बिल्डींग च्या खालपर्यंत मुलांचा गलका ऐकू येत होता.एरवी सुद्धा पार्किंग लॉट ला हा आवाज सवयीचा होता. तरीही आज कारण जरा वेगळे होते. आज पहिल्या मजल्यावरील सोहम ची बर्थडे पार्टी चालू होती. कॉलनी मधील १०-१५ पोरं, शिवाय शाळेतील आणि रिक्षातील मिळून तीसेक पोरांनी घर अगदी दणाणून गेले होते. त्यातच पोरांच्या आयांच्या गप्पाही तारस्वरात चालू होत्या. विषय अर्थातच शाळा,अभ्यास इत्यादी.
' मला तर ह्या CBSE पद्धतीने अगदी नाकी नऊ आणलेत बघ. काय बाई विचित्र हट्ट आपल्या शाळेचा? शेवटी ८वि पासून SSC फॉलो करायचे आहे न? मग ७वी पर्यंत हे CBSE चे भूत कशाला मारतात मानगुटीवर?'
' अग त्यांना वाटतं पुढे ११वी,१२वी ला मुलांना सोपे जाईल त्यामुळे.'
' अग पण म्हणून आत्ता दम निघतो त्याचे काय?'
' जाऊदे, मी तर अजिबात मागे लागत नाही सोहमच्या, आधीच गणिताची नावड, त्यात हा दोन इयत्ता पुढचा पोर्शन, या वेळी सहामाहीत गणितात काठावरच पास झालोय आम्ही. बाकीचे विषय छान जमतात त्याला.'
ह्या शेवटच्या वाक्याने सोहमची आजी चपापली. पण आत्ता पार्टीमध्ये काही वाद नको म्हणून चूप बसली. पण नंतर मैथिलीसमोर हा विषय काढायचाच हि खुणगाठ मनाशी तिने पक्की केली. हे काय बोलणे झाले मैथिलीचे, म्हणे मागे लागत नाही. शेवटी काही झाले तरी सोहम मुलगा आहे, गणित न येऊन कसे चालेल त्याला. कसली तरी नवीन फॅड एकेक हल्ली असतात या पालकांच्या डोक्यात. स्पर्धा दिवसेंदिवस किती भीषण होत चाललीये हे काय मी वेगळे सांगायला पाहिजे आता हिला?
पार्टी तर छानच झाली. मुलांना हि भरपूर हुंदडायला मिळाले. मैथिली खुशीत होती. चौधरी बाईनी नेहमीप्रमाणे खाण्याची चंगळ केली होती. त्यांच्या तारखा बघूनच हल्ली मैथिली घरी पार्टी ठेवत असे, इतकी तिला त्यांची सवय झाली होती. छोले-भटुरे चा अगदी जेवणासारखा पोटभरीचा मेन्यू सर्वांनाच खूप आवडला. बरोबर केक वेफर्स तर हवेतच. त्याशिवाय ती बर्थ-दे पार्टी कसली? बरं,पेपर दिश वापरल्यामुळे नंतर ची प्लेट्स घासत बसण्याचीही काही कटकट नव्हती. आता फक्त घरातला पसारा आवरला कि झाले.
८ खोल्यांचा तो पसारा आवरणे काही ५-१० मीनतांचे काम नव्हते. पण त्याचे काही मैथिलीला वाटत नसे. ती होतीच टापटीप घर ठेवणारी. चार पदार्थ कमी करील पण स्वच्छता पहिली. इतके दिवस तसे सासू असताना फार अंगावर पडले नाही मैथिलीच्या. पण आता त्या गेल्यापासून एकटीवर सगळी जबाबदारी येऊन पडली होती. पण मैथिलीची कधी तक्रार नसे. तिला पहिल्यापासूनच ह्या घराने असे काही सामावून घेतले होते कि कुरबुरीला कुठे वावच नव्हता.
सासू-सुनेचे नाते दृष्ट लागण्याजोगे सुदृढ होते. मैथिली आणि मंदार हि एकमेकांना पूरक होते. नाही म्हणायला सासरे तापट स्वभावाचे होते. राग आला कि त्यांना आपल्या बोलण्यावर ताबा ठेवता येत नसे. मग समोर कोण आहे, आपण काय बोलतो आहोत ह्या कशाचेच भान त्यांना राहत नसे. पण राग निवळला कि ते मनात काही ठेवत नसत. पण तोवर त्यांच्या वाग्बाणांनी समोरचा असा काही घायाळ होऊन जाई, कि त्यातून बाहेर येणे हे त्याच्या साठी अत्यंत क्लेशकारक आणि संयमाची कसोटी पाहणारे असे. मैथिली ला सुद्धा ह्या १२ वर्षात मंदार सोबत सासर्यांच्या स्वभावाचे काही कमी चटके बसले नव्हते. पण त्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या वाग्बाणांनी घायाळ झालेले चित्त क्षणात पूर्वपदावर आणण्याचे कसब आता सरावाने दोघांना चांगले जमले होते.
मंदार ला तर हा स्वभाव लहानपणापासूनच परिचित होता. बाबांचा मूड बघून घरात राहायचे कि खेळायला पळायचे हे ठरवण्यात मंदार चे बालपण गेले. मोठेपणीही चित्रात काही फारसा बदल नव्हता. बाबांच्या थार्याला तो कधी उभा राहिलाच नाही. समोरासमोर बसून कधी त्यांच्याशी बोललाच नाही. सर्व बोलणे चालणे आई मार्फत चाले.
पण त्या माउलीचे मोठेपण कि तिने कधीच बाप-लेकाच्या नात्यात कडवटपणा येऊ दिला नाही.
बाबांच्या प्रत्येक वागण्याचे समर्थन तिच्यापाशी असे. आपल्या घरातील माणसांच्या मागे ती माउली आयुष्यभर मूकपणे उभी राहिली. त्यांची सर्व स्वभाव वैशिष्ट्ये जपत राहिली. तिला फक्त देणेच माहित होते. तिच्या पूर्ण व्यक्तीमत्वात तिने नवर्याशी संपूर्ण समर्पित सहजीवन इतके बेमालूमपणे भिनवले होते कि स्वतःची साधी आवड-निवडही तिने नवर्याच्या आवडी-निवडीत एकरूप केली होती. स्वतःचे कुठल्याही बाबतीतले मत नवर्याच्या मतात एकवटून टाकले होते.
मैथिलीचे घरात सामावणे हि ह्या माउली नेच दुधात साखर मिसळावी इतके सुकर केले होते. पण मैथिलीला तिच्या सासूच्या दिव्यत्वाची खर्या अर्थाने जाणीव झाली ती सोहमच्या जन्मानंतरच.
सोहम च्या बालान्त्पणा च्या वेळी जेमतेम दीड महिना माहेरी राहून मैथिली घरी परतली. ते सुद्धा केवळ पहिले बाळंतपण माहेरी होते म्हणून नाहीतर ते हि टाळता आले असते तर बरे असेच तिच्या आईला झाले होते. पोटची पोर असली म्हणन काय झाले? मैथिलीच्या आईच्या घरची परीटघडी विस्कटली च न बाळंतपण करायचे म्हटल्यावर.
मैथिलीच्या माहेरी न कुणी फारसे येणारे न तिची आई कुणाकडे जाणारी. आई-बाबा आणि मैथिली या पलीकडे त्या घराने कैक वर्ष ४थे माणूस पहिले नव्हते. मैथिली सासरी गेल्यावर तर दोघांचेच जग. खरेतर एकट्या मैथिलीच्या आईचेच. मैथिली ची आई एकलकोंडी. आपण बरे आणि आपले घर बरे. शेजार, गोतावळा, मैत्रिणी असले तर बाहेर पुरते नसतील तरी दुःख मुळीच नाही. अशा वातावरणात मैथिली लहानाची मोठी झाली. तीही एकुलती एक. आईने कधीही तिला चुलत,आते,मामे भावंडात मिसळू दिले नाही. घरात कुठलेच सणवार साजरे होत नसत. त्या प्रसंगीही तिला कधी कोणाकडे राहायला पाठवले नाही. कधी काका,काकू, मामा, मामी, मौशी, आत्या हि नाती जवळून अनुभवुच दिली नाहीत. कुठलातरी पूर्वग्रह आणि एकंदरीत संकुचित मनोवृत्ती ह्यामुळे तिच्या आईने कुठल्या हि नात्याचा मुक्त मानाने न स्वतः आस्वाद घेतला न मैथिलीला घेऊ दिला.
पण मैथिली जात्याच लाघवी. तिला माणसांमध्ये राहायची, मिसळायची भारी ओढ. बालपण आईचे निमूट ऐकण्यात गेले. तिने सांगितले तशी मैथिली वागत गेली. बालपणीच्या सवंगड्यांनी भावंडांची उणीव काही प्रमाणात तरी भरून काढली. स्वतंत्र विचार करायची अजून अक्कल नसल्याने एकूण मैथिलीचे बालपण चारचौघांसारखे मजेत गेले. पण मोठी होत गेली तसतशी मग तिच्या आईने तिच्या मानगुटीवर अभ्यासाचे भूत बसवायला सुरवात केली. त्यापायी तिच्यावर लादलेल्या बंधनांनी तिचे व्यक्तिमत्व कोमेजू लागले. वय वाढत होते तसे शाळा कॉलेजातील विविध उपक्रम मैथिलीला खुणावत होते. स्नेह-संमेलनात भाग घ्यावा, आपल्या क्षमता पडताळून पहाव्यात, सर्व प्रकारच्या कला-क्रीडांचा निदान अनुभव तरी घेऊन बघावा असे ते मोरपंखी दिवस. पण अभ्यास व्यतिरिक्त इतर काहीही करायला आईने तिला सक्त बंदी घातली होती. त्याउपर पुढे पुढे जेव्हा मित्र-मैत्रीणींन मध्ये सुद्धा मिसळणे ह्यावर हि गदा आली तेव्हा मात्र मैथिलीला अभ्यासाची शिसारी यायला लागली. ती लांब पळू लागली अभ्यासापासून. पुस्तक समोर धरून बसे पण लक्ष असे इतर मनोव्यापारात गुंग. तिचे अडनिडे वय, त्यात पडणारे असंख्य प्रश्न, भावभावनांचा कल्लोळ ह्याचा निचरा करायला जेव्हा सम वयस्कांची संगत सुद्धा मिळेनाशी झाली तेव्हा मात्र मैथिलीचा संयम संपला. तिचे अभ्यासावारचे लक्ष पूर्ण उडाले आणि एकलकोंडे भकास आणि दिशाहीन आयुष्य मैथिली जगू लागली. वर पाहता सगळे आलबेल होते. मैथिली दिवस चे दिवस घरीच असायची, हातात कायम पुस्तक ते हि अभ्यासाचे, अगदी आई च्या आज्ञेत नाकासमोरून चालणारी आपली मुलगी पाहून आईला वाटायचे सगळे सुरळीत तर चालले आहे. पण ती होती वादळा पूर्वीची शांतता.
खरे वादळ सुरु झाले मैथिलीच्या १२वी च्या निकालानंतर. प्राथमिक इयत्तांमध्ये कायम पहिला नंबर पटकावणारी मैथिली ची गाडी हळू हळू माध्यमिक इयत्तात ८०% वरून १२वी पर्यंत ६०% वर घसरली.
मैथिली च्या आईसाठी हा खूप मोठा धक्का होता. तिच्या तो सहजासहजी पचनी पडणारा नव्हता. मैथिली ला बी.एस्सी. करण्यावाचून कोणताच पर्याय नव्हता. ह्या अपयशाने आपल्या मुलीबद्दल कधीही न भरून येणारा काद्वात्पणा आईच्या रोमारोमात दाटून आला होता. जखमी पक्षाला जसे चोची मारून जातभाई मारायला सोडतात, तसे जाता येता मैथिली ला आईचे टोमणे ऐकावे लागत.
घरी-दरी, बाहेर लोकांसमोर मैथिली बद्दल सतत अपमानास्पद वक्तव्य करणे आईने चालूच ठेवले. या सर्व प्रकाराने आधीच मैथिलीचा खालावलेला आत्मविश्वास अजून पार रसातळाला गेला नसता तरच नवल. आपण ' गुड फॉर नथिंग ' आहोत हे तिच्या अंतर्मनात आईने खोलवर बिंबवले होते. शेअर करायला मैत्रीण नाही,भडभडून रडायला खांदा नाही असे मैथिलीचे दिवस जात होते. आई विरुद्ध तक्रार कुणाकडे आणि काय करणार? घरातली गोष्ट मनमोकळे करायला भावंडं नाही आणि बाहेर बोलताना संकोच्युक्ता अपराधीपणा आड यायचा.
त्या कठीण वर्षातून तिला तारून नेणाऱ्या दोनच गोष्टी होत्या. एक म्हणजे तिचे बाबा आणि दुसरे बाबांनीच लावलेला संगीताचा षौक. मैथिलीचे बाबा हे तिचे एकमेव विसाव्याचे ठिकाण होते. अतिशय हुशार शैक्षणिक कारकीर्द असलेले तिचे बाबा स्व-कर्तुत्ववान आणि धडपडे होते. नोकरी करता करता व्यवसायात केलेला शिरकाव त्यांना काही वर्षातच अपयशामुळे आटोपता घ्यावा लागला. पण कुठल्याही परिस्थितीत न डगमगणारे मैथिलीचे बाबा घरच्या आघाडीवर कधीच शरणागत झाले होते. बायकोच्या कायम मोडता घालणाऱ्या, पाय खेचणाऱ्या स्वभावाने धंद्यात आलेले अपयश आणखी अधोरेखित केले. मैथिली लहान असेपर्यंत सारखे तिच्यात रमणारे बाबा ,ती मोठी होऊ लागली तसतशी, बायकोने घरात वसवलेल्या संकुचित वातावरणापासून दूर राहू लागले. ऑफिस सुटल्यावर मित्रांच्या अड्ड्यात आणि सिगरेटी-दारू च्या भोवर्यात रमू लागले. मैथिलीच्या आठवणीत रात्री ९ च्या आधी तिने बाबांना घरी आलेले कधी पहिलेच नाही. पुढे-पुढे तर हि वेळ वाढतच गेली.
पण बाबा कितीही उशिरा आले तरी, त्यांचे आणि मैथिलीचे असे खास विश्व होते. त्यात प्रामुख्याने होती गाणी. बाबांनी मैथिलीला जुन्या हिंदी चित्रपटातील तसेच अनेक मराठी भावगीतांची गोडी लावली. नवे ऐकलेले अथवा टीवीवर पाहिलेले एखादे गाणे ते मैथिलीला स्वतः म्हणून दाखवीत. त्यातील कवितेचा आणि चालींचा आस्वाद घ्यायला शिकवीत. प्रत्येक गीतकाराची , संगीतकाराची शैली सखोल पणे तिला उलगडून दाखवीत. मैथिलीच्या एकलकोंड्या विश्वात मग एक नवीनच पालवी फुटे. ती गाणीच मग तिचे सवंगडी होऊन जात. तिच्या मनातील प्रत्येक वादळ, कोंडी आणि घालमेल हि गाणी ऐकताना आपोआप व्यक्त होत. ' रूलाके गया सपना मेरा, बैठीहू कब हो सवेरा '
कधी हीच गाणी मनाची मरगळ झटकून टाकीत आणि नवी उभारी देत तिला समजावीत कि हे हि दिवस जातील.
झाले हि तसेच. बी.एस्सी करता करताच मैथिली एक कॉम्पुटर कोर्स हि करत होती. त्या सुमारास तिची आणि मंदार ची ओळख झाली, आणि काही दिवसांनी त्याने लग्नासाठी विचारल्यावर हिने सरळ घरी सांगून टाकले. उगीच प्रेमात पडून आणखी शिव्या खायला नको. मैथिलीची आई तिच्या लग्नाच्या खटपटीत होतीच. करिअर नाही जमले पोरीला तर सरळ तिला उजवून टाकायचा आईचा बेत ठरलाच होता. अनायसे चांगले स्थळ चालून आले असताना कशाला सोडा? पुढची बोलणी व्यवस्थित झाली आणि शेवटी मैथिली च्या काळोख्या जगण्यात आशेची बारीकशी तिरीप डोकावली.
घरचा व्यवसाय असल्यामुळे सासरी दांडगा जनसंपर्क होता. त्यात मंदार जगन्मित्र. कायम मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात. त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणाला मुकलेल्या मैथिली साठी मैत्रीचे भांडारच खुले झाले. घरात येणाऱ्या जाणार्यांचा सदैव राबता. सासर्यांना तर जेवणावळी घालून आप्तेष्टांचा मेळा भरवण्याची भारी हौस. तिचे पहिल्या वर्षीचे सर्व सण सासरी दणक्यात साजरे झाले. मैथिली चे ग्रहण एकदाचे सुटले होते. ती कमालीची मोकळी आणि बोलघेवडी झाली होती. सासरी राहून आपल्या माहेरच्या इतर नातेवैकांशी मोकळेपणी संबंध जोडू शकत होती. मामा-मामी कडे माहेरपणाला जाऊ शकत होती. चुलत,आते भावंडांशी नवर्या सोबत नव्याने मिसळू शकत होती. तिच्या तुरळक मैत्रिणींना सासरच्या घरी हक्काने बोलावू शकत होती. जे मधल्या काळात तुटले होते, ते सांधायचा सर्वतोपरी प्रयत्न मैथिली करत होती. अर्थात हे सर्व तिच्या आईची नाराजी ओढवूनच होत होते, पण आता तिला कशाची फिकीर नव्हती. आत्ता कुठे मनासारखे जगायला मिळत होते. मंदार ला सर्व कल्पना होतीच. तो हि तिला योग्य पाठबळ देत राही.
मग सोहम च्या जन्माची चाहूल लागली. मैथिली च्या सासरी तर सर्वांना आकाश ठेंगणे झाले. आप्तस्वकीयांनी डोहालेजेवाणांचा जोरदार बार उडवून दिला. माहेरचे बाळंतपण संपल्यावर सोहम आपल्या घरी आणला गेला. आजीबाईंनी कंबर कसली. रात्रीची जागरणे असुदेत, घरकाम असुदे, मैथिलीची काळजी असुदे, कुठे कुठे म्हणून त्यांनी कसूर ठेवली नाही. सासूच्या ह्या दर्शनाने मैथिली अंतर्बाह्य हेलावून गेली. माहेरी आई असताना, राहिलेली सुखाची उणीव जेव्हा सासू भरून काढते, तेव्हा देवाजवळ मागण्यासारखे दुसरे काही उरत नाही. असेच काहीसे मैथिलीचे होऊन गेले. सोहम ला घेऊन जेव्हा केव्हा मैथिली माहेरी जाई तेव्हा सुद्धा ती दोन दिवसात परत येई. कधीही जास्त दिवस राहायचा तिला आग्रह होत नसे तिथे. मैथिलीचे बाबा खूप गुंतायचे सोहम्च्यात पण त्यांचा हि इलाज नव्हता. माहेरी बाळंतपण असताना त्यांनीच तर मैथिली सोबत त्याची जागरणे रोज काढली होती.
सोहम हि आपल्या आजीच्या ओढीने लगेच तिथून चल म्हणायचा. मग सोहम दोन वर्षाचा झाल्यावर मैथिली आणि मंदार जवळच पण दुसर्या घरी राहायला गेले. मंदार ने आई ला वाईट वाटू नये म्हणून सांगितले कि आता आम्हाला थोडे टक्के-टोणपे बघुदे संसाराचे. तुमच्या पंखाखाली कायम राहून पांगळे होऊन जाऊ आम्ही. पण खरे कारण होते घरात नवी येणारी मैथिली ची धाकटी जाऊ. तिच्याशी जुळवून घेणे आपल्या आई-बाबांना जमले तरी खूप आणखी आपल्यामुळे कलह नको ह्या विचाराने मंदार वेळीच घरातून बाहेर पडला.
सोहम सिनियर केजीत गेल्यावर मैथिलीला साक्षी ची चाहूल लागली. मैथिलीने हि गोड बातमी फोन करून तिच्या बाबांना कळवली. आईकडून कौतुकाच्या पोचपावतीची अपेक्षा तिने गेली कैक वर्षे सोडूनच दिली होती. तरीही पुढ्यात जे वाढले होते त्याची कल्पनाच तिने केली नव्हती. बातमी कळल्यानंतर काही दिवसांनी तिला बाबांचा फोन आला. हे कळवायला कि हा जो काही निर्णय तुम्ही घेतलाय, त्यात आमची काहीच मदत अथवा जबाबदारी राहणार नाही हे व्यवस्थित लक्षात असू द्या म्हणजे झाले. बाबांच्या ह्या वक्तव्याने मैथिलीच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटची काडीही निसटावी तशी तिची गत झाली. आईचा निरोप तिच्यापर्यंत पोचला होता. आपण इतके नकोसे आहोत, हे सत्य तिला त्या दिवशी उमगले. इतका अलिप्तपणा असू शकतो एखाद्यात? असो. तिने खुणगाठ बांधली. होते नव्हते ते सर्व शारीरिक मानसिक बळ एकवटले. आणि एकट्याने सामोरी गेली ९ महिने गर्भारपणाला. मंदार सर्वतोपरी मदत करीत असे. सासू हि हाकेच्या अंतरावर होतीच. ९ व्या महिन्यात मात्र बळ तोकडे पडू लागले तशी महिनाभर सासूच्या कुशीत विसावली. साक्षी च्या जन्मानंतरही दीड महिना सासूने जे बाळंतपण केले त्याला तोड नव्हती.
कठीण काळ थोडा सरला. मुले, शाळा, जागरणे ,दुखणी-खुपणी ह्यात मैथिली पुरती बुडून गेली. मनातला कडवटपणा दाबून टाकीत आई-बाबांशी जोडलेली नाळ तिने कधीच तोडली नाही. पण ठराविक मर्यादे पलीकडे ती घट्ट होणार नाही, हे हि तिने आता स्वीकारले होते.
' झाली का आवरा सावर मैथिली? हे कधी येतायत मला न्यायला कोण जाणे? उशीरच झाला नाई ग बाबांना यायला?"
" अग आई, येतील म्हणालेत न बाबा तुला न्यायला? अत्रे काकांकडेच जमलेत न गाण्याची मैफिलीला?"
" हो तिथेच गेलेत ग, परवाच्या कार्यक्रमाची तालीम आहे न? पण आज पार्टीला तरी लवकर आटपायची कि मैफिल?"
"जाऊ दे ग, सोहम ला इतका वेळ आठवण तरी झाली का मोठ्यांची? दोस्त मंडळी भेटल्यावर काय? आता गिफ्ट उघडण्यात रंगलीयेत दोघं. झाला तर होऊदे उशीर. तू बस निवांत टीवी बघत. "
" नाही, मी काय सांगणार होते तुला, ते गणित जरा अवघड पडत असेल सोहमला, तर ट्युशन लाव न एखादी."
" हो, पुढे मागे लाविनच. आत्ता मंदार घेतोय त्याचा अभ्यास , पुरतंय तेवढं"
" असं कसं, काठावर पास होतोय म्हणजे पुरत नसणार ग. त्याच्यावर जास्त मेहनत घ्यायला हवीये तुम्ही."
" ती तर घेताच आहोत आम्ही आई. पण त्याची कुवत तेवढीच असेल तर आपण जास्त काही करू शकत नाही. उगीच नसत्या अपेक्षा ठेऊन नंतर रडत बसण्यापेक्षा हे बरं न आई?"
" मला नाही बाई पटत तुमचा हा विचार. अग मुलगा आहे तो, पुढे गणित पदोपदी लागणार. एवढा लैटली घेऊन कसं चालेल?"
" हे बघ आई, आता तो विषय सोडून दे. तुझं मन इतर कुठल्यातरी छंदात रमव जरा. आमचं आम्ही बघून घेऊ. आता असल्या काळज्या अजून किती वर्ष करीत बसणारेस. माझ्या वेळी नको इतका अभ्यासाचा बाऊ करून काय पदरात पडलं बघितलस न? आता तो पुढे काहीही करुदे, त्याला आमच्या दृष्टीने महत्व नाही. त्याने स्वछंदी, निखळ, निकोप जीवनानुभव घेत मोठं व्हावं हेच माझं स्वप्नं आहे सोहम च्या बाबतीत. तो जसा आहे, त्याच्या सर्व गुण-दोषांसहीत तो अमचा आहे, फक्त हाच विश्वास आम्हाला द्यायचाय त्याला. फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेम करायचंय आम्हाला त्याच्यावर. कुठल्याही चांगल्या-वाईट परिस्थितीत तो तग धरेल इतपत सामर्थ्य त्याच्या अंगी बाणवायचे आहे आम्हाला. "
हे सगळं आणि अजूनही बरचसं कधीतरी फाडकन बोलायचेच असे अनेकदा ठरवायची मैथिली. पण जीभ कधीच नाही रेटली. आजही तेच झाले. तिला ठाऊक होते बोलून टाकणे खूप सोपे असते. संयम ठेवणेच कठीण. त्यालाच मोठेपणा लागतो जो आपल्यात आहे. मग का वितुष्ट वाढवा? तिने विषय बदलत आईच्या हातात रिमोट दिला आणि म्हणाली,
" सोनी च्यानल लाव,आज ३ इडिअट्स लागलाय, बघ तुला आवडतो का?"