आतापर्यंतच्या लेखमालेत आपण राहुल आणि रुचिता च्या रुपाने थोडं आजचं थोडं उद्याचं असं आपल्या घरातील नातेसंबंधांमधील समानतेचं प्रातिनिधिक चित्रण बघितलं. या श्रुंखलेतील शेवटच्या लेखात समाजाकडुन कोणत्या प्रकारची समानता स्त्रीला अपेक्षित आहे त्याचा परामर्श घेऊया.
आज घरी आई मारे ठरवते मुलामुलींना एक समान वाढवायचं. तसे प्रयत्न ही ती करते. मुलाला बेसिक स्वैपाक शिकवते, घर टापटीप ठेवायला प्रोत्साहन देते, घरातील इतर बारीक सारीक कामं करायला लावते. पण बाहेर अजूनही अशा आईला आळशीपणाचं लेबल लावलं जातं, मुलाला आपणच सगळं करतो बाहेर कोणी करत नाही अशी परिस्थिती दिसते. मुलाला दुसर्या मुलींशी वागाबोलायची रीत आई घरी लावू शकते. पण आपल्या मुलीशी बाहेर कोण कसं वागेल याची तिला खात्री देता येत नाही. घरी मुलींना सर्व मोकळीक देणारी आई बाहेरच्या जगापुढे मात्र हतबल होते. बाहेरचे जग अजून तसेच आहे, समाजाची मुलींना बघायची नजर ना आजवर बदलली ना कधी बदलेल. त्यामुळे आजही मुलींनी करायचा पेहराव, बाहेर रहायच्या वेळा किंवा संगत या बाबतीत आईला फार पुरोगामित्व दाखवता येत नाही.
जेव्हा समाज पुरुषाला आणि स्त्रीला 'माणूस ' म्हणून बघेल तेव्हा येईल खरी समानता.
जेव्हा रात्री अपरात्री बाहेर रहायची भिती स्त्री इतकीच पुरुषाला ही वाटेल..
जेव्हा केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेची जबरदस्त दहशत वाटेल....
जेव्हा दुष्कृत्याची लाज पिडीते ला न वाटता गुन्हेगाराला वाटेल...
जेव्हा सर्व स्तरातील पुरुषांना नाही ऐकायची सवय लागेल ...
तेव्हा समानता येईल.
जेव्हा स्त्रीदेहाचे बिभत्स चित्रण विकलं जाणं थांबेल ...
जेव्हा जास्तीत जास्त विधवा आपल्या मुलामुलींची लग्न स्वतः लावतील...
जेव्हा सर्रास एकुलत्या एक लेकी आईवडिलांचं क्रियाकर्म करतील...
तेव्हा येईल खरी समानता.
पण आज बघावं तर वेगळंच चित्र आहे. साधं महिला दिन साजरा होत असताना बघा...
महिला दिनी व्हाॅट्सअॅप वर दर वर्षी एक पोस्ट सतत फिरत असते.

ज्यात स्त्रीवर्गाचं तिळमात्र कौतुक नसतं, किंबहुना खिल्लीच उडवली जाते.
' रोजच महिला दिन आणि रोजच पुरूष दीन.'
वाचून मौज वाटते आणि यात दडलेल्या विसंगती मनात फेर धरू लागतात.

इकडे पहावं तर चित्र काय आहे......
स्त्रियांना जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायचा असतो ....

( पार्लर, खरेदी, स्नेहभेटी, सहली, सोशल मिडिया, वाचन, लेखन, नुसतं शांत बसणं )
( यादी क्रमवारी प्रमाणे नाही याची नोंद व्हावी )
त्या अगोदर करायच्या गोष्टींची भलीमोठी यादी मार्गी लावायची असते.
घरातल्या वयस्क, बाल ( यात बालपण कधीच न सुटलेला नवरा देखिल येतो ) वगैरे मंडळींच्या जायच्या यायच्या , खाण्या पिण्याच्या वेळा सांभाळूनच स्त्रियांचा प्रोग्रॅम ठरतो.
दीन पुरूषांची मात्र हक्काची रविवार ची भेेट , मनात आलं कि लंच डेट, मित्रांसोबत अचानक ठरलेलं आऊटिंग कधीच घरच्या व्यवधानांमुळे चुकत अथवा आपल्या सारखं फाॅरेवर रीशेड्यूल होत राहात नाही.

एखाद्या दिवशीची ही कथा तर मोठ्या गैरहजेरीचं विचारूच नका. एखादं मोठं आजारपण, कामानिमित्त टूर, अथवा लेडिज स्पेशल ट्रीप या पैकी काहीही घडायचं असेल तर आपल्याला हमखास विचारला जाणारा प्रश्न
' मग घरचं सगळं कोण बघेल ' दीन पुरूषांना विचारल्याचं कधीही ऐकिवात नाही.
'माझी एक गोष्ट जागच्या जागी नसते आणि ती मला मी स्वतः सोडून इतरांनी शोधून द्यावी' असं म्हणत घर डोक्यावर घेणारे दीन पुरूष जेव्हा त्यांच्या बायकांना ' तू कर की तुला हवा तो कोर्स , शीक त्यात पुढे, मी कधीच अडवलं नाहिए ' असं छातीठोकपणे सांगतात तेव्हा बायका का आपलेच पाय मागे खेचत राहतात हे कळतं. स्वैपाकात विशेष रस घेणार्या दीन पुरूषांच्या बायकोची मजाच मजा असा ही समज करून घेणारे असतात. पण त्या ही बायकांचा दिवस ओट्यापाशीच सुरू होऊन ओट्यापाशीच संपत असतो ही वस्तुसथिती आहे.
असो....माॅमस्प्रेसो द्वारे या ह्रदयी चे त्या ह्रदयी करत राहू एकमेकींची पाठ थोपटत राहू
समानतेचा जागर चालू ठेवू......जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.