#दो_और_दो_पांच#
लहानपणी जेव्हा अमिताभ चा हा सिनेमा पाहिला तेव्हा च या नावाबद्दल कुतुहल वाटलं होतं . चित्रपटातील दोन नायक छोटी सरधोपट सुरवात करून अनपेक्षित उत्तरा पर्यंत येतात आणि
हम वो है जो दो और दो पांच बना दे ..... करत मिरवतात.
काहींच्या आयुष्याचं गणित देखिल असंच असतं.
ठराविक गोष्टी जुळून आल्या कि सगळ्यांना साचेबद्ध ऊत्तरे मिळतात असा आपला समज असतो. पण मुठभर लोकांच्या बाबतीत तसे होत नाही. त्यांच्या 2+2 चं ऊत्तर नियतीने 5 दिलेलं असतं.
एकुलत्या एक नवसाने झालेल्या व्यक्ती ची जडणघडण कशी असेल? याचे ठोकताळे आपण बांधून टाकलेले असतात. अती लाडात वाढलेली , माणसांची आवड नसलेली अशीच असणार हा अंदाज लावून आपण मोकळे होतो. सुशिक्षित, सामाजिक संस्कार असलेल्या घरातून मुलांना अत्यंत सुरक्षित आणि मोकळे वातावरण मिळणार च असं आपण गृहीत धरतो.
कधीकधी वरवर सुरळीत वाटणार्या परिस्थिती त काहींना वेगळे च अनुभव वाट्याला येतात .
असे वेगळे अनुभव घेऊन वाढलेल्या व्यक्ती मूळ स्वभावानुसार एकतर बंडखोर तरी होतात किंवा सतत दबून राहिल्यामुळे स्वत्व तरी हरवून बसतात. मी आणि अभिजीत दोघेही या दुसर्या कणाहीन अवस्थेत मोठे झालो. बालपण तसंही भाबडंच असतं. पण वय वाढत जाते तसे आपल्या आणि इतरांच्या घरातील तफावत जाणवायला लागते. त्याच्याशी दोन हात करता येत नाही हे लक्षात येते. त्याच्या शी शक्य तितके जुळवून घेण्यात मग व्यक्तीमत्वाची असंख्य शकलं उडतात आणि त्याची दाहकता एखाद्या अनिष्ट छायेसारखी आयुष्यभर घिरट्या घालत राहते.
ही आमची दो और दो पांच ची गणितं अवघड जागेची दुखणी असतात.
ती सहज कुणालाही सांगण्याजोगी नसतात. मुळात ती आहेत हे मान्य करायलाच काही वर्षे लागतात. मान्य करायचं धाडस जमलं कि ऊरलेली उमेदीची वर्षे त्याच्याशी नमतं घेण्यात निघून जातात . आपल्या अवतीभवती बरंच काही घडून जातं तोवर. बरंच काही हातून निसटून ही जातं . आपण मात्र या चक्रात गटांगळ्या खात राहतो .
40 शी पार करेपर्यंत या अवघड दुखण्यांशी झगडत बाहेर पडून आपलं अवकाश चाचपडून स्वत्व कमावलेलं असतं. झाल्या गेल्या परिस्थिती ला , त्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेल्या माणसांना एव्हाना मनातल्या मनात माफ ही करून टाकलेलं असतं . आपण पालक झाल्यावर या गढूळ वातावरणाचा लवलेश ही आपल्या मुलांना जाणवू नये म्हणून आपण कमालीचे दक्ष असतो .
पण क्वचित प्रसंगी जुन्या खपल्या निघाल्या कि उघड्या जखमेतून क्लेशकारक आठवणी भसकन बाहेर येतात.
मित्रांच्या गप्पांमधे अगदी गृहीत धरल्यागत आईवडिलांबाबत उदो उदो करणारे किंवा सासूसासर्यांबाबत नाकं मुरडणारे विषय चघळले जातात. आम्ही अशावेळी कसनुसं हसून वेळ मारून नेतो.
सोशल मीडिया वरच्या ' भरलेलं घर' , ' माहेरची माया' , ' बाप नव्हे मित्र' टाईप साखरेच्या पाकात बुडवलेल्या पोस्ट्स चा भडिमार न वाचताच आम्ही पुढे जातो.
आईवडिलांच्या महत्त्वाच्या समारंभाला मुले त्यांच्या शी निगडीत आठवणी शेअर करतात तेव्हा हलकेच एक असूयेची लहर उमटून जाते .
नियती काही अगदीच निष्ठूर नसते . एक पारडं कमी भरलं तर दुसर्या पारड्यात भरभरून देते. आणि या अनुभवातून जाउन देखिल आपल्या माणसांबद्दल जराही कडवटपणा न धरण्याची शक्ती बाप्पा देतो.
और क्या चाहिए.........