Thursday, January 23, 2020

Swatantrya maze

नुसतं एक स्त्री म्हणून किंवा माणूस म्हणून आपण कधीच जगत नाही  बेसिक स्वातंत्र्य संसारात पडल्यावर मागायचं नसतं. ते हवंच असेल तर मग विनापाश एकटं राहणं हाच एक उपाय आहे. आपण जगतो कुणाची तरी आई, पत्नी,  नणंद, सून, वहिनी, काकू, आत्या म्हणून.  आपण असतो सदैव कुणाची तरी सासू, आजी, विहीण,  मावशी,  मामी. या सर्व नात्यांसोबत येते अपेक्षांची भली मोठी यादी. 

एकाची अपेक्षा दुसर्याचं स्वातंत्र्य हिरावणारी असू शकते, पण त्याला इलाज नाही.  हे जो स्वीकारेल त्यानेच संसारात पडावं अन्यथा एकटा जीव सदाशिव रहावं.  तर एवढी क्लॅरिटी आली कि उरलेल्या अवकाशात आपापल्या स्वातंत्र्याची व्याख्या करता येते का ते पाहू.

नात्यांचे हे सर्व रोल्स निभावताना मुद्दाम स्वतःसाठी वेळ काढणं,  आपले छंद जोपासणं, हे माझी स्वातंत्र्याची बेसिक रुपरेखा.  स्वतःसाठी काढलेल्या वेळी इतर कोणताही रोल न करता,  तो सगळा वेळ उपभोगता येणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य. 
स्वतःच्या शरीरधर्माबद्दल जागरूक आणि आग्रही असणं हे ही खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या पाळीसंबंधित निर्णय स्वतः घेणं हे माझ्यासाठी स्वातंत्र्य.  माझ्या पाळीची तारीख माझ्या व्यतिरिक्त कोणाला माहित असावी हे ठरवण्याचा अधिकार माझा असावा. या गोष्टीशी देवाधर्माच्या संकल्पना जोडणं अथवा नाकारणं हा निर्णय मी घेणं म्हणजे स्वातंत्र्य.

मी कोणत्या प्रसंगी काय पेहराव करावा, कोणत्या समारंभाला येणं जाणं ठेवावं किंवा टाळावं याची स्पष्टीकरणं कुणाला द्यावी न लागणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य. माझं वजन,  माझे लुक्स,  माझं राहणीमान हे कुणाच्याही कल्पनाविलासाला प्रमाणे न बदलता मला रुचेल,  झेपेल आणि कम्फरटेबल वाटेल अशा पद्धतीने ठेवणं हा माझा निर्णय असेल.

कुटुंबाव्यतिरिक्त माझं स्वतःचं जग आहे.  त्यातली माझी माणसं, माझा  मित्र परिवार यांच्यामध्ये माझी भावनिक,  कधी आर्थिक गुंतवणूक असणार  आणि या बद्दल चे निर्णय मला घेता येतील ते स्वातंत्र्य. माझी विचार पक्रिया  दरवेळी समोरच्याशी जुळायलाच हवी असा माझा आग्रह नसेल आणि समोरच्याने ही तो धरू नये.  माझ्या स्वच्छतेच्या कल्पना, खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्याहून निराळ्या असतील अशा शक्यता गृहीत धरून माझ्या माणसांनी मला विनाअट स्वीकारणं हे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य.

हे सर्व मुद्दे मलाही लागू होतात, या न्यायाने मी देखिल समोच्याचं स्वातंत्र्य जपण्यासाठी जागरूक रहावं हे ही अपेक्षित आहे.  मागच्या पिढीतील स्त्री जर स्वतःचे पारतंत्र्याचे दिवस आठवून पुढल्या पिढीतील स्त्री ला देखिल तेच पारतंत्र्य देत असेल तर त्यात तिचा ईगो सुखावेल पण माणूस म्हणून तिची वाढ खुंटेल.

Friday, January 17, 2020

Uthal pani

प्रिया चे नुकतेच लग्न झाले होते.  सासरकडची मंडळी हौशी होती, मित्रमंडळ भरपूर,  सगळ्यांकडे येणेजाणे होते. अशाच एका स्नेह्यांनी नवीन सूनबाईंची ओळख व्हावी म्हणून एक दिवस प्रिया आणि तिच्या घरच्यांना चहाला बोलावले होते.

प्रिया ला घर बघताक्षणीच आवडले.  स्वच्छ,  टापटीप आणि मोजके फर्नीचर होते. या कुटुंबाची तशी लग्नात थोडी फार ओळख झाली होती पण आज नीट जाणून घेण्याचा योग आला होता.  यजमानांनी आगत स्वागत केले, वडीलधार्यांच्या पायी पडून प्रिया बाकी मंडळींकडे उत्सुकतेने पाहू लागली.

तेवढ्यात त्या घरची धाकटी सूनबाई आपणहोऊन प्रिया ची ओळख करून घ्यायला आली.  प्रिया पेक्षा 5/6 वर्षांनी मोठी असेल. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या,  मग चहा फराळ आला.  फराळ धाकट्या सूनबाई सर्वांना देत होत्या.
 त्यासोबतच सुरू झाली यजमानीण सूनबाईंची तोंडाची टकळी. आपल्या माहेरचा उदो उदो. आमच्याकडे मिलिटरी शिस्त,  काॅस्मोपोलिटन वातावरण,  पार्टी कल्चर,  मोठ्यांमधे उठबस,  आमची पदार्थ सर्व्ह करायची खासियत, होते नव्हते ते सगळे उगाळून झाले.

 गप्पा आटपल्या, सगळ्यांचा निरोप घेऊन प्रिया ची घरची मंडळी परतली. साहजिकच प्रिया ने कुतुहलापोटी यजमानीण सूनबाईंच्या मिलिटरी माहेरचा विषय काढला. त्यांचे वडील कुठे कोणत्या पोस्ट वर होते, असं ती सासुबाईंना विचारू लागली. त्या बरोबर सगळे घरचे जोरात हसू लागले. नवरा म्हणाला, " अगं कसलं पोस्टींग आणि कुठला हुद्दा? सुरेखा वहिनींचे वडील आर्मीत नाही,  मिलिटरी ईंजिनीयरींग सर्व्हिस मधे कामाला होते . तेवढ्यावर हिची नवीन लोकांसमोर असली टिवटिव चालू असते, आव तर असा असतो कि कुठे या गावंढळ लोकांच्यात येऊन पडले आहे. 

आता कुठे प्रिया ला जाणवायला लागलं कि हा तर उथळ पाण्याचा  खळखळाट.

असे कितीतरी अनुभव आपल्याला रोज येतात नाही? माणूस बोलून जातो बरंच काही,  पण करायची वेळ आली कि गायब होतो.  शांतपणे गाजावाजा न करता कर्तव्य करून मोकळं होणारा वेगळाच असतो. सोशल मीडिया वर या वृत्ती चा जाम धुमाकूळ चालू असतो. घरी एकमेकांची तोंडे विरुद्ध दिशेला असणारी जोडपी,  आपली ॲनिवरसरी पिक्स कशी जास्तीत जास्त युनिक असतील या बाबत कमालीचे काटेकोर असतात. कलाक्षेत्रात तर आजकाल एकवेळ गुणवत्ता कमी असेल तरी चालते, पण चमकोगिरी जमली पाहिजे हा समज फोफावत चालला आहे. पण याच भाऊगर्दीत एखादी सोज्वळ राहणारी, सोशल मीडिया वर झळकण्याचा अट्टाहास नसलेली विभावरी आपटे सारखी प्रतिभावान गायिका आपल्या अस्सल बावनकशी आवाजाचा ठसा उमटवत राहते.

उथळ पाण्याचा  खळखळाट शेवटी क्षणिकच ठरतो, चिरंतन राहते ती खोलवर रुजलेली नीतिमत्ता. 

Tuesday, January 7, 2020

31 dec

या वर्षी चा 31 डिसेंबर आजवरचा सगळ्यात संस्मरणीय ठरला. या वर्षी आम्ही सहकुटुंब एका मित्राच्या शेतावर अख्खा दिवस घालवला. शिक्रापूर जवळ शिरूर तालुक्यात टाकळी भिमा या गावी आमच्या या मित्राची 100 एकर सामायिक शेती आहे . आजवर बागाईतदार हा शब्द आम्हाला फक्त ऐकून ठाऊक होता,  तिथे गेल्यावर आमच्या जुन्या मित्राची ही नवीनच ओळख आम्हाला झाली.
पुरोहित वाडीत शिरताच ऊसांचे मळे स्वागताला फुलून उभे होते. तिथून थोडं पुढे येताच मोठं पटांगण असलेल्या वाड्यात गाड्या स्थिरावल्या.  त्यानंतरचं स्वागत गोठ्यातील जनावरांनी केलं.  3 श्वानांनी हाका मारुन मारुन आम्हा पाहुण्यांना जवळ बोलावलं . स्वतःची प्रेमानें ओळख करुन दिली,  आमची करून घेतली. मग मुलांनी गायीवासरांकडे मोर्चा वळवला.  तिथेही अशीच मायेची ओळख परेड झाली. तोवर गरम चहा समोर आला. 
चहा होईस्तोवर बाजूला चुलीवर भाकर्या थापण्या भाजण्याचं सुंदर चित्र आकाराला येत होतं. लगेच कॅमेरे सरसावले, अन्नपूर्णेची परवानगी घेऊन ते कसब फोटोत विडियोत साठवलं गेलं.  जेवणाची वेळ अर्धा पाऊण तासातच होती पण त्या दृश्याने तिथेच एक गरम भाकरी खाण्याचा मोह आवरला नाही.  थोड्या गप्पागोष्टी होईस्तोवर अजूनही गोठ्याजवळच घुटमळणार्या मुलांना जेवायचं बोलावणं आलं. मग मोठ्यांच्या पंगती बसल्या.  तांदुळाची भाकरी,  मेथी ची भाजी, खरडा , वांग्याची रस्सा भाजी,  पापड, कुरड्या, भजी, काकडी,  टोमॅटो,  आमटी भात  असा फक्कड बेत होता. 
पंचेंद्रिय तर तृप्त झालीच, पण त्याचबरोबर जुन्या मित्रांच्या सोबतीने मन ही तृप्त झाले. मुंलांची एकमेकांशी जमलेली गट्टी बघून तर अजून समाधान झाले. जेवणं उरकल्यावर मुलांचे बोर्ड गेम्स रंगले,  ते जरा लवकर आटोपते घेतले, कारण अजून सगळा परिसर हिंडून यायचे होते.
नजर ठरणार नाही इतकी विस्तीर्ण ऊस शेती,  त्यात सुरू असलेली ऊस तोडणी,  कामगारांचे सपासप चालत असलेले हात, त्यांची उघड्यावरची कुटुंब सगळं सगळं इतक्या जवळून आम्ही प्रथमच पाहत होतो.  शेतीचा पट्टा संपेस्तोवर भिमा नदीच्या निळ्याशार पाण्याने आम्हाला खुणावले.  मग तासभर फोटो काढण्यात पाण्यावर चपट्या खड्यांनी तरंग उमटवण्यात निघून गेला. 
परतीच्या वाटेवर मगाशी न भेटलेला मेंढरांचा कळप दृष्टीस पडला. मग मुलांनी त्यांच्याशी पण दोस्ती केली.  परत वाड्यात शिरता शिरता ट्रॅक्टर च्या अंगाखांद्यावर खेळून झालं.  चहा घेऊन,  सर्व मदतनीस कुटुंबांचे आभार मानून परतीच्या वाटेवर निघालो.
हा असा एकदिवसीय गावरान अनुभव देणारी कित्येक पॅकेजेस आज उपलब्ध आहेत.  पण आपल्या दोस्ताचं हे वैभव त्याच्या सोबत अनुभवायला मिळणं या सारखं दुसरं भाग्य नाही.  वर्षभरातील अनुभवलेल्या कडू गोड प्रसंगांवर मिळालेला हा वर्षाअखेर चा श्रमपरिहार

Monday, January 6, 2020

Wadalwaat

ती पंचविशीची, सडसडीत, स्मार्ट, विवाहित.
तो विशीचा, पोरगेलसा, पण आकर्षक देहबोलीचा.
दोघेही एकाच ऑफिस मध्ये कामाला.
ती कामात निपुण, चौफेर.
तो नवतरूण, भिरभिरणार्या नजरेचा.
तिला त्याच्या अस्तित्वाची विशेष जाणीव नसे.
पण तो खडे टाकण्यात पटाईत.
कधी गप्पांतून, कधी नजरेतून.
तो किस्से सांगत हसवे, दाद मिळाली कि निर्ढावे.
नजर आणि शब्दांनी प्रतिसाद मिळाला कि पुढची पायरी गाठे.
तिला संसार, मूल यातून विरंगुळा मिळे.
चेष्टेतून प्रकरण कधी गंभीर झाले त्यांना ही समजले नाही.
मग सुरू झाली लपाछपी.
घरी खोटं सांगणं, ऑफिसातून लवकर सटकणं.
स्मार्टफोन होताच हाताशी,
घरच्यांसमोर राजरोसपणा ची स्पेस देणारा साथीदार.
कुठवर जुळेल ही गाठ,
त्यांना काय ठाऊक.........
ही तर वादळवाट.



Saturday, January 4, 2020

Comfortzone

Shivam , a shy child was weak in communicating with others. He would fall short of words while speaking to anyone. He loved the company of people but always stayed in his own world . This would create a barrier for him to jump into any kind of conversations. He could not contribute to the subject as he would not have paid attention to any of the ongoing dialogues. 
But Shivam was a gifted child . God had blessed him with a musical skills. He could reproduce any musical note on the toy piano that his parents had bought for him. He would listen to a tune and his fingers would recreate the tune on the instrument. His parents finally relieved that their boy had shown some inclination got home the synthesizer. He was also enrolled with a tutor to develop his inborn abilities . The tutor soon realized that Shivam was the fastest learner amongst all his students. 
Shivam's parents were on top of the world. They now wanted him to play the instrument confidently in public. Their sole motive behind this was to boost his self esteem. But Shivam being shy, stayed away from showing his skills in public. He liked  the comfort zone of being reclusive where he was not viewed, judged or criticized. 
After much prodding and encouraging for 1 or 2 years,  his family gave up and let him be. They decided to wait and watch.  They knew he had to leave the comfort zone on his own. 
And One fine day, Shivam did ............
His mother  would leave no stone unturned to get him out of the cocoon he had engulfed himself into. She  enrolled Shivam to a child orchestra through an audition. The fun-filled, accomodating atmosphere of the group helped him to mix with his peers. Each one of the group connected to the other through music. For Shivam there could be some connection beyond words. His music spoke for him. His mentors from the group guided him the whole year and they all set up a wonderful performance at the end of it. 
This was Shivam's first appearance in public and on a big scale.  Needless to mention the group rocked on stage.  Thereafter there was no looking back. He ventured out, did music shows and the world showered praises on him. Shivam revelled in the confidence boosting appaulause.
The comfort zone was finally left behind.
The duckling had realised that he was indeed a swan.
#AmWriting