायला नाही घाबरत. पण आपल्याला हवा तो चेंज तिला देखिल घ्यावा असं उद्या वाटलं तर मी तिला कोणत्या तोंडाने अडवू शकेन? ती तिथे जाऊन आपल्या सारखं 'एन्जाॅय' करून आलेली मला कितपत आवडेल, मग केवळ मी पुरुष म्हणून हवं ते करणं मला पटत नाही. व्हाय शुड ओन्ली बाॅईज हॅव ऑल द फन?
समानतेच्या या सडेतोड युक्तिवादाने सगळ्यांची तोंडं बंद झाली हे वेगळं सांगायला नकोच.