#podbean_palmacres#
कुठलीही नवा बदल स्वीकारायला आपण सहसा पटकन तयार होत नाही .
त्याच न्यायाने हि गोष्ट मीही टाळत होते .
खूप करणं होती माझ्याकडे . तीही अगदी व्हॅलिड .
आहे ते काय वाईट आहे , कुठे झेंडे फडकवायचेत , आहे ते कोणी वाचत नाही ,
नेहमी वाचणारे इथेच वाचणार आहेत , ते कुठे तिथे येणार आहेत , वगैरे वगैरे.
सांगणारे नुसतं काहीतरी किडा डोक्यात सोडतात , त्यांना काय होतं मराठी वाचायला .... वगैरे वगैरे .
तर या मंडळींनी , म्हणजे माझ्या शाळा मित्रांनी मला माझे मराठीतले लिखाण (?) ....ब्लॉगपोस्ट्स सगळं ऑडिओ फाईल्स मध्ये रूपांतरित करायला उद्युक्त केलं .
"गो विथ द टाइम्स " असल्या सगळ्या शेंड्या लावून घोड्यावर बसवून ,
अगं तुझं लिहिलेलं वाचायची खूप इच्छा असते गं ..... पण .....
असं म्हणून प्रसंगी हरबर्याच्या झाडावर चढवून झालं .
आणि शेवटी हो नाही करता करता .... त्यांचं ऐकायचं ठरवलं .
आणि लागले कामाला ( कि नसत्या उद्योगाला ?)
जाणकारांना आधी विचारलं , काय बुआ आहे हि पॉडकास्ट नावाची भानगड ?
गूगल केलं तरी नक्की कोणतं ऍप आपल्या गरजेपुरतं सुटेबल आहे या दृष्टीने मग स्वतःच शोधाशोध सुरु केली . एका मैत्रिणीने पण तिच्या परीने मदत केली. थोडी दिशा मिळाली .
आणि मग पॉडबीन नावाचं हे ऍप सापडलं .
इन्स्टॉल केलं , पहिली एक ट्रायल पोस्ट रेकॉर्ड केली , आणि एकूण प्रकार जमतोय असं आता वाटायला लागलंय.
तर सोशल मीडिया च्या परंपरेला अनुसरून ... ....
पॉडबीन वरील palmacres या ऑडिओ ब्लॉग ला देखील फॉलो आणि आवडल्यास लाईक करा हे आवाहन माझ्या इकडच्या मित्रपरिवाराला करते .
शंभर च्या वर लाईक्स किंवा हजाराच्या वर फ्रेंड्स असा जरी किमान बेसिक पॉप्युलॅरीटी चा निकष असला आणि त्यात दूर दूर तक मी कुठे बसत नसले तरी माझ्या थोडक्या पण मोलाच्या माणसांच्या कौतुकाने आणि उभारी च्या शब्दांनी मला सगळं भरून पावलं आहे .