Thursday, July 7, 2016

Take Charge

Yours was always the ideal life. A small town background didn’t deter you from chasing your dreams and you bore the fruit of your talent and hardwork in the form of your own business set-up. You had a wonderful supportive family and your personal and professional lives struck a fine balance.
Okay..... So you dreamt more.......Of scaling the untrodden path.
We still admired you for your guts and your “ live-life-to-the-fullest “ attitude. You were now seen clicked more with your new obsessions than with expressions of your inborn talents. We sensed something amiss but thought it would soon subside. We were hoping that you return back to your original persona soon. Unfortunately you were drifting away from the core that bound some of us to you.
And then the ill news broke. News like this one is seldom a rumour.
It was and wasn’t shocking....... both at the same time. The shock was for the concern of the familial bond that was at stake and the consequences of the news on the innocent life depending on the familial bond at stake.
The expected aspect of the news was that everyone around you.....even the distant lot like us, had somewhere sensed it already. The rate at which you had engulfed yourself in your new obsessions actually left no room for surprise.
Sadly ......you were the last one to realise this.
No obsession is worth it....... if it shatters the foundation on which we stand.
The dream that threatens to turn our envious life upside down ...is nothing but a nightmare .
The sooner we wake up.....the better. You can still do that.
Its never too late to own up our follies.......to leave the estranged path and return.
It troubles even an outside admirer like me to watch you alienate yourself from your near and dear ones.
Take charge girl.........Introspect.
Take professional help if you can’t handle it on your own.
But don’t.................Let this happen to you.

Take Charge

Yours was always the ideal life. A small town background didn’t deter you from chasing your dreams and you bore the fruit of your talent and hardwork in the form of your own business set-up. You had a wonderful supportive family and your personal and professional lives struck a fine balance.
Okay..... So you dreamt more.......Of scaling the untrodden path.
We still admired you for your guts and your “ live-life-to-the-fullest “ attitude. You were now seen clicked more with your new obsessions than with expressions of your inborn talents. We sensed something amiss but thought it would soon subside. We were hoping that you return back to your original persona soon. Unfortunately you were drifting away from the core that bound some of us to you.
And then the ill news broke. News like this one is seldom a rumour.
It was and wasn’t shocking....... both at the same time. The shock was for the concern of the familial bond that was at stake and the consequences of the news on the innocent life depending on the familial bond at stake.
The expected aspect of the news was that everyone around you.....even the distant lot like us, had somewhere sensed it already. The rate at which you had engulfed yourself in your new obsessions actually left no room for surprise.
Sadly ......you were the last one to realise this.
No obsession is worth it....... if it shatters the foundation on which we stand.
The dream that threatens to turn our envious life upside down ...is nothing but a nightmare .
The sooner we wake up.....the better. You can still do that.
Its never too late to own up our follies.......to leave the estranged path and return.
It troubles even an outside admirer like me to watch you alienate yourself from your near and dear ones.
Take charge girl.........Introspect.
Take professional help if you can’t handle it on your own.
But don’t.................Let this happen to you.

जाग

तुला भेटले तेव्हा पासून एक कुतूहल मिश्रित कौतुक वाटत आलंय तुझ्या बद्दल . निसर्गदत्त देखणेपण तुला लाभले आहेच . त्यावर तू आपल्या पेहरावातून व राहणीमानातून आपल्या व्यक्तिमत्वाला नेहमीच आकर्षक राखत आली आहेस .
लहान शहरातून येउन देखील इथे आल्यावर तू स्वहुशारीने तुझ्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचा जम बसवलास . त्यात तुला तुझ्या कुटुंबियांची यथायोग्य साथ सोबत होतीच .
तुझी स्वप्नं विस्तारली . तुला नवी क्षितीज खुणावायला लागली…….
या तुझ्या नवीन ' हटके ' नादाच देखील कौतुक वाटलं तेव्हा . अश्या जगावेगळ्या नादिष्टपणा ला सुद्धा धमक लागते . यातून तुझी असीम आनंद घ्यायची वृत्तीच झळकत होती .
तू त्यात रमत चालल्याच्या सर्व खुणा सर्वत्र जाणवत दिसत होत्या . ते पाहून बरं तर वाटत होतंच तरी पण काही तरी चुकल्या चुकल्या सारखं हि वाटत होतं . तुझं कौशल्य ज्या क्षेत्रात होतं ते कुठेतरी या सगळ्यामध्ये हरवल्या सारखं झालं होतं .
एकदा वाटला हे नवं जग क्षणिक आहे आणि तू त्यात फार काळ रेंगाळणार नाहीस . पण ते झालं नाही . ज्या कौशल्याच्या बळावर माझ्या सारख्या अनेक जणी तुझ्या शी जोडल्या गेल्या होत्या , त्या पासून तू फारकत घेतल्या सारखी वाटायला लागलीस .
आणि ती बातमी कानावर आली .
ती धक्कादायक वाटली पण कुठेतरी अपेक्षित देखील वाटून गेली . त्यातला धक्का हा खरंतर चटका लावून गेला होता . त्या बातमीने तुझ्या कौटुंबिक धाग्यावर अवलंबून असलेल्या निरागस जीवावर होणारे परिणाम तरळून गेले . पण कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसतंय हे दूरवरून तुला पाहणाऱ्या आम्हा सर्वांना जाणवत होतं . त्यामुळे या बातमीने आश्चर्य मात्र वाटलं नाही .
वाईट या गोष्टीचा वाटतं कि तुला ते वेळीच कळलं नाही .
जो हव्यास होत्याचं नव्हतं करतो … तो खरंच त्या लायकीचा असतो का ?
जे स्वप्नं सुंदर शाश्वताला हादरावते … ते उराशी कवटाळयचा अट्टाहास का ?
जितकं लवकर यातून जाग येईल तितकं बरं .
अजूनही वेळ गेलेली नाही . चुका मान्य करायची वेळ कधीच जात नाही .
चुकलेली वाट सोडून आपल्या कळपात परतायची वेळ असेल तर सोडू नकोस .
माझ्या सारख्या तिर्हाईतआला देखील तुझं असं आप्तान पासून दुरावणं त्रास देऊन जातं ग .
सामोरी जा ………. स्वतःला तपासून बघ .
मदत घे हात देणार्यांची . काहीही कर .
पण नको गं ………. नको असं होऊ देउस .

Tuesday, May 5, 2015

so smart of us


किती सोप्पं झालंय न सगळं 
या स्मार्ट फोन ने जग हातात आणून दिलंय
आपण आणि आपला फोन ……. बस यांचच एक चिरेबंदी जग 
त्यात शेजारी बसलेल्या ला शिरकाव नाही …. 
पण आपण मात्र फोन मधून तिऱ्हाई ता च्या जगात मनसोक्त फेरफटका मारून येऊ शकतो 
एका हाताने , आपल्या खाजगी आयुष्यातले सौख्य जगाला दाखवत ,
दुसर्या हाताने त्याच सौख्याला दृष्ट हि लावू शकतो … कसं काय ?

 जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं याच्या सीमारेष्या स्मार्ट फोन ने  इतक्या धूसर केल्या  आहेत 
कि आपल्याला वाटतच नाही आपण काही गैर किंवा अवैध करतो अहोत. 
किंवा असं म्हणू हवं तर, पूर्वी पर्याय नसे म्हणून तरी आपण एकनिष्ठ राहत असू, 
आता ते दिवस केव्हाच मागे पडले …… 
तुम्ही, आम्ही अगदी कुणीही , मनात येता  क्षणी, या स्मार्ट  फोन च्या कृपेने आपली वाट वाकडी करू शकतो . 
पूर्णपणे खाजगीत , जोडीदाराला शंका हि न येता . घराबाहेर सुद्धा न पडता . 
पर्सनल मेसेजेस च्या स्वरूपात सुरु होणारं साधसं च्यॅटिंग कधी चावट  गप्पां चा रस्ता धरत, 
अतिशय इंटीमेट आणि गहिऱ्या संबंधांमध्ये परिवर्तित होतं ………  आपलं आपल्याला हि कळत नाही 
खरं म्हणजे कळत सगळं असतं , पण वळत मात्र नाही .  

पूर्वीचे माणूस ओळखायचे ठोकताळे केव्हाच गळून पडले . 
एखाद्याची नजर, वागणं बोलणं , पेहराव यावरून एखाद्या ची चाल , वळण लक्षात येत असे . 
आता कोणाबद्दल आडाखे बांधायची सोय राहिली नाही . 
आपलीच एखादी मैत्रीण , शेजारी, ओळखीतले काका, अगदी घरातला कोणी सदस्य ……. 
कोणाचा स्मार्ट फोन कोणाचे काय काय अंतरंग दाखवेल याची शाश्वती  नाही . 

सगळ्या गोष्टी सोप्प्या केलेल्या स्मार्ट फोन ने हे बाकी अवघड करून ठेवले आहे . 

anubandh

कामवाली बाई शी आपले संबंध हे एक अजब रसायन आहे.
 एका प्रकारे वाळवंट च …… कितीही काहीही पेरा , खत पाणी घाला , निगा राखा …. ते उजाड आणि ओसाड च राहतं .
क्वचित कधी आभास होतो मृगजळाचा …. पण फार काळ टिकत नाही तो आभास …. 
पण काही आभास त्या त्या काळा पुरते का होईना , इतके खरे असतात , आणि इतक्या सुखद  आठवणी देऊन जातात , कि ते क्षण मनात कायम जपले जातात . 

अशाच काही जणी मनात घर करून बसल्या आहेत . 

शिडशिडीत बांधा , सावळा वर्ण , दोन्ही खांद्यावरून पदर , चेहऱ्यावर धीर गंभीर तरीही मृदू भाव  अशा सविता बाई माझाकडे पोळ्या करून द्यायच्या . शांतपणे  येउन आपलं काम करून जायच्या . फार काही बोलाचाली व्हायची नाही त्यांच्याशी . आपण बरं आणि आपलं काम बरं असा त्यांचा स्वभाव . पोळ्या स्वैपाकाच्या कामा सोबत त्या बाळ बाळनतिणी ची कामं सुद्धा करायच्या . साहजिकच सावनी च्या वेळी स्वैपाक आणि बाळा च काम आपसूक त्यांनाच सोपवलं . 
काम करता करता त्या मूकपणे पाहत असत . त्या वेळी हळवं झालेलं माझं मन सहजपणे त्यांच्या पाशी मोकळं व्हायला लागलं . त्या अल्प संभाषणातून त्या काय समजायचं ते समजल्या …. आणि मग मात्र त्यांनी जणू माझं पालकत्व च घेतलं .
 रोजचं बाळा च आवरल्यावर त्या स्वैपाक घरात जात , मला टेबलाशी ताट देऊन बसवत आणि गरम गरम भाकरी वाढून खायला लावत . कधी भाकरी सोबत खीर करून देत . एकदा माझासाठी पाया सूप केलं आणि बाळनतिणी ने ते पिणं किती पौष्टिक आहे हे पटवत मला प्यायला लावलं . 
त्यावेळी माझी नेमकी गरज त्यांनी ओळखली होती …......... ………… ………………. 
त्यांनी मायेनं केलेल्या  या छोट्या छोट्या गोष्टींनी मला त्या  त्या क्षणी काय आणि किती किती दिलंय याचं मोजमाप होऊच शकत नाही . 

त्या पाठोपाठ आठवते योगिता . गोबऱ्या गालाची , उंच , भरल्या अंगाची , पण अतिशय निरागस डोळ्यांची योगिता केर फरशी भांड्यान साठी माझाकडे कामाला होती . 
तुटल्या विखुरल्या घरातून आलेली योगिता , काका काकी जवळ राहायची . कामं करून पैसे कमावून काकी कडे सुपूर्द करायची . 
लहान वयात आलेलं मोठेपण , जगाने शिकवलेलं शहाणपण तिच्या टपोऱ्या डोळ्यात साठलेलं असायचं . मग कामावर आली कि माझाशी बोलता बोलता सगळं साचलेलं उसनं अवसान त्याच टपोऱ्या डोळ्यांवाटे घळा घळा गाला न वरून ओसंडून जायचं .
 घटका दोन घटका बोलणं … पण कुणी ऐकून घ्यायला आहे , हा दिलासा तिला पुढचे अनेक दिवस पुरायचा . आपली कर्म कहाणी ऐकवून , त्या बदल्यात तिला काही नको असायचं , न कसली मदत न सवलत . त्या विसाव्या च्या क्षणांनी , क्वचित माझ्या वडीलकी च्या शब्दांनी त्या क्षणी तिच्या मनाला हवी असलेली फुंकर तिला मिळायची आणि ती डोळे पुसून, ओढणी खोचून पुढल्या कामाला निघून जायची . लग्नं ठरल्यावर चेहऱ्यावर वेगळंच तेज घेऊन यायची ती . जणू दिवस पालटल्या ची ती नांदी होती . आणि खरच तिचे  दिवस पालटले . लग्न होऊन दोन बाळांची आई झालेल्या योगिता ची खुशाली अधून मधून कळत  असते . 


योगिता ने काम सोडायच्या सुमारासच अनिता घरात आली .
 काळी सावळी , तीक्ष्ण पण गांगरलेल्या नजरेची आणि अंगाने कटक अनिता महाड नजीकच्या गावाहून माझाकडे कामासाठी राहायला आली .
 अचानक आपलं घर , माणसं सगळं सोडून आमच्या सारख्या  अनोळखी लोकांसोबत राहायला आलेल्या त्या मुलीला सगळंच नवं होतं . नवी जागा , शहरातली राहणी , मागे पडलेलं घर , सगळ्या पायी काही दिवस ती अगदी गप्पं गप्पं असायची . कामापुरतं सुद्धा बोलायची नाही , फक्त काही विचारलं तर उत्तर द्यायची .
 पण घरात बाळ असलं कि कोणीच फार काळ गप्पं राहू शकत नाही . त्या प्रमाणे तीही सावनी ला खेळवताना हळू हळू बोलती झाली . 
पण काही दिवसातच माझ्या लक्षात आलं , कि हि पट्ठी अजिबात नीट  जेवत खात नाहीये . तिला आपल्याकडची गुळमुळीत चव आवडत नाही हे लक्षात आले . तेव्हापासून मी तिला तिच्या चवीनुसार भाजी आमटी करून घ्यायला सांगितलं . 
सर्वप्रथम तिने काय केलं असेल तर ढीगभर कांदा आणि ढीगभर लसूण ढीगभर तेलावर परतून झणझणीत कांदा लसुण  मसाला करून ठेवला . आता रोजच्या भाजीत तो आपल्यापुरता घालून घेऊ लागली , मुख्य म्हणजे व्यवस्थित जेऊ लागली . 
हळू हळू सर्व घरकामाचा ताबा अनिता ने घेतला . स्वच्छ आणि चटपटीत काम न कंटाळता करायची ती . 
सहा महिने रात्रीची झोप विसरलेल्या मला  खऱ्या अर्थाने आराम मिळायला लागला . 
कामाचा व्याप बराचसा हलका झाल्याने मी ………व आमच्या सारखं आमच्या बरोबरीने चांगलं चुंगलं राहणं आणि खाणं पिणं होऊ लागल्याने ती ............................................. दोघीही तब्ब्येतीने  सुधारलो . 
आमच्याशी सूत जुळल्याने म्हणा किंवा स्वकष्टाच्या कमाईतून होणाऱ्या समाधानाने म्हणा ती घरात चांगलीच रुळली . 
पण शेवटी हनिमूनच तो . तीचासाठीही आणि माझासाठीही . तरीही दीड वर्ष टिकला . 
काही दिवसान पासून माझी नजर चुकवून बाहेर ती काही उद्योग करू पाहतेय हे माझा लक्षात यायला लागलं . विश्वासात घेऊन विचारलं तर खरं बोलेना . मग ओळखलं ……आता हि जोखीम सांभाळण शक्य नाही . 
तात्काळ तिच्या पुण्यातल्या दूरच्या भावाला बोलावून तिला निरोप दिला .
 वाटलं होतं हि ही इथूनच लग्न ठरून मार्गी लागेल . तरीही तिने  मनापसून केलेल्या कष्टा चा विसर पडणं अशक्य होतं म्हणून तिचा लग्ना  करिता देण्यासाठी ठेवलेली आहेराची रक्कम भावाकडे देऊन टाकली आणि मनातून तिला शुभाशीर्वाद देऊन पाठवून दिले . 

नुकतीच सहा महिन्यांपूर्वी लग्न होऊन गावी गेलेली नीना . 
तिच्या इतकं भाबडं ध्यान मी आजतागायत पहिले नाही . अगदीच ठेंगणी आणि ठुसकी पण जाडजूड बांध्याची होती नीना . वरकामाला लागली ……मी सांगितलेलं काम अगदी जीव ओतून करायची .
 अगदी तिचं  समाधान होई पर्यंत………. माझं समाधान झालं असण्याशी तिचं काही घेणं देणं नसायचं . त्या पायी तिचे वरकामाचे तास  भरले तरी तिला फिकीर नसायची . तिला उशीर होईल या  जाणीवेने माझी घालमेल झालेली असायची . पण ती निवांत . 
या कष्टकरी जीवाची हि एक अत्यंत दुखरी जखम होती . अर्धवट वयातल्या अर्धवट लग्नाची . त्या पायी लागलेल्या बट्ट्या ची  . त्या पायी आता समज आल्यावर देखील  नव्याने लग्न  ठरण्यात  येत असलेल्या अडचणीची .  ३० शी च्या जवळ येउन  देखील संसाराचे स्वप्न पूर्ण न होण्याची . 
त्या काळजीने म्हणा , दोन तीनदा ठरत येउन मोडलेल्या सोयरिकी ने म्हणा तिने काही काळ अंथरूण धरलं . १५ दिवसांनी बरी होऊन आली तेव्हा परिस्थिती स्वीकारल्याचा भाव त्या भाबड्या चेहऱ्यावर होता . पण आतून उदासच असायची . 
शेवटी नात्यातलाच एका भावाशी सोयरिक जुळली आणि कळी खुलली . होणारा  नवरा भाऊ होता , वयाने तिच्याहून लहान होता , चेहऱ्यावर च नाही तर शरीरभर विद्रूप ते च्या खुणा असलेला होता ..........................................  कशा कशानेच ती डगमगली नाही . साचलेलं डबकं आता प्रवाही होणार यातच तिला सगळं मिळालं होतं . 








Monday, August 26, 2013

happy friendship day

Its that day of the year to cherish friendships.
Its also a chance to thank this virtual world to have eased out everything related to this wonderful bond.

A tool to reconnect with childhood friends, with whom innocent memories have been shared. Its such a proud feeling to know that they have created a beautiful world of their own. Its so nice to bless their loved ones through the photos shared, and there is no feeling of having missed out each other's milestones.

A tool to relocate adolescent crushes, who have if not anything else helped us know ourselves better. It is great to know them as grown-ups, all settled into domesticity & scaling new heights in their lives.

A tool to make new friends is the most unbelievable thing to have happened to me. Orkut gets the credit of giving me a bunch of amazing girl-friends & over the last few years we have taken our bonding from the virtual to the real world too.

A tool to connect with friends who may be at the other end of the universe, but their min-to-min updates give us the feeling that they are next door neighbours. Their sharing of experiences, their adventures, their trips to amazing locations through their uploads become our own as if it is our joy ride into their lives.

It is as if we are all enjoying together, pledging our likes to each other's achievements and also offering back-up in troubled times. Although nothing can be compared to the physical presence of a friend, this virtual boon is any day better than a lonely survival.

Happy Friendship Day to all my friends !!!!!!!!!!!!

Wednesday, May 29, 2013

Breaking news

काय केलंस तू हे? आणि का? केवळ एका बिघडलेल्या  gene ने तुझी खात्री   पटली कि तुझा मृत्यू केवळ कॅन्सर नेच होणार आहे? आणि तो टाळ लास कि जगात कशा कशा पासूनही तुला धोका नाही?
इतकी सुंदर, इतकी जगात वावरलेली, स्वतःचे स्थान निर्माण केलेली तू, आणि बस या एकाच निर्णयाने अख्या जगाला तू बुचकळ्यात टाकले आहेस, याची तुला जाणीव  तरी आहे का?
तू म्हणतेस हे तू मुलांसाठीच केलंस …त्यांना अकाली पोरके होण्यापासून वाचवण्याकरिता केलंस
काय सांगतेस कोणाला आणि किती फसवशील स्वतःला ?
इतक्या पुढारलेल्या देशात लहानाची मोठी झालीस ते काय तिथली संस्कृती अंगात न भिनवता ?
फ्री सेक्स , व्यसनं या सवयी तुला कधी नव्हत्याच? तेव्हा बिनदिक्कत सगळं अंगीकारला असशील न?
त्याचा तुझा शरीरावर, आरोग्यावर काहीच परिणाम झाला नसेल?
मग  सर्व बाजूंनी स्थिरावल्यावर मारे मुलांना दत्तक घेतलंस आणि कुटुंबवत्सल झालीस पण जसं नुसतं जन्म देऊन पालक होता येत नाही तसाच दत्तक घेऊनही होता येत नाही, हे माहित नसेल तुला कदचित.
आपल्या जीवनशैलीवर हजार बंधनं लादून घ्यावी लागतात, आपल्या उदाहरणातून त्यांनी शिकण्याकरिता वेळ प्रसंगी मन मारत वर्तन ठेवावं लागतं . पालक म्हणून आपलं काय काय त्यांना अनुकरणीय आहे हे स्वतःशी शंभरदा तपासून पाहायला लागतं . शारीरिक खस्ता खाल्ल्या नाहीत तरी या पासून कोणत्याही जबाबदार पालकाची सुटका नाही .
मग जगाचा निरोप घेताना काय सोडून जाणारेस त्यांचा करिता ज्याचं त्यांनी अनुकरण करावं ?हा भ्याडपणा ?.....
 तुझं ठीक आहे ग … तू आधी अवयव काढून टाकशील, मग शरीर सुडौल दिसावा म्हणून प्लास्टिक सर्जरी करशील, आणखी काय काय काढून परत आहे तसे तुकतुकीत दिसावे म्हणून पैशांचा पाऊस पाडशील , पण यातून तू जो संदेश देतेस न …… तो फार जहाल आहे, आणि नकारात्मक आहे, live life on your own terms .....' ती धमक माझात आहे आणि बाकी पामरांनी बसावं तोंडात बोटे घालून, अथवा मी आखून दिलेल्या वाटेवर निमूट चालावं '
त्यातून आता आधीच गालबोट लागलेल्या वैद्यकीय व्यवसायाचे चांगलेच फोफावणार आहे, तुझे उदाहरण देऊन, तुझा सारख्या भित्र्या धनिकांना ते अलगद जाळ्यात ओढणार यात शंका नाही … हाच नवा खात्रीलायक उपाय कॅन्सर पासून जगाला वाचवू शकतो…हे आता वाऱ्याच्या वेगाने पसरणार, आणि आम्ही बापडे नवी बातमी येईस्तोवर तुझा करामतीवर शेरे मारत बसणार .