अज्ञानात सुख असतं म्हणतात ते काही उगीच नाही .
आपल्याला मारे वाटतं - आपण संपन्न , शिक्षित घरात जन्मलो , आपल्याला संधी उपलब्ध झाल्या , म्हणजे आपण रूढी परंपरांपासून , लिंग भेदा पासून मुक्त आहोत .
पण ......
एखादा अनपेक्षित क्षण असा आदळतो आणि आपल्या भ्रमाचा भोपळा फुटतो .
आपल्याला समजतं ....... आपण भराऱ्या घेतोय , पण आपलं आकाश बंदिस्त आहे .
आपण विहार करतोय ... ... पण आखून दिलेल्या परिघात .
' आखून दिलेल्या ' या कडे आपली डोळेझाक होते ..... .... तिथेच आपण चुकतो .
भ्रमात फिरत राहतो , मोठ्या बाता मारतो . आपल्याहून उच्च किंवा निम्न स्तरातील स्त्री वर्गा बद्द ल उसासे टाकत राहतो . लिंगभेद , जातीभेद , वर्णभेद इत्यादी सर्व प्रकारच्या विषमते बद्दल आपली मतं हिरीरीने मांडतो .
आणि अचानक एक दिवस हि विषमता आपल्या समोर दाण दिशी येऊन आदळते .
आपण गडबडतो , पण वस्तुस्थिती बदलत नाही .
आपल्या गावीही नसलेली एखादी शुल्लक घटना , जवळच्यांच्या भुवया उंचावून जाते .
आपण अतिशय निर्लेप मनाने भाग घेतलेल्या प्रसंगात , इतरांना नको ते कंगोरे दिसू लागतात .
आपल्याला अजिबात न शिवलेल्या विचारांनी बाकीचे ग्रस्त होतात .
आणि आपल्यावर कधीही कल्पना न केलेला घाव बसतो .
आपण दिवा स्वप्नातून जागे होतो .
घाव घालणारे आपलेच असतात . त्यांना न जुमानण्याची परिस्थितीच नसते .
पण तीच माणसं जेव्हा समजण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या त्यांचं आजवर माहित नसलेलं रूप दाखवतात तेव्हा तर उरलं सुरलं अवसान गळून पडतं .
प्रसंग अनेक येतात .
आपल्याला मुक्तपणे स्वछंदी वृत्ती जोपासत वाढवणारे आपले आई वडील , मुलगी लग्नाच्या बाजारात आली , कि सपशेल माघार घेतात , संकुचित वागतात , तेव्हा एखाद्या मुलीला हेच वाटत असेल .
सुनेच्या अंगभूत कलांचं सर्वत्र कौतुक करताना , तिने त्या कला घरापुरत्याच ठेवाव्यात , त्या घराबाहेर विस्तारू नये , हे जेव्हा तिला सुचवलं जातं , तेव्हा एखाद्या सुनेला हेच वाटत असेल .
बायको सोशल ड्रिंकर चालते , नव्हे तिला मागे न पडण्यासाठी सोशिअल ड्रिंकिंग साठी प्रोत्साहित करणारे नवरे , तिला हव्या त्या उपक्रमात भाग ' घेऊ देणारे ' नवरे जेव्हा केवळ पुरुष ग्रुप आहे म्हणून ट्रेक करू नको म्हणतात त्या बायकोला हि हेच वाटत असेल .
एकत्र वाढलेला , लाड करणारा , माहेरपणाला बोलावणारा भाऊ , जेव्हा बहिणी ने इस्टेटीवर सह्या करून तिचा वाटा त्याला देऊन टाकावा अशी अपेक्षा करतो , तेव्हा त्या बहिणीला हि हेच वाटत असेल .
अनेक उदाहरणं दिसतील आजूबाजूला . प्रत्येकाचं ठाम मतही असेल आपापल्या बाजूचं .
पण आपले बुरुज काही अंशी ढासळतात , हे मात्र खरं .
आता त्याला डागडुजी करून सावरून घ्यायचं , का पूर्णपणे जमीनदोस्त करून नव्याने किल्ला बांधायचा कि काहीच न झाल्यागत वावरायचं हे जिचं त