Saturday, January 4, 2020

Comfortzone

Shivam , a shy child was weak in communicating with others. He would fall short of words while speaking to anyone. He loved the company of people but always stayed in his own world . This would create a barrier for him to jump into any kind of conversations. He could not contribute to the subject as he would not have paid attention to any of the ongoing dialogues. 
But Shivam was a gifted child . God had blessed him with a musical skills. He could reproduce any musical note on the toy piano that his parents had bought for him. He would listen to a tune and his fingers would recreate the tune on the instrument. His parents finally relieved that their boy had shown some inclination got home the synthesizer. He was also enrolled with a tutor to develop his inborn abilities . The tutor soon realized that Shivam was the fastest learner amongst all his students. 
Shivam's parents were on top of the world. They now wanted him to play the instrument confidently in public. Their sole motive behind this was to boost his self esteem. But Shivam being shy, stayed away from showing his skills in public. He liked  the comfort zone of being reclusive where he was not viewed, judged or criticized. 
After much prodding and encouraging for 1 or 2 years,  his family gave up and let him be. They decided to wait and watch.  They knew he had to leave the comfort zone on his own. 
And One fine day, Shivam did ............
His mother  would leave no stone unturned to get him out of the cocoon he had engulfed himself into. She  enrolled Shivam to a child orchestra through an audition. The fun-filled, accomodating atmosphere of the group helped him to mix with his peers. Each one of the group connected to the other through music. For Shivam there could be some connection beyond words. His music spoke for him. His mentors from the group guided him the whole year and they all set up a wonderful performance at the end of it. 
This was Shivam's first appearance in public and on a big scale.  Needless to mention the group rocked on stage.  Thereafter there was no looking back. He ventured out, did music shows and the world showered praises on him. Shivam revelled in the confidence boosting appaulause.
The comfort zone was finally left behind.
The duckling had realised that he was indeed a swan.
#AmWriting 


Monday, December 30, 2019

Harunakos

"कशी आहेस परी? काल घरी आली नाहीस? आई म्हणाली हल्ली एकटी बसून असते परी,  कुठे जात नाही,  कोणाला बोलावत नाही.  तू आमच्या कडे आली नाहीस असं आजवर कधी झालं नाही,  मग ठरवलं आपणच जायचं परी ला भेटायला. 
मला सांग "कशी आहेस परी? काल घरी आली नाहीस? आई म्हणाली हल्ली एकटी बसून असते परी,  कुठे जात नाही,  कोणाला बोलावत नाही.  तू आमच्या कडे आली नाहीस असं आजवर कधी झालं नाही,  मग ठरवलं आपणच जायचं परी ला भेटायला. 
मला सांग तुला कसलं टेन्शन आहे का? काही तरी बोललीस,  शेअर केलंस तर मोकळं वाटेल,  आई बाबांशी नाही तर मैत्रिणींशी बोल,  मला सांग, पण अशी एकटी कुढत बसू नकोस. 
परी थोडी सैलावली.  " आत्या,  अगं,  तुमच्या साठी हे खूप कॅज्युअल असेल,  पण मला विसा रिजेक्ट झाल्यापासून सगळं संपल्यासारखं वाटतंय. माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे गेल्या आहेत,  मीच एकटी रखडले आहे.  त्यामुळे त्या मला काय धीर देणार, त्यांचं लाईफ तर सेट आहे.  हे अख्खं वर्षच खराब गेलं ग. काल तुझ्याकडे न्यू इयर पार्टी ला यायचा मूडच नव्हता.  या वर्षी आबा गेले, चांगले धडधाकट असताना गेले, बाबांना माईल्ड अटॅक येऊन गेला,  माझ्या विसाचं हे असं भिजत घोंगडं तसंच आहे,  जाॅब पण मनासारखा नाही,  विसाचं होईल म्हणून आहे ते चालवत होते पण आता पेशन्स चा कडेलोट झाला आहे. काही करायला,  कुठे जायला नको वाटतं. "
" परी मला ठाऊक आहे तुझी किती जबरदस्त इच्छा आहे यूएस ला जायची.  या वर्षी खूप घडामोडी झाल्या, मला  मान्य आहे,  आबांचा तुझ्यावर आणि तुझा त्यांच्यावर किती जीव होता, हे आम्हाला माहित आहे.  आबा असते तर त्यांना तुझं असं खचून जाणं मुळीच रुचलं नसतं.  ते स्वतः खूप कणखर होते.  त्यांच्यात हा कणखरपणा कोणाकडून आला ठाऊक आहे ? त्यांच्या आई कडून, होय, तुझ्या पणजी कडून. "
"तुझ्या पणजीला 4 मुलं,  त्यातले एक आबा आणि बाकी 3 मुली.  तुझे पणजोबा वारल्यावर पणजी ने चौघांना एकटीने वाढवलं, मुलींची लग्ने लावून दिली,  तुझ्या आबांना ही चांगली नोकरी लागली,  त्यांचंही लग्न झालं आणि तुझ्या आईचा आणि मामाचा जन्म झाला.  एका किरकोळ आजाराचं निमित्त झालं आणि तुझ्या आईची आई दोन लहान लेकरांना मागे ठेवून अकाली देवाघरी गेली.  आबांच्या लेकरांना सांभाळायला आणि त्याचा उघड्यावर पडलेला संसार सावरायला पणजी ने पदर खोचला. पुन्हा एकदा उतारवयात मुलांना एकटीने मोठं करायची जबाबदारी खंबीरपणे पणजीने पेलली,  कल्पना कर आपल्या नातवंडाची आई होणं सोपं नव्हतं,  आबांच मुलंही आता मार्गी लागायच्या बेतात असताना परत एक अतिशय वाईट घटना घडली. आबांचा हाताशी आलेला मुलगा , तुझा मामा अचानक 20/21 व्या वर्षी चालता बोलता हार्टफेल ने गेला. तुझी आईअसेल तेव्हा 16/17 वर्षांची.  या आघाताने आबा पुन्हा कोसळले, पणजीला तर आभाळ फाटल्यागत झाले.  आता या बुडत्या नावेला सावरून धरण्यासाठी पणजीने होता नव्हता तो धीर एकवटला आणि आबा आणि तुझ्या आईसाठी पुन्हा उभी राहिली. पणजी होती म्हणून तुझे आबा दुहेरी धक्क्यातून सावरले, तुझी आई पणजीच्या खमक्या आधाराने कळती सवरती झाली, चांगले शिकून ऊत्तम करियर मध्ये स्थिरावली. तिचं लग्न, तिची  मुलं आणि तिची खुशाली सगळं डोळे भरून बघितल्यावरच पणजीने अखेरचा श्वास घेतला. "
या सगळ्या संकटाच्या मालिकेत तगून रहायचं बळ कुठून आलं असेल पणजीकडे? तिचंही मन कातरलं असेलच, हिंमत कधीतरी खचली असेलच,  पण या सगळ्याला मागे ठेवून तिच्या जबरदस्त इच्छाशक्ती ने दर वेळी ती पुढे पुढे जात राहिली,  मागचं उगाळत अडचणी कुरवाळत बसली नाही, हात पाय गाळून बसली असती तर आबा आणि नातवंडांचे हाल हाल झाले असते.  
परी, तुझ्या आईला तिच्या आजीकडून हेच बाळकडू मिळाले आहे, म्हणून आजवर तिला कधीच आपण कोणीच काळजीत बसलेलं पाहिलं नाही. हे वर्ष तुझ्या लेखी वाईट गेलं असेलही, पण म्हणून सगळं संपल्यासारखं वाटून घेऊ नकोस. बाबा आता त्याच्या तब्येतीबद्दल जागरूक झालाय,  ही विल बी फाईन. आबा सगळ्यांना अजून हवेच होते पण त्यांच्या 85 ला सुखासमाधानानं हिंडते फिरते असताना गेले हे नशीब आहे. तुझ्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण खात्री आहे,  विसाचं दार बंद झालं तरी अजून चांगल्या जाॅबचं दार नक्की उघडेल. 
हो आत्या, मला खूप बरं वाटतंय तुझ्याशी बोलून, पणजीची गोष्ट ऐकून तर अंगावर काटा आला.  परिस्थितीला सामोरे जाण्यातच शहाणपण आहे,  खचून जाऊन कुढत राहण्यात नाही. 
आता मागचं झालं ते झालं,  नव्या उमेदीने नवीन वर्षी जोरात प्रयत्न चालू ठेवीन मी, शेवटी सिर सलामत तो पगडी पचास .
दॅट्स माय गर्ल,  हॅपी न्यू इयर 
#माझेलेखन 




Wednesday, December 25, 2019

Pravassuru

हे ही वर्ष संपले.  अशी अजून किती भयभीत वर्षे जाणार कुणास ठाऊक? युगं लोटली तरी  स्त्रीचा निर्भयतेकडे प्रवास अजून संपलेला नाही. स्त्रीजन्म ,  मग तो कोणत्याही वातावरणात झालेला असो, मागास किंवा प्रगत, आपल्यासोबत आयुष्यभर साथ करणारी भिती घेऊनच येतो. ही भिती असते छेडले जाण्याची,  पाठलाग होण्याची,  घाणेरड्या स्पर्शाची,  चीरहरण करणार्या भेदक नजरेची,  हल्ला होण्याची,  मारले जाण्याची,  ॲसिड ने विद्रूप होण्याची. कधी कुठल्या वयात,  कपड्यात, वेळेत, कोणा ओळखी, अनोळखी व्यक्तीच्या रूपात ही भिती येऊन आदळेल हे सांगता येत नाही. सर्व खबरदारीचे उपाय आपणच करायचे . ही यादी लांबलचकहोत राहील,  पण ही भिती निर्माण करणारी मानसिकता कधी संपेल? प्रवास सुरूच आहे

Thursday, December 5, 2019

#ThisIsMe #AmWriting
I was a completely different person two decades ago. I had just entered adulthood with sad, gloomy memories of teenage. I was a timid adult with low self esteem and extreme lack of confidence. Although a science graduate with a diploma i was unsure of my career and future. I had an emotional void with no friends to share my deepest fears with. Being an only child,  i had no access to sibling comforts either.

I was married off at an early age and was equally clueless of this new phase ahead of me. To my great relief,  my marital household was a welcome change. It was a home that housed 3 generations and hustled and bustled on festivities with laughter of near and dear ones . This change in environment brought out the real personality that was dormant within me for many years.

Suddenly I had a new set of friends and relatives who welcomed me into their world. I started opening up, honing my communication skills which had limited scope earlier. I did fumble initially,  took time to gauge fake people from real, could not react or answer to subtle or direct remarks but eventually i learnt to face everyone boldly. I struck forever bonds with some wonderful people. I also learnt to keep few others at a distance.

The last 20 years of adulthood saw me learning a foreign language , conducting language courses, compering music shows and enjoying my current stint as a spoken English teacher. The love for writing has been my greatest strength throughout these years. Writing has helped me throw all the negative experiences out of my system. It has let me analyze situations, come to positive conclusions and also forgive the wrong doers in the process. I have been writing blogs for quite some time now both in English and Marathi and have been lucky to get encouraging reviews from social media acquaintances. Momspresso has been this amazing platform giving challenges in the form of weekly blogging prompts inspiring me to write on a regular basis.

Besides conquering the past, like everyone else, i too have unique characteristics that define "ME". Like most people of my gender, i too possess a strong sixth sense and intuitive instincts. Its my inner strength that keeps me away from hazardous situations and people. Whenever i followed them, they have  always stood by me and given "stop" or "proceed " signals at appropriate times. I judge people fairly enough to decide if i can open up with them or no. I am empathetic towards people and situations, t this keeps me grounded. Whenever i feel let down by others,  i question myself if I was up to the mark first.

There is an unapologetic side to me as well .I enjoy reading people who speak through their eyes. I am selfish to an extent . I like to give myself priority once in a while.  I never hold myself answerable to anyone except my conscience. I can be nasty during pre menstrual days.i get back to negative people when they cross their limits. I have no regrets for my past decisions . I am thankful to the bounty of exposure i was subjected to, it may have tried my abilities to the hilt but i have emerged a better and more learned person with each.
I love myself for being ME.
- Meenal Deosthale 

Tuesday, December 3, 2019

Target audience

 आई : अरे क्लास ला नवीन टी शर्ट घालतोयस?   बाहेर कुठे जाताना मग एकही बरा टी शर्ट राहात
 नाही. तोवर हे जुने होऊन जातील.

लेक : जाऊ दे न आई. Its ok.

अजून काही आईचं सुरू व्हायच्या आत , लेक तिथून कल्टी मारतो. आई आपल्या कामाला लागते. यथावकाश फेसबुक वर आपल्या पेज चे लाईक्स वाढले आहेत का, आपण टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोचतोय का हे बघत असते.......आणि.....
या विचारासरशी काहितरी लख्खपणे तिला जाणवून जातं. खरंच की , हेच ते नवीन टी शर्ट घालायचे कारण.
टा र्गे ट .........ऑ डि य न्स .
तो कुठे मिळणार आणि त्याकरता कसं प्रेसेंटेबल रहावं हे लेकाला बरोबर कळलं होतं.

Tuesday, November 19, 2019

100 words story.....tuch mazi lifeline.

तुझ्याशिवाय दिवस सुरू होत नाही आणि संपत ही नाही.  तू आहेस नव्या युगाचे प्रतीक. तू आहेस नव्या तंत्रज्ञानाचं फलित.  तू आहेस म्हणून आम्ही अपडेटेड राहतो, तू आहेस म्हणून आम्ही स्वतःला सर्वज्ञ म्हणवतो.  तुझ्या भरवशावर आम्ही आमच्या छंदांना वाट खुली करू शकतो.
तू शिरलास आमच्या आयुष्यात दोन घटका विरंगुळा  म्हणून,  पण आता मात्र तुझ्याशिवाय पान हलत नाही.
शाळेची नोटीस,  ऑफिसचे निरोप, परिक्षा नोंदणी, तिकीट बुकिंग,  बॅंक व्यवहार सगळं  तुझ्यामुळे सुकर होतं.
तू एक दिवस नसलास तर आमची पंचाईत होते.  आम्ही इतके अवलंबून आहोत तुझ्यावर कि तुझा क्षणिक विरह देखिल आम्हाला कासावीस करतो.
इंटरनेट........ होय, तूच आहेस आमची लाईफलाईन.
तुझे खूप खूप धन्यवाद.  

Sunday, November 3, 2019

Cancer


Cancer- बस नाम ही काफी हैं
या नावाशी जोडली गेलेली माणसं आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगळे काही सांगायला नकोच.  प्रत्येकाची केस वेगळी . कॅन्सर ग्रस्त ते कॅन्सर मुक्त हा प्रवास धडकी भरवणारा असतोच.  त्यानंतर देखिल हा विळखा सुटता सुटत नाही,  आणि कॅन्सर मुक्त व्यक्ती ही आयुष्यभर पेशंट बनूनच राहते .
या रोगाचा जालीम ईलाज असणारे किमीथेरपी नामक दुधारी अस्त्र कॅन्सर मुक्त शरीरात आपला ठसा कायमचा उमटून जाते.  हे दुधारी शस्त्र जसं कॅन्सर पेशींचा खातमा करतं,  तसंच निरोगी पेशीं सुद्धा याच्या तावडीतून सुटत नाहीत.  या निरोगी पेशींनी बनलेले अवयव एकदा का या शस्त्राच्या अमलाखाली आले कि त्या अवयवांची क्रियाशीलता कायमची बाधित होते. 
ह्रदयासारखा महत्त्वाचा अवयव या किमीथेरपी च्या वावटळीत सापडला कि त्या पेशंटला कॅन्सर मुक्त का म्हणावे हा प्रश्न पडतो.  ह्रदयाच्या पंपिग या कार्याची शक्ती मंदावणे हा त्या आघाताचा ठळक परिणाम.
याचा सर्वात त्रासदायक उपपरिणाम म्हणजे वाॅटर रिटेंशन म्हणजे शरिरात साठलेल्या पाण्याचा निचरा आपोआप न होणे . त्या मुळे शरीर भर येणारी सूज. यावरचा उपाय आपल्या स्वतःच्या terms and conditions घालतच येतो . यावर दिल्या जाणार्या diuretics या स्वरूपाच्या गोळ्या हे साचलेले पाणी लघवी वाटे बाहेर काढून टाकतात. 
या गोळ्या रोज नियमित डोस वाटे कायम घ्यायला लागणार्या पेशंटला दर तासाला प्रचंड प्रमाणात लघवी होते आणि त्या करता कोणत्या ही स्थिती त अगदी आजारी असला तरी लघवी करता जावंच लागतं.
ह्रदयाने कमकुवत शक्ती ने का होईना पण निर्विघ्नपणे  ( म्हणजे अचानक बंद न पडता ) कार्य करत राहावे म्हणून इतर cardiac medicines सुद्धा दिली जातात.  ही औषधे देखिल आपले काम करत असताना नको ते उद्योग करून ठेवतात.  यांच्या कृपेने पेशंटचे बी पी कायम लोअर साईड ला राहते. 
या सगळ्या सोपस्कारावर 'कॅन्सर मुक्त ' पेशंट उर्वरित आयुष्य व्यतीत करतो.  या मोठमोठ्या side effects च्या जोडीला अशक्तपणा,  मंदावलेली हालचाल या कुरबुरी ठाण मांडून बसलेले असतात. अशा परिस्थितीत पेशंटची साधारण जीवन शैली म्हणजे स्वतःचे विधी करून इतर वेळी आराम अशा स्वरूपाची असते.
या मधे जेव्हा तुम्हा आम्हा कोणालाही वर्षातून एकदा होणारा viral/flu सारखा किरकोळ परकीय हल्ला या पेशंटला होतो तेव्हा खुडत खुडत का होईना पण सुरळीत चालू असलेलं त्यांचं शरीर इंजिन पार कोसळून जातं .
ही infections तापा सोबतच पेशंटच्या आधीपासून लो असलेल्या बी पी ला पार रसातळाला नेऊन ठेवतात.  पेशंटला hypotension ( extreme low bp ) मुळे आकडी यावी तशी चक्कर येत राहते. पेशंटला complete bedrest जेवण/ विधि सर्व जागेवर देऊन सुद्धा या चकरा थांबत नाहीत तेव्हा अखेर हाॅस्पिटल ची पायरी चढावीच लागते .
ही केस स्टडी आहे माझ्या  ' कॅन्सर मुक्त '  आई ची . 2014 साली पूर्ण झालेल्या कॅन्सर ट्रीटमेंट नंतर अजूनही सरासरी वर्षातून एकदा या minor infections करता आमच्या हाॅस्पिटल वारी ने यंदा दिवाळीचा मुहूर्त साधला. 
Mediclaim cover ची पुरेपूर वसुली करणारा पेशंट असं आम्ही on a lighter note म्हणत असतो.
त्याच lighter note वर काढलेला हा दिवाळी स्पेशल सेल्फी विश
Happy Diwali