Friday, April 26, 2024

diabetes

Diabetes बद्दल एव्हाना आपल्याला व्यवस्थित awareness आला आहे तरीही काही वैयक्तिक अनुभव सांगून या माहितीची उजळणी करता येईल या हेतूने ही पोस्ट लिहित आहे. 

माझ्या सासर्यांना त्यांच्या वयाच्या 40 व्या वर्षी मधुमेह जडला. पण नियंत्रित आहार आणि अखंड व्यायाम आणि दर 3 महिन्यांत चेकिंग यामुळे जवळपास पुढची 30 वर्ष त्यांचा मधुमेह अगदी कंट्रोल मधे होता. त्यानंतर readings range बाहेर जायला सुरवात झाली. 
2018 साली एक दिवस त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं, मी चेक केलं तर bp low आलं, आणि admit केल्यावर doctors ना block सापडले आणि लगेच त्यांची angioplasty झाली. इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांना घरी जाणवलेला अस्वस्थपणा हा silent heart attack च होता कारण diabetic patients ना attack चा chestpain जाणवत नाही. 

त्यापुढील 2 वर्ष सुरळीत गेली, मात्र एक दिवस पायाच्या जखमेचं निमित्त झालं आणि 2 महिन्यांत ते दुखणं gangrene पर्यंत गेलं. इथून पुढे 6 महिने त्यांनी आणि त्यांच्या 2 मुलांनी gangrene आणि uncontrolled diabetes शी निकराची झुंज दिली. सासर्यांनी शक्यतोवर स्वावलंबन सोडलं नाही, मुलांचा आधार घेत का होईना हालचाल उठून toilet पर्यंत जाणं सगळं चालू ठेवलं. दोन्ही मुलांनी आळीपाळीने डोळ्यात तेल घालून त्यांना जपलं. त्यांची sugar दिवसातून 3दा चेक करणं, कमी जास्त reading नुसार गोळ्या injection चे डोसेस ठरवून देणं, सासर्यांनी देखील शेवटपर्यंत धीर सोडला नाही. 

But sooner or later gangrene literally eats you up. इतकंच नाही तर शेवटपर्यंत नरकयातना काही सुटत नाहीत. High intensity painkillers आणि hospital मधे सलाईन मधून दिलेली painkiller injections काहीही त्यांच्या मरणप्राय यातना थांबवू शकले नाहीत. शेवटी पेशंट देखील हे सहन करून थकतो आणि त्याचाही धीर सुटायला लागतो. तसंच झालं, अगणित वेळा dressings, पायाची दोन बोटे कापली जाणे, पायाची angioplasty होऊन सुद्धा शवटी discharge च्या आधी एक दिवस सासर्यांना heart attack आला, ते comatose झाले, दुसर्या दिवशी icu मधे दुसरा attack आला आणि तासाभरात organ failure होऊन त्यांची प्राणज्योत मालवली.

याला silent killer उगाच नाही म्हणत हे लक्षात आले. हे ही लक्षात घेण्याजोगं आहे की एका ठराविक वयापर्यंत आहार आणि विहार सांभाळून मधुमेह आटोक्यात राहू शकतो, पण वय वाढतं तसं हे ही होत नाही. त्यावेळेस मात्र सर्व प्रकारच्या जखमांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे.