सविता,
आज तुझ्या स्मृतीदिनी तुझ्या आठवणींसोबत अजून बराच काही दाटून आलाय मनात.
आज मला माझ्या तमाम मित्रं-परिवाराला खूप काही सांगायचे आहे.
१) सर्वांनी स्वतःला स्वतःतल्या गुण-दोषांसकट स्वीकारा.
२) आपल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करून टाका, म्हणजे प्रायाश्चित्त हि शिक्षा वाटणार नाही.
३) आपली तुलना फक्त स्वतःशीच करा म्हणजे हेवा, मत्सर किंवा अपुरेपणाची भावना तुम्हाला स्पर्श हि करणार नाही.
आज अचानक हे तत्वज्ञान सांगायचे मी काय आरम्भ्लय असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. मी आत्ता वर जे काही सांगितलं त्यात वेगळं हि काहीच नाही. कुठल्याही स्व-मदत पुस्तकात अथवा अध्यात्मिक प्रवचनात हि असंच काहीसं ऐकायला मिळतं.
तुम्ही म्हणाल आम्हाला या कशाचीच कधीच गरज पडत नाही, आम्ही मुळातच आतून कणखर आहोत. खात्री बाळगा, असं असेल तर माझी काळजीच मिटली. माझ्या आजूबाजूला मला असेच वर्तुळ हवे आहे. पण आपल्या पैकी बरीच जणांना सुदृढ मन जपणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. प्रत्येक ची एक दुखरी नस असतेच. त्यावर फुंकर घालायची प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीतच असतो. पण हल्लीच्या सामाजिक परिस्थितीत या क्षमता आपण गमावून बसलोय. या दुखर्या नसा आपल्या मनावर तर परिणाम करतातच, त्यामुळे आपले शरीर सुद्धा आतून पोखरू लागलेय. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही अशा काहीशा कोंडीत आपण सापडलोय.
तरीही आपली मानसिकता बदलत नाही. खरं तर, तणावाचे पारडे जड झाल्यावर, लगेच तणावमुक्तीच्या पारड्यात आपण भर टाकली पाहिजे. पण आपण तसं न करता दिवस ढकलत राहतो.
१) आपल्या पैकी किती जण, मनाला दुखलं-खुपलं तर लगेच औषधपाणी करतात?
२) फेसबुक आणि ओर्कुट झटदिशी स्वीकारणारे आपण अजूनही नाईलाज आणि शेवटचा उपाय म्हणूनच समुपदेशकाकडे जातो.
३) स्पा थेरपीज नेमाने घेणारे आपण, मानसोपचार थेरपीज घेणे कमीपणाचे का समजतो?
४) एखादा त्या घेत असेल तर अशा माणसाला कुठलातरी शिक्का लावून मोकळे का होतो?
सविता, तू गेल्यावर, मी अशीच सैरभैर झाले.
आईंना जाऊन ५ महिनेच झाले होते.
तुम्ही दोघी होतात तेव्हा जग जिंकल्याच्या नादात असायचे मी.
तुम्ही दोघी एकापाठोपाठ एक सोडून गेल्यावर मात्र जाणवले कि आता बाहेरचा आधार शोधायलाच हवा. नाहीतर आपले काही खरे नाही.
सुदैवाने एक पारडे जड झाले तेव्हाच दुसर्या पारड्यात भर घालायची तरतूद सुद्धा देवाने करून ठेवली होती. ती संधी मी घेतली व माझ्या दुसर्या एका मैत्रिणीकडे उर्फ समुपदेशकाकडे गेले. तिच्याशी बोलून मन मोकळे केले, मनात दाटून आलेली भीती तीचाशी शेअर केली. तिने मला कमालीचे आश्वस्त केले.
ह्या माझ्या कौन्सिलर मैत्रिणीचा एक सपोर्ट ग्रुप आहे. ' बोल सखी" नावाचा. ज्यात मीही सहभागी आहे. गेले ६-८ महिने आम्ही दर १५ दिवसांनी, एकत्र येतो. जर कुणा सदस्याला स्वेच्छेने मन मोकळं करायचं असेल तर त्याला प्राधान्य देतो. नंतर भवतालच्या परिस्थितीला अनुसरून एक एक विषय चर्चेला घेतो, ज्यात अनेक दृष्टीकोन समोर येतात, काही उपाय सुचवले जातात आणि एकूणच प्रत्येकीला आपापल्या मानसिक बैठकीचे सर्विसिंग करून घेता येतं.
दोन वर्षांपूर्वी, राजसच्या वर्तव्नुकी बाबत माझा मनात जरा गोंधळ माजला होता. आधी नेट वर सर्च केले पण गोंधळ आणखीनच वाढला. एका प्रसिद्ध लहान मुलांच्या कौन्सिलर कडे गेले, तर तिने आधी खिसा साफ रिकामा केला माझा आणि राजस ला कुठल्या तरी एका गटात वर्गीकरण करून ती चा कडे अस्लेली औषध घ्यायला सांगितली. तिच्या नादी न लागता, मि दुसर्या एका कौंसिलर कडे गेले.
तिथे मात्र माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. मला माझे बाळ आणखी नव्याने उलगडले. त्याला कुठल्या हि कॅटेगरीत न बसवता, त्याचे वेगळेपण कसे जपले पाहिजे ते मला समजले. राजस हि त्यांच्या सेशन्स मध्ये खूप रमायचा, परत कधी जाऊया असे विचारायचा.
हे सर्वे सविस्तरपणे सांगायचा उद्देश एवढाच, कि आपल्या पैकी प्रत्येकालाच स्वतःची मदत अशी स्वतःच करायची आहे.
त्या साठी सर्वात आधी एक करा. जर खरोखर एखादा किडा मनात वळवळत असेल तर आधी त्याला सामोरे जा.
प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही असे म्हणून प्रोब्लेम्स सुटत नसतात फक्त साठत असतात.
सविता...................तू हे करायला हवे होतेस. nothing in this world is worth risking your life for.
Monday, July 25, 2011
Friday, July 15, 2011
NACH GA GHUMA
नाच ग घुमा' साश्रू नेत्रांनी खाली ठेवलं. इतक्या सार्या भावनांची खळबळ माजलीये कि बस.
एवढ्या मोठ्या चित्र महर्षींची कन्या, पण एवढ्या खडतर अनुभवांना सामोरं जाण का असेल त्यांच्या नशिबात? बरं हे लेकीचं प्राक्तन आधीच जाणून कि काय, आई-बाबांनी तीनही मुलांना गांधीवादी विचारसरणी जपणाऱ्या तपोवनात शिकवलं. सिनेसृष्टीतली छान-चौकि घरात घुसू दिली नाही.तीन बायकांशी लग्न करून तिघींची जबाबदारी अखेरपर्यंत निभावली. त्याही बहिणींच्या नात्याने एकमेकींशी वागल्या. मुलांना हि कधी आपल्या-तुपल्या ची सवय लवली नाही.
'हे विश्व ची माझे घर' हेच भालजींच्या स्तुदिओ तील वातावरण. अशा वातावरणात वाढलेल्या आबी मध्ये समर्पणाची भावना खोलवर रुजली. पाहिले लग्न कातकरांशी. १८ वर्षे मनोभावे संसार केला. तीन कन्या पदरी ठेऊन काटकरांनी अल्पशा आजारपणात जगाचा निरोप घेतला. तोवर विधात्याने थोडी का होईना खुंटी बळकट केली होती. संसार आणि मुली वाढवतानाच बी.एड आणि शिक्षिकेची नोकरी आणि नावावर घर हाताशी होतं. ताई गोव्याच्या प्रोपर्तीवर पाणी सोडून आल्या होत्या. आपला हिस्सा कधीच मागितला नव्हता, उलट दुसर्यांची सोय आधी बघितली होती. अजूनही माणसां वरचा विश्वास शाबूत होता.
रणजीत देसाईंची (दादा) भेट आणि नंतर त्यांच्या पत्रांचा सहवास खरतर मनाला पुरेशी उभारी देत होता. त्याहून जास्त मन काही मागत हि नव्ह्तं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. दादांना संसार हवा होता. कोवाड च्या घराला सावली देणारं बाई माणूस हवं होतं. ताईन चे मन निर्णय घ्यायला पुरेसे तयार नसतानाही एकतर्फी निर्णय घेऊन दादा मोकळे झाले.
मनातल्या सर्व शंकांचे दादा समाधान करत होते. धीराचे शब्द ऐकवत होते. शब्दांना जंजाळात पकड नार्याचेच शब्द ते. मोह नाही पडला तरच नवल.
ताईंनी पुन्हा 'नाच ग घुमा' चा फेर धरला. दादांच्या मुलींना आपलं मानणा हे बालपणी च्या संस्कारांनी उपजतच शिकवलं होतं. दादा हि सावलीत रमले होते. पण एकरूप होऊन विरघळल्या फक्त माधवी ताई. यथावकाश येत गेलेल्या दुराव्याला कारणीभूत ठरली ती ताईंच्या प्रतिभेची हलकीशी झुळूक. जिला वादळ होऊन दादांच्या प्रतिभेला कधीच टक्कर द्यायची नव्हती., फक्त या आजवरच्या धडपडीत फुटलेल्या धुमारांना वाट मोकळी करायची होती. पण हे दादांना कधी कळलेच नाही. त्यात त्यांचा पिंड सच्च्या कलावंताचा. त्यांच्या प्रतिभेला स्तुती-सुमनांची न निघणारी कवच-कुंडले घट्ट चिकटली होती. त्यांना फसवे अनुयायी खरे भासू लागले व १४ वर्षे निमूट गाजावाजा न करीत आपलं संसार फुलवणाऱ्या व गाव वाड्यात आणून शिक्षीकी पिंड जपू पाहणाऱ्या ताई डोईजड वाटू लागल्या. आजवर ताईंनी आपले मानून जीव ओवाळून टाकलेल्या अप्तेष्टांचीही फूस दादांना लाभते. आणि आता दादान्सकट आपण कुणालाच नको आहोत हि जाणीव होताच ताई हादरतात.
दादांना विनवतात, मळभ दूर करायचा प्रयत्न करतात, पण आता सावली ची गरज संपलेली असते.
या हि वेळी ताईंचा सुकाणू अज्ञात शक्तींनी गच्च धरून ठेवलेला असतो. बेळगाव चे घर नावावर असते. मुलींच्या पंखात बळ येऊन त्या उडालेल्या असतात.
आणि 'नाच ग घुमा' चा फेरा आता मात्र ताईंनी निग्रहाने थांबवलेला असतो.

Friday, July 8, 2011
tumsa nahi dekha
बघावं तेव्हा कुठल्याही गल्लीत दिवसा ढवळ्या शाळकरी मुली आणि त्यांचे 'मित्रं' यांचे चाळे पाहून विटलेल्या माझ्या डोळ्यांना आज एक सुखद धक्का बसला. बरोबर माझ्या खिडकीखाली आत्ताही असेच एक जोडपे उभे आहे. पण इतके संयमी आणि इतके सज्जन जोडपे कि त्यांच्याकडे कौतुकाने पहात राहावे. असतील २५ विशी च्याच घरात. दोघात अंतर सव्वा फुटांचे. ओळख अगदी नवी कोरी दिसतीये, कारण संवादात बर्यापैकी खंड पडतोय. नवीन विषय काढून बोलायला दोघेही उत्सुक, पण उतावीळ अजिबात नाही. दोघेही चांगल्या घरातील बर्यापैकी शिक्षित वाटतायत. पेहराव साधा पण नेटका.गप्पा छान रंगल्यात, दोघं मधून मधून हास्य विनोद सुद्धा करतायत. तो नवीन विषय काय काढायचा ह्या विचारात गुंगलेला असताना, ती हळूच त्याचाकडे पाहून घेते आणि त्याच्या एखाद्या मुद्द्याला प्रत्युत्तर देण्यात ती रंगली, कि तो तिला न्याहालतोय. कुठेही आचरटपणा नाही, फिदीफिदी हसणे नाही, एकमेकांच्या अंगचटीला जाणे नाही. सर्वात मला आवडलंय ते ह्या भेटीगाठीत कुठेही चोरटेपणाचा लवलेश नाही. इतर पोरीन सारखे तिने उगीचच उन्हाचे निमित्त करून तोंड लपवायला पुणेरी स्पेशल स्कार्फ बांधलेला नाही. वाह दिल खुश हो गया...........जियो !!!!!
.
.
Saturday, June 4, 2011
अवघड आहे.................
'to err is human ' हि खूपच प्रचलित अशी इंग्रजी म्हण आहे. त्यानुसार माणूस हा चुका करणारा प्राणी आहे हे समजते. त्या चुका जर सुधारता आल्या तर त्याला प्रगतीपथावर नेतात, आणि वाढवल्या तर त्याला विनाशा कडे नेतात. हे काही माणसाला आज उमगलेले सत्य नाही, तर पिढ्यानपिढ्या घडत आलेली गोष्ट आहे. तरीही आपल्या आजूबाजूला माणसे चुका करीतच असतात, आणि हि मालिका अव्याहतपणे चालूच राहते.
आज जी गोष्ट मी सांगणारे ती अशीच एका वाट चुकलेल्या माणसाची आहे.
तर हा आपला चारचौघांसारखा नाकासमोरून चालणारा उदय. भरलेल्या घरात, ऐश्वर्यात आणि लाडात वाढलेला असा उदय. धाकटे अपत्य आई-वडिलांच्या विशेष मर्जीतील असते असे म्हणतात, त्यात आपला उदय तर जुळ्या तील वाचलेला म्हणून अजूनच खास. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्याप्रमाणेच आई-वडील आणि मोठा भाऊ या सर्वांपेक्षा जरा निराळ्या, शांत स्वभावाचा, काहीसा अबोल पण कळी खुलल्यावर मस्त कोट्या करून सर्वांना हसवणारा असा उदय.
अबोल स्वभावाचा असूनही त्यामानाने उदय ने बर्यापैकी मित्रं अवतीभवती जमवलेले. कोमर्स घेऊन सी ए करायचा त्याचा मानस होता. आर्टिकलशिप च्या वर्षान मध्ये असताना त्याचे वर्तुळ आपसूक वाढत गेले. त्या वर्तुळात चक्क एका मुलीचा, तीही गुजराथी मुलीचा समावेश झाला. ती दोघं वरचेवर एकत्र हिंडू-फिरू लागली आणि थोड्याच अवधीत त्यांची मैत्री बर्यापैकी घनिष्ठ झाली. या गोष्टींनी घरच्या- दारच्या लोकांच्या भुवया ना उंचावत तरच नवल. उदय च्या आईने तसे विचारल्यावर त्याने सर्व हसण्यावारी नेले. पण आपल्या मुलातील हा बदल तिला जाणवल्याशिवाय राहिला नाही.
उदय ची वाहिनी जवळपास त्याच्याच वयाची.तिची आणि ह्या गुजराती मैत्रिणीची पटकन मैत्री जमली. तशी होतीच उर्मिला. गुजराथी असूनही मोडके-तोडके मराठी सुद्धा बोलत असे. कुणीही पटकन ओळख करून घ्यावा असा हसरा आणि बोलका होता तिचा चेहरा. डोळे मिचमिचे, हनुवटी निमुळती, चुणचुणीत आणि स्मार्ट अशी उर्मिला उदय च्या वाहिनीलाही आवडली. उदय,उर्मिला,वाहिनी आणि वहिनीची एक जिवलग मैत्रीण अशी चौकडी वारंवार एकत्र मिळून सिनेमा आणि हॉटेलिंग करत असत. एव्हाना दोघांचे गुपित वाहिनीला कळले होते. तिने त्यावरून उर्मिलाला छेडले हि होते. वाहिनी सारखी विचारायची तिला," बाई ग, घरून काय सांगून येतेस तू इथे? माहित्येय का त्यांना आमच्या उदय बद्दल? एकदा त्यालाही घरी बोलाव तुझ्या." त्यावर उर्मिला कानावर हात ठेऊन म्हणे," काही तरी काय वाहिनी, माझ्या घरचे खूपच कर्मठ आहेत. घरी बिरी नेला ना उदय ला तर माझे CA वगैरे सगळं बंद पडेल."
वाहिनीने त्यावेळी इतके मनावर घेतले नाही. तिला वाटले , जाऊदे , पोर इतकी मायाळू आहे आणि लाघवी आहे, इतकी आपल्यात मिळून मिसळून वागते, मोठ्या पासून लहानांपर्यंत सगळ्यांशी वागायची रीत माहिती आहे, अजून काय हवं? मग यथावकाश उदय आणि उर्मिला ची आर्टिकल-शिप संपली. दोघांना हि त्याच फार्म मध्ये ट्रेनी म्हणून सामावून घेतले आणि एकीकडे त्यांचे CA चे atempts देणे चालू होते. आता अभ्यास निमित्त उर्मिला वरचेवर उदय च्या घरीच पडीक राहू लागली. दोघेही उदय च्या खोलीत तासंतास बसून असत. इथवर सगळं ठीक होतं. पण हळू हळू जेव्हा त्यांनी खोलीचे दार बंद करायला सुरवात केली, तेव्हा वाहिनीला ते खटकायला लागले. तिने अनेक वेळा हि गोष्ट आपल्या सासूला म्हणजे उदयच्या आईला सांगून पहिली. पण कोणीच फारसे मनावर घेतले नाही. उदय चे बाबाही एरवी एवढे कडक पण ते हि सर्व कसे काय खपवून घेत ते वाहिनीला समजत नसे.
पुढे-पुढे घरातल्या सर्व सण-समारंभ, कार्यक्रमांना आणि पाहुण्यांसमोर देखील उदय ची खास मैत्रीण अशीच उर्मिला ची ओळख होऊ लागली. अगदी वाहिनीच्या माहेरच्या गोतावळ्यात हि तिची उपस्थिती लोकांना दिसू लागली.
पण एकदाही पट्ठी ने आपल्या घरी, किंवा समाजात किंवा आपल्या वस्तीच्या आसपास देखील उदय ला फिरकू दिले नव्हते. ते दोघे ऑफिस कलीग्स आहेत एवढेच तिच्या घरी माहित होते. हे सर्व आता वाहिनीला उदयच्या काळजीपोटी चांगलेच खटकायला लागले. उदय चा दादा हि आपल्या आईला ह्या सर्वाचा एकदाचा सोक्ष मोक्ष करायचा लकडा लावू लागला. मग उदय च्या आईने उर्मिला ला निक्षून सांगितले कि बाई आता काय तो एकदाचा निर्णय घे आणि तुझ्या घरच्यांचा कल बघ. नाहीतर फार पुढे जाण्यात काही अर्थ नाही.
प्रकरण गळ्याशी आल्यावर तिचा नाईलाज झाला आणि तिला घरी सांगावच लागलं. तिच्या अपेक्षेनुसार घरी वादळ उठलं. तिच्या आई-बाबांना समाजा बाहेरचा मुलगा मान्यच नव्हता. मग तिची आई आणि मावशी एकदा उदय च्या आई-बाबांना भेटायला आले, ते हि ना सांगता, अचानक.
त्या दिवशी वाहिनीचे डोहाळेजेवण दणक्यात साजरे झाले होते. मंडळी नुकतीच दुपारी आडवी झाली होती. आणि दारात उर्मिला ला घेऊन तिची मावशी आणि आई हजर. सुरवातीलाच त्यांनी सांगितले कि हे प्रकरण इथेच थांबवावे लागेल, कारण उर्मिला चे बाबा कधीच तयार व्हायचे नाहीत. मग उदय च्या दादाने त्यांना सुनावले कि इतका विरोध आहे हे माहित होतं ना उर्मिला ला, तर मग एवढी पुढे गेलीच कशी तुमची मुलगी? मग परस्पर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि शेवटी या प्रकरणावर एकदाचा पडदा पडला.
झाले त्यात नवल नव्हते. उदय ला एका चाणाक्ष मुलीकडून व्यवस्थित वापरले गेले होते. उर्मिला च्या लोभस मुखवट्या आड एक मतलबी, खुशालचेंडू आणि स्वार्थी चेहरा दडला होता. ३-४ वर्ष एका चांगल्या सधन, सुशिक्षित घरातील अत्यंत सालस आणि निरुपद्रवी मुलाला, जमतंय तोवर खेळवून शेवटी आपली प्रतिमा आपल्या समाजात स्वच्छ ठेवण्यात उर्मिला यशस्वी झाली होती. उदय च्या आई-बाबा ना हे छक्के- पंजे कुठे समजणार. पण त्यांनी सुद्धा जर वेळीच उदय ला लगाम घातला असता, तर उर्मिला ने एवढी मजल मारलीच नसती. पण आपल्या समाजात चरित्र बघतात ते मुलीचेच. मुलगा कुठेही शेण खावो, तो परत उजळ माथ्यानेच मिरवतो. हाच कित्ता उदयच्या बाबांनी गिरवला आणि एका शब्दाने आपल्या मुलाला जाब विचारला नाही. उलट हा विषयच आता घरातून बाद झाला.
उदय ने ट्रेनी जॉब सोडला आणि taxation चा पुढचा एक कोर्स केला. मध्ये मध्ये CA चे attempts देणे चालूच होता. पण त्यात म्हणावे तेवढे यश त्याला मिळत नव्हते. अशात दोन वर्ष सरली. आणि आता उदय चे आई-बाबा त्याच्या लग्नाचं बघायच्या मागे लागले. आधी उदय ने लक्ष दिले नाही, आत्ता नको मग बघू, करत टाळत राहिला. पण आईने हळू हळू त्याला तयार केलेच. मग शेवटी हो-नाही करत उदय ने एका वधू-वर सूचक संकेत स्थळावर नाव नोंदवले.
संकेत स्थळावरील नवी पद्धत उदय ला भलतीच रुचली. त्यामधूनच एका मुलीचे प्रोफाईल त्याच्या पाहण्यात आले. तिने त्याला आणि त्याने तिला सिलेक्ट केले. आणि च्याट वर दोघे एकमेकांशी बोलू लागले. पोरगा आयुष्याकडे नव्याने बघू लागलाय ह्याचे समाधान आई बाबांना वाटू लागले. पण त्यांनी मागल्या अनुभवावरून, पुन्हा उदयच्या हातून काही कामी जास्त होऊ नये ह्यासाठी तरी, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन वेळप्रसंगी त्याला त्याच्या चुकांची जाणीव आहे ना आणि त्यापासून तो सावधगिरी बाळगतो आहे ना, हे तरी तपासून पाहायला हेवे होते. आपला मुलगा एकदा ठेचकाळून सावरलाय, आताही कदाचित त्याचे फासे उलटे पडू शकतील, आपण जातीने त्याच्या उलाढाली तपासून पाहिल्या पाहिजेत , अशी कुठलीही खबरदारी या हि वेळी उदय च्या आई-बाबांनी घेतली नाही.
आणि एके दिवशी आपण च्याट करीत असलेल्या मुलीचे च स्थळ पहायचे असे उदय ने घरी जाहीर केले. इथवर हि ठीकच होते. पण घरी भेटण्यापूर्वी मुलीने उदय ला आधी परस्पर बाहेर हॉटेल मध्ये भेटायला बोलावले. हे हि काही वावगे नव्हते . पण त्यापूर्वी आपल्या मुलाचे कमकुवत व्यक्तिमत्व डोळ्यापुढे ठेऊन, त्याला जबाबदारीच्या समजुतीच्या ४ गोष्टी सांगून अथवा त्याच्या बरोबर कुणी पारखी नजरेचा सोबती पाठवले असते तर पुढे घडलेले रामायण कदाचित टळले असते.
पण म्हणतात ना.........विनाशकाले विपरीत बुद्धी.....
उदय जसा जोशात मुलीला भेटायला गेला त्याहून दुप्पट जोशात पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेत तो परत आला. आणि आल्यावर आईला म्हणाला," अग, मुलगी म्हणजे वैदेही ओळखीतालीच आहे आपल्या. आपल्या बाबांचे ते डॉक्टर मित्रं नाहीत का लुकतुके, ६० व्या वर्षी गेले ते? त्यांची सख्खी पुतणीच हि. एक मोठी बहिण आहे. ती आणि तिचा नवरा मुले बंगलोर ला असतात. भाऊ हिच्याहून एखाद-दीड वर्षांनी मोठा म्हणजे माझ्याच एवढा असेल. आणि आई-वडील आणि आज्जी असे कुटुंब. वरच्या मजल्यावर तिच्या विधवा काकू राहतात.
उदय तर संमोहित झाल्यासारखाच वागत होता. त्याचे आई-बाबा सुद्धा, मुलगी लुकतुके डॉक्टरांची पुतणी असे कळल्यावर पूर्णपणे निर्धास्त झाले होते. डॉक्टरांचा आणि उदय च्या बाबांचा जुना स्नेह. डॉक्टरांचे नाव मोठे आणि घर हि एकत्र पद्धतीचे. अगदी वैदेहीच्या आजी-आजोबांपासून हे घराणे बाबांना परिचित होते. बहिण भावंडांच्या भरल्या घरात वाढलेली, आणि एकत्र कुटुंबाची सवय असलेली मुलगी म्हटल्यावर उदयचे आई-बाबा आणखीनच निश्चिंत झाले. बघण्याचा कार्यक्रम नाममात्रच झाला, आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना आपला होकार कळवला.
पण दादा-वाहिनी खेरीज कुणीही वैदेही कडे नुसते व्यक्ती म्हणून पहिलेच नाही. जर पाहिले असते तर त्यांचे हि मत दादा-वाहिनी सारखेच झाले असते. दादा-वाहिनी ला वैदेही पाहिल्या भेटीपासूनच अजिबात रुचली नाही. एकतर कृष शरीरयष्टी च्या आपल्या भावाला एवढ्या स्थूल ठेवणीची वधू कितपत शोभेल हा पहिला प्रश्न दादाला पडला. एकवेळ बाह्य रूप जरी बाजूला ठेवले तरी तिची बेफिकीर उर्मट नजर, ताठ्याने भरलेली बॉडी लँग्वेज वाहिनीच्या नजरेतून सुटली नाही. वाहिनीने किंचित नाराजी व्यक्त करताच उदय ने तत्काळ तिला खोडून काढले आणि अति चिकित्सा करण्याबद्दल हटकले. अशा तर्हेने साखरपुडा हि झाला. साखरपुड्याला आलेले सर्व पाहुणे नवरीला बघून अचंबित झाले होते. असे स्थळ उदय च्या घरच्यांनी का म्हणून पसंत केले हेच कुणाला उमगेनासे झाले.
साखरपुडा आणि लग्न ह्या मध्ये ६ महिन्यांचा कालावधी होता. एवढ्या अवधीतही दादा-वाहिनी आणि वैदेही चे सूर कधीच जुळले नाहीत. वैदेही नेहमीच एक प्रकारच्या गुर्मीत वावरत असे. तिचे लोकांच्यात मिसळणे पूर्णतः कृत्रिम आणि अनैसर्गिक भासत असे. दादा-वाहिनीला सतत काहीतरी खटकत होते. वर वर सगळे छान होते. तयारी जोरदार सुरु होती. वैदेही च्या घरचे हौशी होते. पण जिथे घरात येणाऱ्या नव्या सदस्या बद्दलच म्हणावी तेवढी खात्री वाटत नव्हती, तिथे ह्या वरवरच्या गोष्टी काय कामाच्या? दादा आणि वाहिनी चा विचार हळू हळू पक्का झाला. त्यांनी जवळच असलेल्या दुसर्या जागेत वेगळी चूल मांडायचा निर्णय घेऊन टाकला. आपल्या भावजयीने आपल्या आई-बाबांना आपलेसे केले तरी खूप झाले, हे ओळखून दादाने हा निर्णय घरी सांगितला. त्य दोघांच्या अपेक्षे प्रमाणे या निर्णयाचे अतिशय थंड स्वागत झाले. उलट थोडा वाईट पणाच पदरी पडला दोघांच्या. पण याला दुसरा इलाज नव्हता.
लग्न दणक्यात झाले. उदय-वैदेही केरळ ला गेले. ते आल्यावर महिन्याभरातच दादा-वाहिनी ने वेगळी चूल मांडली. इकडे वैदेही चा जॉब हि सुरु झाला . मार्केटिंग चा जॉब म्हणजे सतत शहरभर फिरती. जाण्याची वेळ ठरलेली पण परतायची नाही. रात्रीचे ९ काय, १० काय नवी नवरी घराबाहेर. घरी आल्यावर सुद्धा स्वारी तडक आपल्या खोलीत आणि दार बंद. घरातल्यांशी कुठलाच संबंध नसल्या सारखे तिचे बेबंद वागणे हळू हळू उदय च्या आईला खटकू लागले. सकाळी ९-१० ला उठणे, स्वतःचे आवरणे कि घराबाहेर पडणे. काही महिने वाट पाहून उदयने आईच्या सल्ल्याने तिला जॉब बदलायला अथवा सरळ सोडायला सांगितले. आता सगळे ठीक होईल असे आईला वाटत होते. व्याही सुद्धा मानपानात कसली कसूर ठेवत नव्हते. सर्व वर्ष सण व्याह्यांनी, उदयच्या आईबाबांच्या मनासारखे साजरे केले. जी कसूर त्यांच्या मते, मोठ्या सुनेच्या माहेरी राहून गेली होती, ती सर्व नवीन व्याह्यांनी भरून काढली होती.
किती महत्व देतो ना आपण असल्या फालतू गोष्टींना? सर्व घराचे मांगल्य हे बाहेरून घरात आलेल्या बाईवर अवलंबून असते. माशी जर तिथेच शिंकली असेल तर ह्या मानपानाच्या झालरी काय कामाच्या. इथे हि तसेच झाले. जॉब सुटला तरी वैदेही चा पाय काही घरात टिकला नाही. स्वतःचे आवरून सकाळी ११ च्या सुमारास खोलीबाहेर यायची ती बाहेर जायच्या तयारीनेच. मग उगवायची थेट वाढलेल्या पानावर. दुपारची वामकुक्षी ३-३// तासांची. संध्याकाळी परत बाहेर ते रात्री परत वाढलेल्या ताटावर हजर. घरातल्या कुठल्याच बाबतीत इंटरेस्ट नाही, माणसांची आवड नाही, बिनधास्त वर्तणुकीत स्वतःला धन्य मानणारी वैदेही बेताल वागत होती आणि उदय तिच्या प्रत्येक वर्तणुकीचे थातूर मातुर समर्थन आईबाबान पुढे करीत होता.
जॉब सुटल्यानंतर वैदेहीचा घरातील पहिला गणेश -उत्सव आला. दादा वाहिनी हि आले होते. हरताळके ची पूजा नुकतीच आटोपली होती. वैदेही खोलीत गुडूप झाली होती. आणि बाकी मंडळी इतस्ततः पेंगुळली होती. इतक्यात दादा-वाहिनीला अतिशय प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली. दोघांनी चमकून एकमेकांकडे आणि लगेचच आईकडे पाहिले. आई सुद्धा कावरी बावरी झाली. एक उग्र दर्प उदय-वैदेही च्या खोलीतून येत होता. एव्हाना दादा-वाहिनीने तो दर्प ओळखला होता. आणि उदय ने हे काय नवे खूळ डोक्यात घेतले आहे असे आईला विचारणार, तोच दादाच्या लक्षात आले कि आपणच उदयला हार आणायला बाहेर पाठवले होते. आणि खोलीत तर वैदेही होती. आई, दादाच्या मनातील संशय ओळखून आणखीनच गार पडली. तिला जे काही दिवसांपासून जाणवत होते ते दादा-वाहिनी ला आल्या आल्या कळले. नव्हे आता तर त्यावर शिक्का मोर्ताबच झाले. त्या दिवशी, हरताळके च्या पूजेनंतर घरातले मांगल्य कायमचे हरपले. वैदेही ला सिगारेट चे व्यसन आहे हे कळताच मंडळी नखशिखांत हादरून गेली.
उदय ला याबाबत जेव्हा आईने जाब विचारला तेव्हा तो म्हणाला," अग, लग्नाआधी ती मला मोघम बोलली होती, पण मला वाटलं कि जाईल सवय हळू हळू. पण ती सवय फार पुढे गेली आहे. ती लग्न आधी बर्याचदा बिनधास्त पानपट्टी च्या ठेल्याशी जाऊन ओढत असे. पण आता तरी तसे करू नको, आमची लाज जाईल ,असे मी तिला बजावले आहे. म्हणूनच यावर उपाय म्हणून, सवय सुटेपर्यंत तिला मी आपल्या खोलीतच ओढ असे सांगितले आहे."
आईने कपाळावर हात मारून घेतला. उदय ने तिला यातले काही बाबांच्या कानावर न घालण्या बाबत विनवले. दादा तर कमालीचा खवळला होता. पण उदय च्या पडते घेण्याचा त्याला जास्त राग येत असे. दादाचा स्वभाव म्हणजे एक घाव दोन तुकडे. पण उदय आधीच मवाळ , त्यात स्वतः घेतलेला निर्णय आता कसाही करून साजरा करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. तो वैदेहीला सांभाळून घेण्याबाबत ठाम होता. हळू हळू ती निवळेल व कौटुंबिक प्रवाहात सामावेल अशी त्याला अशा होती. आईला त्याने कसे बसे थोपवले होते. दादा-वाहिनीला हि, आता आपला वेळीच वेगळे व्हायचा निर्णय अजिबात चुकला नाही, हे पुन्हा एकदा पटले. नवरा बायकोशी जमवून घेतोय न, घरातल्यांशी तिचे न का जमेना, असे मानून आईनेही आपली समजूत काढली. तरी व्हायचा तो त्रास कोणालाही चुकला नाही.
एकत्र कुटुंबातून आलेल्या वैदेहीने एकदाही त्यातले संस्कार उचलल्याचे आपल्या वर्तणुकीतून दर्शविले नाही. उलट आपल्या वाट्याचे कुणी हिरावून तर घेत नाही न याचीच तिला सतत धास्ती असे. दादा-वाहिनी जेवायला आले कि मुद्दाम त्यांच्यासमोर पोळ्या किती शिल्लक आहेत ते मोजणे आणि तसा उल्लेख करणे, आपापल्या वाढदिवशी दोघांचे चोरून केक आणून दोघांपुर्तेच सेलेब्रेत करणे असल्या गोष्टींचे घरात वैदेहीमुळे पेव फुटले. सर्वांच्या हे लक्षात येई. दादा तर घरी आल्या आल्या, आईने काही खायला दिले, तर प्रथम विचारी ,कि हे वैदेही ने नाही न आणले आणि मगच त्याला तोंड लावी. घरी येणारे पै-पाहुणे यांच्याशी हि वैदेही ने कधीच काहीच सोयर-सुतक ठेवले नाही. साधे बाहेर येऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलायचीही तिने कधी तसदी घेतली नाही. एकदा ओळख झालेल्या व्यक्तीला ती परत ओळख दाखवेल याची शाश्वती नसायची. वाहिनीवर तर ती आधीपासूनच खार खाऊन होती. जणू काही माहेरून ती शिकूनच आली असावी कि सासू आणि जाऊ यापासून सुरक्षित अंतर ठेऊनच वागावे, असेच तिचे दोघींशी वर्तन असे. त्यात वाहिनी आपल्या सासूची एवढी लाडकी म्हणून तिचा आणखी तिळपापड होई.
मग यथावकाश उदय आणि वैदेहीला एक गोंडस बाळ झाले- साहिल. आईला तर लहान मुलांचा प्रचंड लळा. आजी साहिल चे सर्व काही अत्यंत मायेने करायची. अनेकदा पहाटे रडणाऱ्या, जागवणार्या साहिल ला उदय, आजीकडे आणून सोडी आणि काही क्षणात आजी त्याला गाणी ऐकावीत झोपवे. त्याच्या खाण्या-पिण्याकडेही आजीचे जातीने लक्ष असे. पण वाहिनी ने जसा सोहम च्या बाबतीत आपल्या सासूवर डोळे मिटून विश्वास ठेवला तसे वैदेहीचे नव्हते.
एखाद्या मोलकरणीला विचारावे तसे बाहेरून आल्यावर वैदेही सासूला विचारी," अहो आई, त्याला काही खायला दिलंत कि नाही?" वास्तविक आईकडे तो काही ताक्ररीविना छान राहत असे. पण केलेल्याची जाण ठेवील ती वैदेही कसली.
हा रोजचा मनस्ताप आता आईला सहन होईना. वैदेही बदलायची चिन्ह दिसेनात. तशी नाईलाजाने आईने बाबांना, उदय-वैदेही ला वेगळे बिर्हाड करून देण्याची गळ घातली. वरची जागा रिकामी झाली तशी बाबांनी दोघांना आपला निर्णय कळवला. त्यावर बेदरकारपणे उत्तर मिळाले," जातो आम्ही वर, पण जास्त दिवस इथे नाही राहणार. वाहिनी वेगळी झाली तर तिला ५ खोल्यांचे घर दिले, तेवढे तरी आम्हाला द्यायचे. आम्हाला नाही राहायचे ३ खोल्यात."
आई-बाबांना वाईट वाटले, पण अजूनही कठोर शब्दात उदयची कान-उघडणी करायचे त्यांच्या मनाने घेतले नाही. हि कसली वेडी माया?. केवळ मुलगा दुरावेल या भीतीपोटी त्याच्या सर्व चुकांवर पांघरून घालण्याचा हा कसला अट्टाहास? दादा-वाहिनीला हा जगावेगळा न्याय काही केल्या समजेना. ती दोघं निमूट सर्व पहात आणि गप्प बसत. आपलं कर्म नेटाने करीत राहायचे एवढेच त्यांनी ठरवले होते. बाबांनी ३ खोल्यात पूर्ण रिनोवेशन करून फुल्ली फर्निश्ड ब्लॉक उदय च्या ताब्यात दिला. मंडळी दिवाळीच्या सुमारास वर राहायला गेली आणि आईने निश्वास टाकला. वाहिनी कित्ती वर्षांनी या दिवाळीत मुलांना घेऊन मोकळेपणी सासरी राहिली. घराचे ग्रहण थोडे का होईना सुटल्यासारखे वाटत होते. वर्षभरात आई-बाबांनी अनेक सहली केल्या. काश्मीर, केरळ,गोवा. खूप ठिकाणे फिरून आली दोघं.
सर्व काही सुरळीत चालले आहे असे वाटत असताना एकदा आई दादाला म्हणाली," अरे, परवा वैदेही कामाला बाहेर गेली होती आणि साहिल ने इकडे खाली कपडे ओले केले, म्हणून मी वर त्याचे कपडे आणायला गेले आणि कपाटात मला पुन्हा सिगारेट ची पाकिटे सापडली. काय करू रे, उदय च्या कानावर घालू का परत? मला तर काहीच सुचेनासे झाले आहे."
दादा ने तिला समजावीत म्हटले," सोडून डे आता, काही सांगायच्या फंदात पडू नकोस, नक्कीच उदय ला याची पूर्ण कल्पना आहे. त्यांचे ते आता बघून घेतील. "
पण नातवासाठी आजीचा जीव तुटत होता. त्याच्या बालमनावर ह्या वाईट सवयीचे पुढे होणारे दूरगामी परिणाम आजीला दिसत होते. पण आता वेळ निघून गेली होती. आजीला कळून चुकले होते, आपल्या हातात आहे तेवढे साहिल साठी करत राहायचे, पुढे तो आणि त्याचे नशीब.
आणि एके दिवशी आक्रीत घडले. आजी हृदयविकाराच्या झटक्याने तडकाफडकी भरल्या संसारातून निघून गेली. घरचे दारचे हळहळले. बाबा खचले. वहिनीची तर जणू आईच गेली होती. आता बाबा एकटे उरले मोठ्या घरात. उदय वर वेगळा झालेला, दादाही वेगळा झालेला. पण तिसर्या दिवशी दादा-वाहिनीचा निर्णय झाला होता. ते परत बाबांजवळ जुन्या घरी येणार होते. जवळच्या लोकांना हेच अपेक्षित होते. त्यांना एव्हाना कर्ता मुलगा कोण हे कळून चुकले होते.
साहिल आता थोडा मोठा झालाय. ३-४ वर्षांचा. आजी गेली तेव्हा आठवडाभर कावरा बावरा झालेला साहिल, आता आपल्या चुलत भावंडांशी खेळायला, खाली काका-काकू आणि आजोबांकडे येतो. त्याला मुलांची, माणसांची ओढ आहे. खाली असताना इतका रमतो कि दरवेळी जबरदस्तीने रडवून वर न्यावे लागते. पण हल्ली त्याचे वागणे वात्रट पणाच्या सीमारेषा ओलांडून फाजील पणाकडे जात असल्याचे दादा-वाहिनी च्या लक्षात आले आहे. तो रस्त्यात पडलेल्या सिगरेट च्या थोटका कडे बोट दाखवून ' हे आईचे' असे सांगतो. डाव्या तळव्यावर उजव्या तर्जनीने चोळल्या सारखे करून खोटे खोटे तोंडात काहीतरी खाऊन दाखवतो. त्याच्या तोंडात नको ते शब्दप्रयोग आलेत. कुणी रागावले, धाक दाखवला तर आक्रस्ताळेपणा करतो. त्याला सांभाळणाऱ्या बाईला फटाफट मारतो आणि बोच्कारतो. उदय त्याला वेळच्या वेळी ओरडत दटावत असतो, पण आई म्हणून वैदेही अजिबात त्याचे कान पिळत नाही. उलट त्याच्या फाजील चाळ्यांना तीच प्रोत्साहन देत राहते.
बाबा तर वास्तुशांत करून दिल्यापासून वरच्या घरची पायरीही चढलेले नाहीत. वैदेही सुद्धा कधी त्यांना आणि माहेरच्या माणसांशिवाय कोणालाच बोलावत नाही. बाबा तिला काडीचीही किंमत देत नाहीत, पण केवळ मुलाची बायको म्हणून सहन करतात.
बाबांचा एरव्ही जगप्रसिद्ध दरारा उदय च्याच बाबतीत कुठे लोप पावतो, हे आप्तस्वकीयांना अजूनही न उमगलेले कोडे आहे. पण दादा ने तोही अंदाज बांधला आहे. एकतर मुलावारची आंधळी माया, त्यात बघून ठरवून केलेले लग्न, अशा पेचात बाबा सापडणे स्वाभाविक आहे. उदय जरी खंबीर असता आणि वैदेही चुकतेय असे त्याने आधी स्वतः पाशी आणि घर्च्यान्पाशी कबूल केले असते, तरी बाबांनी त्याला या गर्तेतून बाहेर काढले असते. पण हेच उदय करीत नाही.
आजही वैदेही बद्दल उदयची काही कान-उघडणी केली तर दादा-वाहिनी च्या वाट्याला वाईट पणा खेरीज काही येत नाही. तो अजूनही तिच्या वागण्याचे समर्थनच करतो. तिचे व्यसन सुटणार नाही हे आता त्याने स्वीकारले आहे. त्याचे आपल्या मुलावर होणार्या दूरगामी परिणामान बद्दल त्याने सोयीस्कर पणे वेड पांघरलेय.
अशा प्रकारे ' विनाशकाले विपरीत बुद्धी' चा पाढा अजूनही चालूच आहे.......................................................................................................................

Tuesday, May 10, 2011
शुभेच्छा
#नवी पहाट
काल आपण भेटलो तेव्हा
नव्हता मोकळेपणा पूर्वीचा
पण जपत एकमेकांच्या भावना
चाचपडत गेलो भाव मनीचा
अवघडलेपण कधी नव्हे ते
का आले अपुल्या मध्ये
तुला मला जोडणारा धागा
का असा तुटला अर्ध्यामध्ये
आज असे नवी सुरवात तुझी
का पाणावती सारख्या कडा
हि खंत नव्हे रे जाणतोस तू हि
मला हि ना लागे मनाचा छडा
धागा जरी तुटला तरी
वीण आहे घट्ट अजुनी
क्षितिजावर हि पहाट नवी
देतेय साद पुन्हा नव्यानी
- मीनल देवस्थळे
काल आपण भेटलो तेव्हा
नव्हता मोकळेपणा पूर्वीचा
पण जपत एकमेकांच्या भावना
चाचपडत गेलो भाव मनीचा
अवघडलेपण कधी नव्हे ते
का आले अपुल्या मध्ये
तुला मला जोडणारा धागा
का असा तुटला अर्ध्यामध्ये
आज असे नवी सुरवात तुझी
का पाणावती सारख्या कडा
हि खंत नव्हे रे जाणतोस तू हि
मला हि ना लागे मनाचा छडा
धागा जरी तुटला तरी
वीण आहे घट्ट अजुनी
क्षितिजावर हि पहाट नवी
देतेय साद पुन्हा नव्यानी
- मीनल देवस्थळे
Wednesday, May 4, 2011
तुझे आहे तुजपाशी......
स्थलांतर हि आपल्यापैकी बहुतेक जणांना कमी अधिक प्रमाणात करावी लागलेली अशी गोष्ट आहे. त्यातही वर्गवार स्थलांतर हि पूर्णपणे ऐच्छिक अशी बाब समाजात फोफावल्याचे सध्या चित्र आहे. ह्या अतिशय केविलवाण्या अट्टाहास ला काही जण बळी पडल्याचे आपल्या आजूबाजूला दिसते. त्यात सर्वात आघाडीवर आहे तो निम्न वर्ग.
गडी, मोलकरणी ह्यांची पोरे,बाळे आपापल्या आई-वडिलांना "मम्मी-पप्पा" संबोधतात. माझी कामवाली, सावनी ला तान्हेपणी, नुकते शब्द उच्चारायला लागल्यावर, मला "मम्मी" म्हणायला शिकवीत असे. मी त्यापासून तिला तत्काळ परावृत्त करायला म्हटलेले मला चांगले आठवतेय " बाई ग, आमच्यात मम्मी-पप्पा नाही आई-बाबा "च" म्हणतात." तेव्हा तिचा चेहरा "काय मागासलेली मालकीण भेट्लीये" असे भाव स्पष्ट दर्शवित होता.
माझ्या घरी वास्तव्यास असलेली दुसरी मदतनीस मुलगी मला दर आठवड्याला ना चुकता ५ रुपयाचे "फिरली" क्रीम आणायला सांगायची. पाहिल्या वेळेस मला ह्या शब्दाचा काहीच अर्थबोध होईना. मी ५ वेळा तेच तेच विचारल्यावर तिने माझ्याकडे एकवार कीव करीत न्याहाळून पाहिले आणि म्हणाली," ताई, ते गोरं व्हायचं, टीवीत दाखवतात कि सारखं." मग माझी एकदाची ट्यूब पेटली आणि मी निमूट तिच्यासाठी" फेर अन्ड लवली" क्रीम आणू लागले.
हल्ली त्यांच्या लग्नात हि " दाजींचे" बूट लपवतात. त्याही पटापट रात्रीचे स्वैपाकपाणी आटोपून "उत्तरान" आणि बालाजी फिल्म च्या 'एक से बढकर एक' मालिका बघायला सरसावून बसतात. हि अशी अनेक उदाहरणे आसपास आढळतील. तरीही ह्यातील बरीचशी तशी म्हटली तर निरुपद्रवी आणि क्षणिक का होईना करमणूक करणारी म्हणायला हवीत.
पण माझ्या भुवया खर्या अर्थाने उंचावतात ते ह्याच अशिक्षित परंतु थोड्या सधन गटाकडे पाहून. ह्या मंडळींकडे घरी उच्च शैक्षणिक कारकीर्द, सुसंस्कारित बालपण नसते पण दारी किमान दोन तरी "फोरीन" चारचाक्या असतात. ह्यांच्या बायका टीवी वरील एकूणेक सिरिअल्स फॉलो करतात. एपिसोड गणिक बदलणाऱ्या लेटेस्ट वेशभूषा त्या परिधान करतात. आपापल्या अति "बीजी" नवर्यान शिवाय "माय फेर लेडी " टूर्स ला आदेश भावजी न बरोबर मज्जा करतात. ह्यांची पोरे ओन्ली कोन्वेंत शाळांमध्ये जातात. तिकडे शिकवलेले समजत काहीच नाही, त्यामुळे केजी टू पीजी ट्युशन क्लासेस चे चांगलेच फोफावते. पण हे सगळे करण्याचा त्यांचा मूळ हेतू सुसंकरीत, सुशिक्षित जीवन जगण्याचा नसून केवळ मध्यम वर्गीयांशी बरोबरी करीत उच्च वर्गात स्वतःला जाऊन बसवण्याचा अट्टाहास असतो. हाच गट आपल्याला जमले नाही म्हणून आपल्या पोरांना विविध रिअलिटी शोज मध्ये भाग घ्यायला लावतात. त्यात खरे नैपुण्य असणारे अगदी हाताच्या बोटावर सापडतील. पण त्या चिमुकल्या वयात त्यांना नखरेल लावणीचे अथवा आईतेम डान्स चे हावभाव तंतोतंत जमतात हे पाहूनच माझे काळीज तुटते. आणि हे बघून त्यांचे " मम्मी-पप्पा" भरून पावतात हे पाहून डोके सुन्न होते.
असो........त्यांच्या बौद्धिक पातळीची कीव करण्यापलीकडे आपल्या हातात खरेच काही नाही. आणि तसेही त्याबद्दल काही खेद आणि खंत हि नाही.
पण मध्यम वर्ग जेव्हा " हाय-प्रोफाईल" होण्याचा प्रयत्न करताना आढळतो, तेव्हा खरच काळजी वाटते. कारण जगात कुठेही जा, काहीही करा, हि मध्यमवर्गीय मूल्येच लांबवर तारून नेणारी आहेत. आणि हीच जेव्हा आजूबाजूला कात टाकल्यासारखी लोक फेकून देताना दिसतात तेव्हा खरेच वाईट वाटते. आपल्या ह्याच मूल्यांनी आपल्याला आजवर नितीमत्तेची शिकवण दिली, दुसर्यांना आदर-भाव द्यायला शिकवले, वाईट संगत आणि सवयीन पासून दूर ठेवले. पण हीच मुल्ये आज "बिलो-दिग्निती" समजली जातायत. मुक्त हस्ते आज आपण घरात वाईट सवयींना वावरू देतो. आपल्याला वाटते काय हरकत आहे, थोडी मजा करूयात, काय बिघडले. वयाच्या ह्या टप्प्यावर आपण काही आता वाया जाणार नाही. आता नाही तर काय म्हातारपणी मजा करणार? पण आपण हे विसरतो, कि आपली मजा आपल्या आजूबाजूला असलेली भावी पिढी बघत बघत मोठी होणार आहे.
घरात मातृभाशे चा वापर कमीत कमी ते अजिबात न करणे. का तर कॉन्वेंत मधली मुले गोंधळून जातील ना, कुठली संस्कृती आपली (?) म्हणून. ह्यांच्या जिभेला वळण "मम्मी-पप्पा" पेक्षा जरा वरचा श्रेणीचे" mom-dad " म्हणण्याचे. ह्या मुलांचे वाढदिवस मग mac -D मधेच साजरे होतात. ओवाळून घेणे आणि मोठ्यांच्या पाया पडणे बहुदा ह्यांना माहीतच नसावे. पालकांच्या सुद्धा ह्या मुलांकडून असल्या 'फालतू' अपेक्षा मुळीच नसतात. आपण फक्त त्यांच्या 'ऑल-राउंड' विकास साठी त्यांना उद्युक्त केलं कि झाले. पण ह्यात फक्त अभ्यास, खेळ, स्पर्धा परीक्षे साठी तयारी, एवढेच येते असं बहुदा यांचा समज असतो. त्याला शिस्तीची, लवचिकतेची , नकार पचवण्याची आणि संस्कारांची जोड द्यायची गरज या होतकरू उच्चभ्रूंना वाटत नाही. ह्यांच्या घरात सणासुदीचे दिवस सुद्धा 'जस्ट अनदर डे' म्हणूनच येतात नि जातात. पण क्रिसमस मात्र सेलेब्रेत करावाच लागतो. यांच्या घरात दिवेलागणीला 'एकंच प्याला' , कंपनी असो व नसो ,सर्रास घेतला जातो. इथे मराठी मालिकांना नाके मुरडली जातात, पण 'बिग बॉस', रोडीज' डोळे फाडून पाहिले जातात. मुलांच्या शाळेत सुद्धा ह्या आया वेशभूषेचे कुठलेच संकेत पाळताना दिसत नाहीत. अप-टू-डेट हे फक्त राहणीमाना करिता वापरले जाणारे विशेषण आहे हा यांचा ठाम समज झालेला दिसतो.
वरील सर्व मुद्दे पूर्णतः वैयक्तिक आहेत. पण चांगले वाचन, चांगली संगत आणि जबाबदारीची जाणीव हे कधीच आपसूक होत नाहीत. या गोष्टी मुद्दाम आपल्या जगण्याचा भाग बनवाव्या लागतात आणि तरच आयुष्याला परिपूर्णता येते असे माझे मत आहे.

Monday, April 4, 2011
पारोसे घर
आज ६ वर्षात प्रथमच " यशोधन " गुढीविना ओके बोके राहिले. तसे ते त्या आधी जवळ जवळ १५ एक वर्ष पर्यंत ओके बोकेच होते. पण आम्ही राहायला गेल्यापासून त्याचे घर झाले होते. अगणित आठवणींचा खजिना बनलेले घर. ज्या घराने आम्हा दोघांना आमची स्वतंत्र ओळख दिली, आपापले स्वतंत्र विश्व निर्माण केलेले पाहिले, जिथे अनेक कटू सत्यांना आम्ही सामोरे गेलो आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर हि निघालो, जिथे आमच्या दुसर्या अपत्याचा जन्म झाला, आणि जिथे थोरल्याच्या मुंजीचा सोहळा अत्यंत दिमाखात राबवला गेला, असे आमचे घर आज पारोसेच राहिले.
ज्या दिवशी ठरवले आता " यशोधन" मध्ये बस्तान हलवायचे तो क्षण आठवतोय. खूप विचार विनिमय, करून घेतलेला तो निर्णय अतिशय योग्य आणि सर्वांच्याच दृष्टीने हितकारक असा ठरला याचे आज समाधान वाटते. सर्वांचा होकार अगदी मनातून आला नाहीये हि सल घेऊन काहीशा अपराधी भावनेनीच आम्ही "जगन्नाथ" चा उंबरा मागे टाकला आणि "यशोधन" मध्ये प्रवेश केला. तिथली ती पहिली अनोळखी रात्र आम्ही दोघांनी अस्वस्थ चित्त आणि भरलेल्या डोळ्यांनीच काढली.
मग सुरु झाला अंधारात चाचपडण्याचा प्रवास. वयाची २५ शी ओलांडून आणि एक अपत्य पदरात असूनही म्हणावे तसे संसारिक शहाणपण आम्हा दोघांकडे नव्हते. "जगन्नाथ" मधील ५ वर्षात दूध पिशवी चा रेट, वर्तमानपत्राचे बिल, बाईचा पगार, आणि अशा इतर गोष्टींशी अमचा सुतराम संबंध आला नव्हता. चुकत माकत, सगळी अक्कल आलीच हळू हळू.
खर्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याचा गांभीर्याने विचार करायला मी त्या सुमारास लागले. घराबाहेर चे जग कुठल्यातरी स्वरूपात निर्माण करायचे मनात पक्के केले. आणि करून पाहू म्हणून रानडे मध्ये जर्मन भाषा सर्तीफिकेत कोर्स ला प्रवेश घेतला. तो क्षण माझ्या कल्पने पलीकडचा टर्निंग पोईंत ठरला. एकतर जे १०, १२, पदवी पर्यंत उमगले नव्हते ते आत्ता उमगले. माझी आवड, माझी गती भाषा विषयात आहे हे उलगडले. शिकवलेले पटापट आत्मसात होत गेले. आणि मनावर कसलेही दडपण न घेता मी प्रथमच अभ्यास करत होते. कोणाच्या माझ्याकडून कसल्याच अपेक्षा नव्हत्या. अभ्यास बरोबर कोर्स मधल्या एक्स्ट्रा करिकुलर उपक्रमान मध्ये हिरीरीने भाग घेऊ लागले. इथे पुन्हा मला प्रथमच कोणाचीही आडकाठी नव्हती. बक्षिसे मिळवली. नाटक बसवले. समवयस्क नसला तरी माझा प्रथमच मित्रा- मैत्रिणींचा ग्रुप जमला. जे जे निसटले ते ते अनुभवण्याची सुवर्णसंधी या वेळी अजिबात सोडली नाही.
सेर्तीफिकेत नंतर डिप्लोमा केले. त्यात चक्क तिसरी आले. माझ्यातल्या ह्या बदलाने मीच चक्रावून जात होते. पण माझा हा न्यूनगंदातून आत्मभानाकडे झालेला प्रवास मी " यशोधन" मधेच अनुभवला. तो तिथेच घडायचा होता. हे विधिलिखित होते.
अभिजित मध्ये हाच आत्मविश्वास फुलून आलेला ह्याच घराने पहिला. नवीन विचार, नवीन शक्यता पडताळून पहायचे बळ ह्याच घराने त्याला दिले.
दुसर्या अपत्याचा विचार आणि आमच्या बाळाचे स्वागत ह्याच घराने केले. राजस चे मित्रमंडळ ह्याच घराने वाढवले. त्याचे रिक्षातील मित्रं, ग्राउंड चे मित्रं, आसपासचे मित्रं, असे वर्तुळ निरंतर फोफावत गेले. त्याच्या दृष्टीने तेव्हाही नवी पेठ हेच घर त्याच्या मनात कायम होते. कारण तिथे त्याच्या लाडाची माणसे होती. पण तो "यशोधन" मध्ये रमला होता हे निश्चित. आता इकडे आल्यावर त्याला "यशोधन" सुटल्याची जाणीव अस्वस्थ करते यातच सगळे आले.
राजस च्या मुंजीचे ग्रहमक आणि देवक हट्टाने मी "यशोधन" मधेच बसणार हे जाहीर केले. ४ दिवस घर नव्या नवरिगत नटले होते. येणाऱ्या जाणार्यांची वर्दळ, दारी मांडव, जेवणाच्या पंगती, सगळं कसं मस्त जमून आलं होता. तेव्हा ठाऊक नव्हते त्या घरातले ते शेवटचे मंगल कार्य असणार आहे ते. कार्य दणक्यात पार पडले. श्रम-परिहार होऊन जेमतेम वर्ष होते न होते तोवर तिथून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. आणि अशी आली कि धडपणे त्या वास्तूला अखेरचा दंडवत हि करायचे राहून गेले.

Subscribe to:
Posts (Atom)