Wednesday, May 29, 2013

Breaking news

काय केलंस तू हे? आणि का? केवळ एका बिघडलेल्या  gene ने तुझी खात्री   पटली कि तुझा मृत्यू केवळ कॅन्सर नेच होणार आहे? आणि तो टाळ लास कि जगात कशा कशा पासूनही तुला धोका नाही?
इतकी सुंदर, इतकी जगात वावरलेली, स्वतःचे स्थान निर्माण केलेली तू, आणि बस या एकाच निर्णयाने अख्या जगाला तू बुचकळ्यात टाकले आहेस, याची तुला जाणीव  तरी आहे का?
तू म्हणतेस हे तू मुलांसाठीच केलंस …त्यांना अकाली पोरके होण्यापासून वाचवण्याकरिता केलंस
काय सांगतेस कोणाला आणि किती फसवशील स्वतःला ?
इतक्या पुढारलेल्या देशात लहानाची मोठी झालीस ते काय तिथली संस्कृती अंगात न भिनवता ?
फ्री सेक्स , व्यसनं या सवयी तुला कधी नव्हत्याच? तेव्हा बिनदिक्कत सगळं अंगीकारला असशील न?
त्याचा तुझा शरीरावर, आरोग्यावर काहीच परिणाम झाला नसेल?
मग  सर्व बाजूंनी स्थिरावल्यावर मारे मुलांना दत्तक घेतलंस आणि कुटुंबवत्सल झालीस पण जसं नुसतं जन्म देऊन पालक होता येत नाही तसाच दत्तक घेऊनही होता येत नाही, हे माहित नसेल तुला कदचित.
आपल्या जीवनशैलीवर हजार बंधनं लादून घ्यावी लागतात, आपल्या उदाहरणातून त्यांनी शिकण्याकरिता वेळ प्रसंगी मन मारत वर्तन ठेवावं लागतं . पालक म्हणून आपलं काय काय त्यांना अनुकरणीय आहे हे स्वतःशी शंभरदा तपासून पाहायला लागतं . शारीरिक खस्ता खाल्ल्या नाहीत तरी या पासून कोणत्याही जबाबदार पालकाची सुटका नाही .
मग जगाचा निरोप घेताना काय सोडून जाणारेस त्यांचा करिता ज्याचं त्यांनी अनुकरण करावं ?हा भ्याडपणा ?.....
 तुझं ठीक आहे ग … तू आधी अवयव काढून टाकशील, मग शरीर सुडौल दिसावा म्हणून प्लास्टिक सर्जरी करशील, आणखी काय काय काढून परत आहे तसे तुकतुकीत दिसावे म्हणून पैशांचा पाऊस पाडशील , पण यातून तू जो संदेश देतेस न …… तो फार जहाल आहे, आणि नकारात्मक आहे, live life on your own terms .....' ती धमक माझात आहे आणि बाकी पामरांनी बसावं तोंडात बोटे घालून, अथवा मी आखून दिलेल्या वाटेवर निमूट चालावं '
त्यातून आता आधीच गालबोट लागलेल्या वैद्यकीय व्यवसायाचे चांगलेच फोफावणार आहे, तुझे उदाहरण देऊन, तुझा सारख्या भित्र्या धनिकांना ते अलगद जाळ्यात ओढणार यात शंका नाही … हाच नवा खात्रीलायक उपाय कॅन्सर पासून जगाला वाचवू शकतो…हे आता वाऱ्याच्या वेगाने पसरणार, आणि आम्ही बापडे नवी बातमी येईस्तोवर तुझा करामतीवर शेरे मारत बसणार .

Sunday, December 9, 2012

aupacharik

#औपचारिक 

काय कसे काय ??? सगळं ठीक ?.......
तुझा काय चाललंय.....
माझा काय चाललंय.......
सुरळीत सर्व गणित ????
त्या पलीकडे नकोच आता नसत्या उठाठेवी........
कोरड्या उरलेल्या नात्याची आता गरज काय उरली ?
तिच्या अस्तित्वामुळे जे जुळलं आणि फुललं
तीच नाही म्हटल्यावर आता खोलात का शिरावं ?
कि हे माझंच लांब पळणं आहे ........... ?
कदाचित....
नको ते ऐकायला लागू नये 
या भीतीने डोकावणारी असुरक्षितता आहे....
पण नक्की कसली.......?
काही ठीक नाही हे कळल्या वरची ....
कि सर्व काही खूपच ठीक आहे हे कळल्या वरची !!!
ती होती तेव्हा काही ठीक नव्हते.....
हे ऐकल्या वरची.......
कि......ती गेल्या मुळेच ......
सर्व काही ठीक झालंय हे सुचविल्याची.......
नक्की कशाची..............?

-मीनल देवस्थळे 

Monday, December 19, 2011

पर्व नवे

ऑन-लाईन मैत्री हि या दशकाची एक देणगी आहे यात वाद नाही. या मैत्री मध्ये जितकं थ्रील, वेगळेपण, तितकीच रिस्क सुद्धा. एखादा आश्वासक दुवा सापडला तर मात्र प्रत्यक्ष मैत्री इतकाच आल्हाद दायक अनुभव मिळतो हा माझा अनुभव. आमच्या तनिष्का परिवार बाबत तरी हेच म्हणता येईल.
'तनिष्का' हे सकाळ वृत्तपत्र समूहाचे नवीन मासिक ५ वर्षान पूर्वी हातात आले आणि त्यातील विषय हे नेहमीच्या टिपिकल महिला स्पेशल मासिकान पेक्षा हटके आहेत हे जाणवले. तोवर मासिकान मध्ये सरधोपट अशी दोन टोकं होती. एक बाजूला 'बेहेनजी' प्रकारातील साचेबद्ध घरेलू विषयांना आधुनिकतेची फोडणी पेरलेली, त्यातील कथा या आपल्याशा न वाटणाऱ्या, त्यातील टिप्स वाचून वाचून चोथा झालेल्या, कौटुंबिक प्रश्नोत्तरे हि निव्वळ मासिकाचा खप वाढवा या साठी निर्मिलेली तडक-भडक अशी 'सहेली', 'मैत्रीण',वुमेन'स इरा', मधून डोकावणारी. आणि दुसर्या बाजूला अगदी उच्चभ्रू वर्गाला साजेसे 'फेमिना' गटातील मासिके ज्यात फेशन, मेकप, आणि घरभेदी विचारसरणी चा भडीमार या शिवाय काही नसे.
या दोन्ही टोकाच्या वर्गातील स्त्री मासिकान मध्ये समन्वय साधत मुख्यत्वे वैचारिक, बौद्धिक आणि सामाजिक जाणिवेचे खाद्य पुरविणारे मासिक म्हणून 'तनिष्का' समोर आले.
आजूबाजूच्या पुरुष प्रधान जगात, लढत,झगडत का होईना पण पण आपले स्थान मागत वावरणाऱ्या , स्व-ओळख असलेल्या आणि त्यामुळेच स्वतंत्र विचारसरणीच्या अश्या स्त्रियांचे खर्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे मासिक म्हणून 'तनिष्का'ने आपली ओळख प्रस्थापित केली आणि आमच्या मनात घर केले.
कालानुरूप या मासिकाने खास 'netizens' पर्यंत हि पोचता यावे या कारणाने ओर्कुट वर 'तनिष्का' नामक ऑन-लाईन समूह चालू केला. त्याची लिंक मासिकावर झळकू लागली. फेसबुक शी अजून मैत्री न झालेल्या पण ओर्कुट वर बर्यापैकी स्थिरावलेल्या माझ्या सारख्या अनेक सख्यांना नवीन लिंक आकर्षित करू लागली. बघूया तरी काय प्रकार आहे या विचाराने सभासदत्व घेतले गेले.
सुरवातीला केवळ मूक वाचक राहणे माझा सारखेच अनेकींनी पसंत केले. त्या काळात इतर सहभागी मेम्बर्स च्या पोस्ट्स वाचणे आणि एकेकीची एकतर्फी पारख करणे चालू असायचे. मग हळू हळू विश्वास दृढ व्हायला लागल्यावर प्रकट होऊन पोस्ट्स टाकणे, नवीन टोपिक्स टाकणे आणि त्यावर चर्चा करणे सुरु झाले. जुन्या जाणत्या मेम्बर्स नीच मग मराठी फोन्ट कसा वापरायचा ते हि शिकवले. आशा तर्हेने सावध पावले टाकीत सुरु झालेला प्रवास मजल-दरमजल करीत वेग घेऊ लागला.
समुहात प्रकट होऊन सहभाग घेणाऱ्या सख्या दूरवर पसरलेल्या आहेत. यु.एस, सिंगापोर, ओमान, युके, मधून तर आहेतच पण महाराष्ट्रात देखील जयसिंगपूर, फलटण, कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे सांगली, सातारा, रत्नागिरी ,सोलापूर आणि भारतभर देखील उज्जैन, हैदराबाद येथे हि आहेत. पण असे लक्षात आले कि पुण्यातील सख्या मेजोरीटी मध्ये आहेत आणि समूहाची समन्वयक आणि सर्वेसर्वा मंजिरी फडणीस हिच्या शी बोलून एक कल्पना सुचली.
आजवर केवळ ऑन-लाईन भेटलेल्या पण एव्हाना एकमेकींना पुरेपूर ओळखलेल्या मेम्बर्स चे पुण्यात सारसबागे मध्ये पाहिले गेट-टुगेदर ठरले. त्यात शहरातील व चिंचवड, कल्याण,फलटण आणि जय्सिंपूर हून देखील सख्या आल्या होत्या. समोरासमोर आल्यानंतर खरेतर पहिल्यांदा भेटल्याचा फील आम्हाला कोणालाच आला नाही, तरीही आमची ओळख आणि मैत्री वर्चुअल जगातून वास्तवात दृढ झाल्याचा आनंद काही औरच होता हे निश्चित.
त्या नंतर आजवर अनेक गेट-तुगेदर्स झाली, कधी संभाजी बागेत कधी सारस बागेत तर दोन तीनदा पानशेत मधील सूर्य शिबिरात हि सहली झाल्या.
मंजिरी फडणीस ने आजवरच्या एकूण एक नाही पण जास्तीत जास्त गेट-तुगेदर्स मध्ये नुसती हजेरीच नाही तर वेळ काढून सहभाग घेतला आणि ऑन-लाईन नव-नवीन विषय काढून आम्हाला प्रतिक्रिया द्यायला, लिहायला उद्युक्त करून अनेकदा मासिका मध्ये आमची नावेही छापून आणली. अनेकींचे छंद, त्यातून त्यांनी केलेले अर्थार्जन कधी समाजकार्य समोर आले. अनेकींच्या कौतुकाने, अभिमानाने छाती फुलून आली. कित्येकींनी सख्या मैत्रिणीन प्रमाणे एकमेकींना आधार दिला, दिलासा दिला. इतर नात्यान प्रमाणेच इथेही अनेकदा 'अतिपरिचयात अवज्ञा' डोकावली पण काळाने त्यावरही मात केली आहे आणि एकमेकींना आता आमच्यातील गुण-दोषान सहित आम्ही पूर्णपणे स्वीकारले आहे.
या समूहातील सहभागाने मला खूप समृद्ध अनुभव दिले आहेत. समोर न दिसणाऱ्या व्यक्तीला माणूस म्हणून कसे जोखावे याचे शिक्षण याच समूहातून मिळाले. दृष्टीभेत न घडता हि आपला सच्चा व्यवहार समोरील सच्च्या व्यक्तीला किती अचूक भिडतो हा प्रत्यय आला.
आमच्या नवीन कल्पनेचे बीज हि याच समूहात रोवले गेले. 'बोल-सखी' या ऑन-लाईन समूहा ची स्थापना याच तानिश्कातील मैत्रिणींच्या आग्रहा खातर झाली. त्याची पाळे-मुळे रुजून आता अडीच महिने झाले आहेत. तो आता मन मोकळे करण्याचा एक हक्काचा कट्टा बनून गेला आहे. आपल्याला खरेतर किती काय काय बोलायचे असते, पण ते सोडून आपण इतरच काही बाही बोलत राहतो याची जाणीव आता सख्यांना होऊ लागली आहे. बर्याचदा हवे ते न बोलल्याने, खदखदणारा विचार कोणापाशी तरी बोलून न टाकल्याने किंवा आपण करू किंवा बोलू ते चूक कि बरोबर हे न ठरवता आल्याने एकटेपणाची, वैफल्याची भावना निर्माण होऊ लागली कि तिचे पडसाद शरीरावर उमटल्याशिवाय राहत नाहीत. हा समूह 'तुमच्या समस्यांची तत्काळ उत्तरे' वगैरे अजिबात देत नाही. फक्त आपण एकटे नाहीयोत हि भावना मात्र नक्कीच रुजवतो. समस्या नाकारणे हे उत्तर कधीच नसते, त्याला भिडून त्य्चाशी कसे डील करता येईल याच्या शक्यता तपासून बघायला आपल्या समूहाची नक्कीच मदत मिळू शकते. आणि बायका आश्वस्त झाल्या कि त्या बोलतातच, नव्हे ती त्यांची ताण मुक्त होण्याची गरजच आहे हे या समूहातील पोस्ट्स च दर्शवतात.
या ऑन-लाईन विश्वाने मला वैयक्तिक रित्या एक फ्रेंड फिलोसोफेर आणि गाईड 'मीनल दफ्तरदार' च्या रूपाने दिला आहे. बहुदा देवानेच तिचे माझ्या आयुष्यात येणे, हे माझ्या दोन जवळच्या व्यक्ती हिरावून घेतल्या बद्दल केलेली भरपाई वाटावी असे नियोजित केले असावे. तो आहे आणि कुठले रूप घेऊन कधी प्रकट होईल सांगता येत नाही हेच खरे. गणपती बाप्पा मोरया.

Friday, August 12, 2011

The big Question......................

तू काय करतेस? जॉब कि घरीच ?
विचारणार्याच्या तोंडाचे वळण आपण बदलू शकत नाही.
पण उत्तर देणाऱ्या गृहिणीने जर " मी घरीच असते" म्हटले तर मात्र तिच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते.
हा ' च ' च आहे आपला सर्वात मोठा शत्रू.
This letter is solely responsible for the downmarket status of house- ( wives, mothers)
Can't we just say- " मी घरी असते."
At least I say so assertively. Why do some of us judge themselves and others by our earning capacity?

गृहिणी जर येन केन प्रकारे घरात दमडी आणत असेल तर(च) तिच्या गृहिणी पदाला शोभा येते का?

Well, I have utmost respect for such ladies. Most of them are my friends.
यातल्या किती तरी जणी आपल्या अंगभूत गुणांनी लक्ष्मी घरात आणतात. उत्तम salesmanship skills हि त्यांची जमेची बाजू.
They may be those getting sarees, dress materials from Chennai, Baroda,Delhi, Banares and such far away places and putting up stalls or retailing them through their homes. The others do it by setting up Tupperware, Oriflame and other such agencies.

Some couple their salesmanship skills with some in-born artistic flair. It could then be cookery, drawing, craft, embroidery and other such classes. They are superwomen in the true sense.
काहींना शिकवण्या घेण्याचीही कला अवगत असते, त्यामुळेच हल्ली बालवाडी पासून व्यक्तिमत्व विकास शिबिर आजूबाजूला दिसतात.

Although I do not belong to this earning category, I still vehemently refuse to include this (च) in my biodata.
I may not possess these salesmanship skills, nor do I get any royalty for my writing abilities. I make sure this does not affect my self-esteem in any way. Neither do I harbour any feelings of guilt, nor do I let anyone take me for granted.
Of course I am more flexible and more easily available for my family but I make sure no one takes undue advantage of my status.
I am also lucky to have like-minded people around me.
मी काय करते यावर माझ्या जवळच्या स्नेहींचा स्नेह अजिबात अवलंबून नाही.

पण याहून निराळा विचार करणाऱ्यांची जगात अजिबात कमतरता नाही. कधी कधी " स्वतःला पैशात(च) मोजणाऱ्या " बायका भेटतात. मला हा अति महत्वाचा प्रश्न विचारतात आणि माझ्या कडून अपराधीपणा ची अपेक्षा करतात. आणि माझे उत्तर ऐकून स्वतःचा हिरमोड करून घेतात. काही जणी पुन्हा विचारत नाहीत, पण काही पुन्हा पुन्हा विचारातच राहतात, आता तर माझ्यासाठी त्यांची ओळख हीच झालीये.
Well, I take them all with a pinch of salt and prefer to keep this attitude intact.

तर या (च) ने असं काय मोठा फरक पडतो, या गैरसमजात जगणं आपण सोडून देऊया. Exclude it and experience how it works wonders for your status.

जाता जाता....... लहानपणी बाबांनी सांगितलेला एक किस्सा आठवला.
जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोरात होती तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी, आचार्य अत्र्यांना एकदा विचारले," संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ठीके. पण दर वेळी घोषणा देताना ' संयुक्त महाराष्ट्र झाला(च) पाहिजे म्हणायची काय गरज आहे? नुसतं झाला पाहिजे म्हटल्याने काय तो व्हयचा थांबणार आहे का?"
तेव्हा अत्र्यांनी त्यांना अतिशय समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले," साहेब, तुम्ही म्हणता ते चूक नाही, पण कल्पना करा तुमच्या नावातून सुद्धा 'च' (व्हान) काढला तर असा काय फरक पडणारे ? " साहेब गपगार झाले हे वेगळे सांगायला नकोच.
तर अशी हि 'च' ची महती.

Monday, July 25, 2011

सावर रे ..........

सविता,
आज तुझ्या स्मृतीदिनी तुझ्या आठवणींसोबत अजून बराच काही दाटून आलाय मनात.
आज मला माझ्या तमाम मित्रं-परिवाराला खूप काही सांगायचे आहे.
१) सर्वांनी स्वतःला स्वतःतल्या गुण-दोषांसकट स्वीकारा.
२) आपल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करून टाका, म्हणजे प्रायाश्चित्त हि शिक्षा वाटणार नाही.
३) आपली तुलना फक्त स्वतःशीच करा म्हणजे हेवा, मत्सर किंवा अपुरेपणाची भावना तुम्हाला स्पर्श हि करणार नाही.

आज अचानक हे तत्वज्ञान सांगायचे मी काय आरम्भ्लय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मी आत्ता वर जे काही सांगितलं त्यात वेगळं हि काहीच नाही. कुठल्याही स्व-मदत पुस्तकात अथवा अध्यात्मिक प्रवचनात हि असंच काहीसं ऐकायला मिळतं.
तुम्ही म्हणाल आम्हाला या कशाचीच कधीच गरज पडत नाही, आम्ही मुळातच आतून कणखर आहोत. खात्री बाळगा, असं असेल तर माझी काळजीच मिटली. माझ्या आजूबाजूला मला असेच वर्तुळ हवे आहे. पण आपल्या पैकी बरीच जणांना सुदृढ मन जपणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रत्येक ची एक दुखरी नस असतेच. त्यावर फुंकर घालायची प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीतच असतो. पण हल्लीच्या सामाजिक परिस्थितीत या क्षमता आपण गमावून बसलोय. या दुखर्या नसा आपल्या मनावर तर परिणाम करतातच, त्यामुळे आपले शरीर सुद्धा आतून पोखरू लागलेय. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा काहीशा कोंडीत आपण सापडलोय.

तरीही आपली मानसिकता बदलत नाही. खरं तर, तणावाचे पारडे जड झाल्यावर, लगेच तणावमुक्तीच्या पारड्यात आपण भर टाकली पाहिजे. पण आपण तसं न करता दिवस ढकलत राहतो.

१) आपल्या पैकी किती जण, मनाला दुखलं-खुपलं तर लगेच औषधपाणी करतात?
२) फेसबुक आणि ओर्कुट झटदिशी स्वीकारणारे आपण अजूनही नाईलाज आणि शेवटचा उपाय म्हणूनच समुपदेशकाकडे जातो.
३) स्पा थेरपीज नेमाने घेणारे आपण, मानसोपचार थेरपीज घेणे कमीपणाचे का समजतो?
४) एखादा त्या घेत असेल तर अशा माणसाला कुठलातरी शिक्का लावून मोकळे का होतो?

सविता, तू गेल्यावर, मी अशीच सैरभैर झाले.
आईंना जाऊन ५ महिनेच झाले होते.
तुम्ही दोघी होतात तेव्हा जग जिंकल्याच्या नादात असायचे मी.
तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक सोडून गेल्यावर मात्र जाणवले कि आता बाहेरचा आधार शोधायलाच हवा. नाहीतर आपले काही खरे नाही.
सुदैवाने एक पारडे जड झाले तेव्हाच दुसर्या पारड्यात भर घालायची तरतूद सुद्धा देवाने करून ठेवली होती. ती संधी मी घेतली व माझ्या दुसर्या एका मैत्रिणीकडे उर्फ समुपदेशकाकडे गेले. तिच्याशी बोलून मन मोकळे केले, मनात दाटून आलेली भीती तीचाशी शेअर केली. तिने मला कमालीचे आश्वस्त केले.

ह्या माझ्या कौन्सिलर मैत्रिणीचा एक सपोर्ट ग्रुप आहे. ' बोल सखी" नावाचा. ज्यात मीही सहभागी आहे. गेले ६-८ महिने आम्ही दर १५ दिवसांनी, एकत्र येतो. जर कुणा सदस्याला स्वेच्छेने मन मोकळं करायचं असेल तर त्याला प्राधान्य देतो. नंतर भवतालच्या परिस्थितीला अनुसरून एक एक विषय चर्चेला घेतो, ज्यात अनेक दृष्टीकोन समोर येतात, काही उपाय सुचवले जातात आणि एकूणच प्रत्येकीला आपापल्या मानसिक बैठकीचे सर्विसिंग करून घेता येतं.

दोन वर्षांपूर्वी, राजसच्या वर्तव्नुकी बाबत माझा मनात जरा गोंधळ माजला होता. आधी नेट वर सर्च केले पण गोंधळ आणखीनच वाढला. एका प्रसिद्ध लहान मुलांच्या कौन्सिलर कडे गेले, तर तिने आधी खिसा साफ रिकामा केला माझा आणि राजस ला कुठल्या तरी एका गटात वर्गीकरण करून ती चा कडे अस्लेली औषध घ्यायला सांगितली. तिच्या नादी न लागता, मि दुसर्या एका कौंसिलर कडे गेले.
तिथे मात्र माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मला माझे बाळ आणखी नव्याने उलगडले. त्याला कुठल्या हि कॅटेगरीत न बसवता, त्याचे वेगळेपण कसे जपले पाहिजे ते मला समजले. राजस हि त्यांच्या सेशन्स मध्ये खूप रमायचा, परत कधी जाऊया असे विचारायचा.

हे सर्वे सविस्तरपणे सांगायचा उद्देश एवढाच, कि आपल्या पैकी प्रत्येकालाच स्वतःची मदत अशी स्वतःच करायची आहे.
त्या साठी सर्वात आधी एक करा. जर खरोखर एखादा किडा मनात वळवळत असेल तर आधी त्याला सामोरे जा.
प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असे म्हणून प्रोब्लेम्स सुटत नसतात फक्त साठत असतात.

सविता...................तू हे करायला हवे होतेस. nothing in this world is worth risking your life for.

Friday, July 15, 2011

NACH GA GHUMA

नाच ग घुमा' साश्रू नेत्रांनी खाली ठेवलं. इतक्या सार्या भावनांची खळबळ माजलीये कि बस.
एवढ्या मोठ्या चित्र महर्षींची कन्या, पण एवढ्या खडतर अनुभवांना सामोरं जाण का असेल त्यांच्या नशिबात? बरं हे लेकीचं प्राक्तन आधीच जाणून कि काय, आई-बाबांनी तीनही मुलांना गांधीवादी विचारसरणी जपणाऱ्या तपोवनात शिकवलं. सिनेसृष्टीतली छान-चौकि घरात घुसू दिली नाही.तीन बायकांशी लग्न करून तिघींची जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. त्याही बहिणींच्या नात्याने एकमेकींशी वागल्या. मुलांना हि कधी आपल्या-तुपल्या ची सवय लवली नाही.
'हे विश्व ची माझे घर' हेच भालजींच्या स्तुदिओ तील वातावरण. अशा वातावरणात वाढलेल्या आबी मध्ये समर्पणाची भावना खोलवर रुजली. पाहिले लग्न कातकरांशी. १८ वर्षे मनोभावे संसार केला. तीन कन्या पदरी ठेऊन काटकरांनी अल्पशा आजारपणात जगाचा निरोप घेतला. तोवर विधात्याने थोडी का होईना खुंटी बळकट केली होती. संसार आणि मुली वाढवतानाच बी.एड आणि शिक्षिकेची नोकरी आणि नावावर घर हाताशी होतं. ताई गोव्याच्या प्रोपर्तीवर पाणी सोडून आल्या होत्या. आपला हिस्सा कधीच मागितला नव्हता, उलट दुसर्यांची सोय आधी बघितली होती. अजूनही माणसां वरचा विश्वास शाबूत होता.
रणजीत देसाईंची (दादा) भेट आणि नंतर त्यांच्या पत्रांचा सहवास खरतर मनाला पुरेशी उभारी देत होता. त्याहून जास्त मन काही मागत हि नव्ह्तं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दादांना संसार हवा होता. कोवाड च्या घराला सावली देणारं बाई माणूस हवं होतं. ताईन चे मन निर्णय घ्यायला पुरेसे तयार नसतानाही एकतर्फी निर्णय घेऊन दादा मोकळे झाले.
मनातल्या सर्व शंकांचे दादा समाधान करत होते. धीराचे शब्द ऐकवत होते. शब्दांना जंजाळात पकड नार्याचेच शब्द ते. मोह नाही पडला तरच नवल.
ताईंनी पुन्हा 'नाच ग घुमा' चा फेर धरला. दादांच्या मुलींना आपलं मानणा हे बालपणी च्या संस्कारांनी उपजतच शिकवलं होतं. दादा हि सावलीत रमले होते. पण एकरूप होऊन विरघळल्या फक्त माधवी ताई. यथावकाश येत गेलेल्या दुराव्याला कारणीभूत ठरली ती ताईंच्या प्रतिभेची हलकीशी झुळूक. जिला वादळ होऊन दादांच्या प्रतिभेला कधीच टक्कर द्यायची नव्हती., फक्त या आजवरच्या धडपडीत फुटलेल्या धुमारांना वाट मोकळी करायची होती. पण हे दादांना कधी कळलेच नाही. त्यात त्यांचा पिंड सच्च्या कलावंताचा. त्यांच्या प्रतिभेला स्तुती-सुमनांची न निघणारी कवच-कुंडले घट्ट चिकटली होती. त्यांना फसवे अनुयायी खरे भासू लागले व १४ वर्षे निमूट गाजावाजा न करीत आपलं संसार फुलवणाऱ्या व गाव वाड्यात आणून शिक्षीकी पिंड जपू पाहणाऱ्या ताई डोईजड वाटू लागल्या. आजवर ताईंनी आपले मानून जीव ओवाळून टाकलेल्या अप्तेष्टांचीही फूस दादांना लाभते. आणि आता दादान्सकट आपण कुणालाच नको आहोत हि जाणीव होताच ताई हादरतात.
दादांना विनवतात, मळभ दूर करायचा प्रयत्न करतात, पण आता सावली ची गरज संपलेली असते.
या हि वेळी ताईंचा सुकाणू अज्ञात शक्तींनी गच्च धरून ठेवलेला असतो. बेळगाव चे घर नावावर असते. मुलींच्या पंखात बळ येऊन त्या उडालेल्या असतात.
आणि 'नाच ग घुमा' चा फेरा आता मात्र ताईंनी निग्रहाने थांबवलेला असतो.

Friday, July 8, 2011

tumsa nahi dekha

बघावं तेव्हा कुठल्याही गल्लीत दिवसा ढवळ्या शाळकरी मुली आणि त्यांचे 'मित्रं' यांचे चाळे पाहून विटलेल्या माझ्या डोळ्यांना आज एक सुखद धक्का बसला. बरोबर माझ्या खिडकीखाली आत्ताही असेच एक जोडपे उभे आहे. पण इतके संयमी आणि इतके सज्जन जोडपे कि त्यांच्याकडे कौतुकाने पहात राहावे. असतील २५ विशी च्याच घरात. दोघात अंतर सव्वा फुटांचे. ओळख अगदी नवी कोरी दिसतीये, कारण संवादात बर्यापैकी खंड पडतोय. नवीन विषय काढून बोलायला दोघेही उत्सुक, पण उतावीळ अजिबात नाही. दोघेही चांगल्या घरातील बर्यापैकी शिक्षित वाटतायत. पेहराव साधा पण नेटका.गप्पा छान रंगल्यात, दोघं मधून मधून हास्य विनोद सुद्धा करतायत. तो नवीन विषय काय काढायचा ह्या विचारात गुंगलेला असताना, ती हळूच त्याचाकडे पाहून घेते आणि त्याच्या एखाद्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यात ती रंगली, कि तो तिला न्याहालतोय. कुठेही आचरटपणा नाही, फिदीफिदी हसणे नाही, एकमेकांच्या अंगचटीला जाणे नाही. सर्वात मला आवडलंय ते ह्या भेटीगाठीत कुठेही चोरटेपणाचा लवलेश नाही. इतर पोरीन सारखे तिने उगीचच उन्हाचे निमित्त करून तोंड लपवायला पुणेरी स्पेशल स्कार्फ बांधलेला नाही. वाह दिल खुश हो गया...........जियो !!!!!
.