व्हॉटस ऍप क्रांती घडल्यापासून शाळकरी मुलांचे पालक विशेषतः आया यांना अल्लदिन चा जादुई दिवा मिळाला आहे . हि क्रांती घडण्यापूर्वी , मूल आजारी पडून त्याची शाळा बुडली , तर आयांचे हाल असत . खुद्द मी , लेका च्या वेळी बुडलेला अभ्यास उतरवून घेण्याकरता जवळच्या लांबच्या वर्गमित्रांच्या घरचे उंबरे झिजवल्याच्या आठवणी आहेत . पण व्हॉटस ऍप आलं , शाळा पालकांचे ग्रुप्स तयार झाले , आणि आयांची मोठी चिंताच मिटली .
मूल गैरहजर राहिलं , कि घरबसल्या बुडलेल्या अभ्यासाच्या इमेजेस ऑन रिक्वेस्ट ग्रुप वर मिळायला लागल्या . एखादं मूल शाळेत हजर राहून देखील नीट क्लास वर्क होमवर्क उतरवून घेत नाही , ती हि काळजी मिटली . अमुक वहीतलं तमुक पानावरचं अमुक प्रश्नाच्या तमुक उत्तराची शेवटची ओळ , बंड्या / बबडी ने अर्धवट लिहिली ? वांदा नाई . व्हॉट स ऍप झिंदाबाद .
काही छोटे मोठे निरोप जसं आज हे आणा , उद्या ते आणा , पोरं घरी येऊन नीट सांगत नाहीत त्याची खातरजमा करायला हा ग्रुप सज्ज असतो . शाळाबाह्य उपक्रम झाले , आंतरशालेय क्रीडा स्पर्धा झाल्या , ऑलिम्पियाडस झाल्या , त्यात कोण चमकले , अगदी फोटो , मेडल , ट्रॉफी सकट सर्व अपडेट्स पालकांना घरबसल्या / ऑफिसबसल्या मिळतात . मूलं शाळेत बरेचदा काही ना काही विसरून येतात , अथवा एकमेकांच्या पेन पुस्तकांची अदलाबदल देखिल होते . वर्गाबाहेरील एखाद्या उपक्रमात कधी कधी चक्क एका पायात आपला बूट तर दुसऱ्या पायात दुसऱ्याचाच बूट अशा अवस्थेत मूल घरी येतं . तीही शहानिशा ग्रुप वर होऊन लगेच दुसऱ्या दिवशी मुलं आपापल्या वस्तू परत मिळवतात .
तर एकूण रामराज्य आहे म्हणा ना !
पण कितीही सोयी आल्या , गॅजेट्स आली , त्याचा उपयोग करताना आपण जर ताळतंत्र सोडून दिलं , तर त्याचा त्रास च होताना दिसतो . या व्हॉट स ऍप ग्रुप्स च्या जगात एक एक पालक असे रथी महारथी सापडतात कि त्यांच्यावर हसावं कि रडावं असा प्रश्न पडतो . मुळात हल्ली झालंय काय , कि शाळा - शिक्षक म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि पालक - मुलं म्हणजे कन्ज्युमर अशी धारणा बऱ्याच पालकांनी करून घेतलीय . त्यामुळे यांच्या सतत काही ना काही तक्रारी असतात .
शाळेकडून एखाद्या उपक्रमाचा एस एम एस आला , कि लगेच ग्रुप वर पालक त्याची चिरफाड करतात . हे असंच का केलं , तसंच का ठरवलं ....वगैरे वगैरे . सगळ्यात आधी शाळेचा एस एम एस आला , कि ग्रुप वर लगेच तो शेर केला जातो . इथवर ठीक आहे , कारण काहींना वेळेवर मेसेज पोचत नाहीत . त्यावर कढी म्हणजे काही आया एकमेकींना विचारतात , "कोणाकोणाला आला मेसेज ? तुला आला का, मला नाही आला " मग या ला उत्तर देणं सुरु होतं . एक एक आयांचे हात वर येतात , मला आला , नाही आला, आला , नाही आला . दरवेळी यातून काय हशील होतं , हे मला ना सुटलेलं कोडं आहे . खूपदा त्यांना सांगावंसं वाटतं , बायांनो , नसतील येत शाळेचे मेसेज , तर शाळेत जाऊन सांगा , इथे डोकी लढवण्यातून काय होणारे ?
बरं , आता ग्रुप वरच्या सर्वच आया काही एकमेकांना ओळखत नसतात , पाहिलं देखील नसतं वर्ष वर्ष , मग कुणीतरी अति उत्साही मेम्बर टूम काढते , आपापले फोटो टाका . साधारण ३०-३५ इमेजेस येऊन आदळतात ग्रुप वर . नशीब ऑटो डाउनलोड ऑफ केलय म्हणून , नाहीतर रोजच्या रोज गॅलरी रिकामी करावी लागली असती .
ग्रुप नवीन होता तेव्हा अशाच अति उत्साही मातेने प्रत्येकीला आपापली आणि आपल्या मुलांची बर्थडेट टाकायला सांगितली . आता शे दीडशे आया असलेल्या ग्रुप वर रोज किमान एका छोट्याचा किंवा आईचा वाढदिवस निघतोच . मग रोज कोणा कोणाला ५० एक आया तरी बर्थडे विशेस पाठवत राहायच्या . त्यात व्हायचं काय , कि महत्वाचे निरोप , नोटिसेस पार दबून लपून जायच्या . माझ्या सकट काही समविचारी आयांनी हे थांबवायला सांगितलं तर आमचं कोणी ऐकेना . उशिरा का होईना , आता त्यांना हे पटलंय म्हणा किंवा सुरवातीचा उत्साह आता मावळलाय म्हणा , ती पीडा आता बंद झालीय .
तीच गत जोक्स , पोलिटिकल फॉरवर्ड्स असलेल्या पोस्ट्स . या देखील स्कुल ग्रुप वर नसाव्यात हा प्रस्ताव मांडला गेला होता . तो हि सुरवातीला धुडकावला गेला .त्यामुळे इतर कुठल्याही ग्रुप आणि हा ग्रुप यात काही वेगळा वाटत नव्हतं . ज्या गरजेपोटी या ग्रुप ची निर्मिती केली जाते , तो उद्देश साध्य होतंच नव्हता . या पोस्ट्स च्या गर्दीतून महत्वाचे अपडेट्स शोधात बसायला फार त्रास पडायचा . कालांतराने ते हि पटलं म्हणून आता ती भाऊगर्दी देखील आटोक्यात आहे .
या सगळ्यावर कहर म्हणजे परीक्षे च्या आदल्या रात्री जाग्या होणाऱ्या आया . नियमित पणे राहिलेलं मिळण्याची सोय असताना तेव्हा गायब असणाऱ्या , कधी काही न विचारणाऱ्या आणि दुसऱ्याला पाठवणाऱ्या , निवांत असणाऱ्या अथवा सो कॉल्ड बिझी असणाऱ्या आया , एक्झाम च्या एक दिवस आधी अचानक जाग्या होतात , मुलांच्या वह्या तपासल्यावर त्या अपूर्ण आहेत असा साक्षात्कार झाल्यावर , त्या क्षण पासून ग्रुप वर त्यांचे रिक्वेस्ट्स पडायला लागतात . बरं , एखादा प्रश्न किंवा २/३ पानं यावर त्यांचं भागणार नसतं . २/३ विषयांचे धडे च्या धडे त्यांना इलेव्हन्थ अवर ला हवे असतात . एकदा अशा एका आई ला उर्मट वाटेल इतक्या स्पष्टपणे मी न राहवून सांगितलं , " प्लिज अशी लास्ट मिनिट मदतीची अपेक्षा करू नका . आमच्या मुलांना त्यांच्या अभ्यासातून उठवून तुम्हाला इमेज पाठ्वण्या करता त्यांच्या वह्या हातातून घेण्याची हि वेळ नाही . "
काही आयांना शे दीडशे मेम्बर्स एका ठिकाणी मिळाले कि ओपन मार्केट मिळाल्याचा फील येतो . मग पडायला लागतात टप्परवेर प्रोडक्ट्स च्या , ड्रेस मटेरिअल्स च्या ऑनलाईन मार्केटिंग च्या , इमेजेस आणि जाहिराती .
हा उद्देश देखील आता हणून पडला आम्ही तो भाग वेगळा .
तर मंडळी सांगण्यास आनंद होतो आहे कि सर्व निगेटिव्ह गोष्टींची चाळणी होऊन आता खऱ्या अर्थाने आमचा शालेय ग्रुप मार्गावर आला आहे .