Wednesday, May 6, 2020

Forever host

परदेशात राहणारे आप्त या जमाती चे मला प्रचंड कौतुक आहे. कौतुक अश्याकरता नाही कि ते आपल्यापेक्षा संपन्न, स्वच्छ आणि सुलभ देशात राहतात, याचं कि तिकडे स्थायिक झाल्यामुळे त्यांना कायमचे " यजमानपद" किंवा " forever host " हे बिरूद चिकटलेले  असते. वरवर गोंडस भासणारे पण कायमचे झाल्यावर कटकटी चे  असे हे बिरूद. 
#ForeverHost


आपण परदेशात टूरिस्ट म्हणून जायचं ठरवताना सगळ्यात पहिले काय बघतो, " अरे अमुक अमुक या स्टेट मध्ये आहे, बर झालं" , " तिकडे तमुक तमुक आहे , काळजीच नको," हो कि नाही ? या बिचार्या फोरेवर होस्ट ना कायमच  उचक्या लागत असतील इतके  आपण भारतीय त्यांच्या कडे जायच्या प्लान्स ने त्यांच्या आठवणी काढत असतो. खासकरून मे महिना, दिवाळी, या टिपिकल भारतीय सुट्ट्या आल्या कि तर हमखास.

 नाताळच्या सुट्टीत तीच मंडळी इकडे येतात त्यामुळे तेवढीच काय ती त्यांना सूट. नाही तर कोणी न कोणी भारतीय कनेक्शन यांना कायमच गृहीत धरत असावं. अगदी सासूच्या मैत्रिणीच्या बहिणी पासून ते मेव्हण्याच्या भाचीच्या मैत्रिणी पर्यंत कोणीही यांना आपल्या येण्याची वार्ता कळवत असत. अगदी तंबू ठोकून राहायला येण्यापासून ते एक दिवसाचा स्टोप ओवर असो किंवा नुसती सौजन्य भेट असो या फोरेवर होस्ट ना कायमच एक प्रकारे डोक्यावर टांगती तलवार असेल. बर, ओळख वरवरची असो , त्यांचे काही प्रोग्राम्स  ठरलेले असो , त्यांना एखादा वीकेंड काहीही न करता नुसते लोळायचे असो, परदेशात स्थायिक आहेत म्हटल्यावर, त्यांनी भारतीय टूररिस्ट ना  अटेंड करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्यासारखी अपेक्षा आपण ठेवतो. 

एकदा पाहुणे आलेत म्हटल्यावर कोणत्या गोष्टी चुकत नाहीत ? आणि पहिल्यांदाच आलेत म्हटल्यावर तर अत्यंत प्रेमाने काही गोष्टी नव्हे लाड जी  हि मंडळी करतात त्याला तोड नाही. मुळात मनात जागा म्हणून घरात जागा करणे, एरपोर्ट पिकप, स्पेशल मेन्यू प्लानिंग, साईट सीइंग शेड्युल बनवून देणे, तेथील कल्चर, पदार्थ, खरेदी  सकट सगळ्या खासियातींचा आपल्याला आस्वाद घेता यावा म्हणून धडपडणे, आपल्या व्यस्त शेड्युल मधून आपल्याकरता वेळ काढणे, मुलांच्या विविध उपक्रमांमधून आपलं हवं नको बघणे. 

बर, येणारे काही आपण एकमेव नसतो. आपल्या आधी अनेकजण पाहुणचार घेऊन गेलेली असतात, नंतर हि ओघ सुरु राहणारच असतो. अगदी आपणच काही लाडके नसतो, इतरही त्यांचीच जोडलेली जीवाभावाची माणसे असतात तरी देखील हे बिरूद मिरवत आपली घरे, मने, वेळ, आपल्यासाठी सदैव खुली ठेवणारी हि मंडळी असतात. अगदी यांच्या आणि आपल्या  आधीच्या दोन पिढ्यांनी देखील शहरात घरे केल्यावर गावाकडच्या पाहुण्यांचं आगत स्वागत करण्यातच हयात घालवलेली असते सगळं सगळं काबुल असलं तरी म्हणून याचं योगदान किंचितही फिकं पडत नाही. उलट भयंकर तारेवरची कसरत आहे हि. या सर्वांबद्दल एकच भावना " तेथे कर माझे जुळती " 

माझ्या आजवरच्या उण्या पुर्या दोन परदेशवार्या ज्यांच्या जीवावर, घरावर, पाहुणचारावर पार पडल्या अश्या याच जमातीतील काही जिवलगांना tag करतेय. 
- मीनल 


Sunday, April 12, 2020

Gulab gang

जुही चावला ही अभिनेत्री म्हणजे अस्सल 24 कॅरेट सोनं. आजवर तिच्या निरागस चेहर्यानं, अवखळ हसण्यानं आणि अचूक काॅमेडी टायमिंग नं आपल्या ह्रदयावर अधिराज्य गाजवलं आहे. गुलाब गॅन्ग या चित्रपटात तिने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या वहिल्या खलनायिकी भूमिकेला अचाट ताकदीने साकारून पुनश्च आपल्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
या भूमिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठे  ही उदात्तीकरण न करता, कुठलीही सहानुभूतीदर्शक पार्श्वभूमी न चिकटवता सुमित्रा देवी हे खलनायिकी पात्र लिहिलं गेलं आहे. आपल्या प्रत्येकात दडलेल्या वास्तववादी खलप्रवृत्ती च्या विविध छटा या भूमिकेत आहेत. ही खलनायिका परिस्थिती ने गांजलेली नाही कि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली पीडिता नाही. सुमित्रा देवी हे टोकाचं स्वार्थी, मतलबी आणि प्रचंड महत्वाकांक्षी प्रकरण आहे. तिला शोषितांचे चे प्रश्न,अडचणी काही ही जाणून घ्यायचे नाहिये. तिला काहीही विचलित करत नाही,  ना रेप, ना खून, ना छळ. तिला दिसते फक्त संधी.
जुही चावला ने सुमित्रा देवी उभी करताना कुठल्याही भडक वेशभूषेचा आधार न घेता केवळ चेहर्यातून विविध भावछटा साकारत ही भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. 

Wednesday, April 1, 2020

MainBhiDirector

#MainBhiDirector
#Cinemagully
अमेरिका स्थित पेडियाट्रिशियन नादिया हाशमी यांचं हे दुसरं बेस्ट सेलर नाॅवेल. यातील नायिका फरीबा चं बालपण आईविना गेलं होतं. त्यातील कटू आठवणी मागे सोडून प्राक्तन म्हणून फरीबा लग्न बंधन स्वीकारते. एकूणच आयुष्याकडून फार अपेक्षा नसताना तिला नवर्यामधे मित्र गवसतो. आपल्या दोन मुलांना वाढवत शिक्षिका म्हणून काम करत तिचा सुखाचा संसार चालू असतो. तालीबानी राजवट उदयास येते आणि तिच्या संसाराला दृष्ट लागते. नवरा गमावून बसलेल्या फरीबा ला लेकरांना घेऊन जिवाच्या आकांताने पळ काढावा लागतो. इथून पुढची गोष्ट म्हणजे एका असहाय आईने लेकरांसकट लंडन स्थित बहिणी कडे पोहोचण्यासाठी केलेला खडतर प्रवास. या प्रवासात तिला आलेला माणुसकी चा प्रत्यय, वाट्याला आलेलं रेफ्यूजी चं जिणं, एका देशांतून दुसर्या देशात मजल दर मजल करत  केलेलं मार्गक्रमण सगळं सगळं कल्पनेपलीकडचे आहे.
प्रवासाच्या एका टप्प्यावर थोरल्या मुलाशी ताटातूट होणं तिच्या नशिबी येतं. अकाली प्रौढ झालेला हा मुलगा आपल्या आपलं अल्पजीवी रम्य बालपण आठवत संकटांना कसं तोंड देतो याचं अचंबित करणारे चित्रण पुस्तकात आहे.
यातील दोन प्रमुख व्यक्तीरेखांकरिता दोन नावं ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहतात.
फरीबा : तब्बू
थोरला मुलगा सलीम: ह्रितिक/ आयुष्मान

Monday, March 30, 2020

Wosubahkabhitoayegi

वो सुबह कभी तो आएगी ......

जब समाचार का पहला शब्द करोना न हो
जब बाहर निकलने से पहले मास्क न ढूंढना पड़े
किसी भी ठेलें पर खाना फिर स नसीब हो
यहां वहां हाथ लगने से ब्लड प्रेशर ना बढ़ता रहे

वो सुबह कभी तो आयेगी .......

जब वर्क फ्राॅम होम के चक्कर से मुक्ति मिलें
जब राशन न मिलनें के डर से रोज ब्रेड लाना पडे
जब 8 कमरों में से आज कौन से कमरों का झाडू पोछा करूँ
ये सोचते सोचते कामवाली बाईंयो की बेकार की गपशप सुनाई दे

वो सुबह कभी तो आयेगी .......

सभी परीक्षार्थी के पास अपना अपना टाइम टेबल बराबर हो
कामयाबी चूमने की ज़िद कुछ कर गुजरने का जुनून सबमें दोबारा जाग उठे
होस्टल फिर स खुलें, मेस का वहीं बोरिंग खाना नसीब तो हो
रोज़ी रोटी छोड़ टॅन्करों में लोगों की भीड़ मे घुसकर गाँव न जाना पड़े

वो सुबह कभी तो आयेगी ........

जब बिना परीक्षा के ऊंची कक्षा में गए बच्चे छुट्टीयोंमें घर पर कैद न हो
जब अकेले रहते घूमते बुजुर्ग अपने मित्र परिवार में फिर से घुल मिल सकें
तंदुरुस्ती और मनचाहे फिगर के चहेते पूरी जोश से अपने वर्कआऊट कर पाएं
जब छुट्टी पे आए मेहमान अपने परिवार और कर्मभूमि में दोबारा लौट सकें

वो सुबह आएगी जरूर ........
 नमस्कार,
कालच इकडे जाॅईन झाले आणि अगदी आपल्या घरी आल्याचा फील आला. चित्रपट, गाणी रसग्रहण सगळंच आवडीचं. निमित्त झालं पॅरॅसाईट सिनेमा चं. आम्ही दोन मैत्रिणींनी एकाच दिवशी चित्रपट पाहिला, अचाट कलाकृती अनुभवल्यावर जे होतं तेच आम्हा दोघींचंही झालं. निशब्द भारावलेपणाची स्टेज ओसरल्यावर आपल्या ला जे वाटलं भावलं तेच पूर्ण कि काही निसटून गेलं हे तपासून पाहण्याची स्टेज येते. त्या करता मैत्रिणीशी बोलताना तिने मला या ग्रुपमध्ये अॅड केलं. याच सिनेमा वरच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेल्या    जुन्या सर्व पोस्ट्स वाचून काढल्या आणि आत दाटून आलेली अनुभूती कागदावर उतरवण्याची तिसरी स्टेज गाठली.
एव्हाना मेंबर्स नी चित्रपट पाहिला असेलच तरीही my two cents समजून केलेला  हा प्रांजळ प्रयत्न.

#parasite
पॅरॅसाईट हा जीवसृष्टीतील एक असा घटक आहे जो स्वतः चे अस्तित्व दुसर्याच्या जीवावर जगवतो. यजमानाच्या नकळत त्याच्या शरीरात शिरकाव करून ही बांडगुळं त्याचा शरीररस शोषून त्यावर स्वतःला जगवतात. बर्याच वेळा होस्ट बाॅडी धारक माणूस पर्सनल हायजिन बाबतीत जरा ढिसाळ झाला कि यांचं चांगलंच फावतं. मग पोटात जंत होणे किंवा  ढेकूण , उवांमुळे होणारी स्किन इनफेक्शन अशा तक्रारी डोकं वर काढतात.
पॅरासाईट या यंदाच्या ऑस्कर विजेत्या कोरियन चित्रपटातील काही पात्रांच्या नशिबी हे असं पॅरॅसाईट होऊन जगणं आलं आहे. चित्रपटात आपली प्रथम Kim फॅमिली शी ओळख होते. Ki-Taek आणि Choung-Souk हे दांपत्य आणि त्यांची Ki-Jung आणि Ki- woo ही मुलं. शिक्षण नाही, आर्थिक स्थैर्य नाही असं हे कुटुंब  Seoul शहरातील एका लोअर क्लास वसाहतीमधे एका खुराड्यात राहात असतं. अशातच एके दिवशी ki woo चा मित्र त्याला एक नोकरी ची ऑफर देतो.
पात्रता नसताना देखील चालून आलेली ही संधी  ki woo ला सोडवत नाही. अशा परिस्थितीत उच्चभ्रू Park फॅमिली मधे नोकरी निमित्त ki woo चा प्रवेश होतो. या कुटुंबात असतात mr and mrs Park आणि त्यांची मुलं  Da-hye आणि Da-song. Park फॅमिली च्या वैभवाने ki woo चे डोळे विस्फारतात आणि kim फॅमिली एक प्लॅन बनवते. Park फॅमिलीच्या गरजा जाणून घेऊन त्यांच्या गाफिलपणाचा गैरफायदा घेत kim फॅमिली एक एक करून या बड्या घरात आपलं स्थान बनवते. हा शिरकाव तद्दन खोटेपणावर रचलेला असला तरीही आपापली धारण केलेली सोंगं अतिशय बेमालूमपणे वठवून kim फॅमिली park फॅमिली ला फसवत राहते.
कितीही आव आणला, अंगावरची वस्त्रे बदलली,  देहबोली बदलली तरी बकालपणा काही लपत नाही. Kim फॅमिली च्या वस्तीला, तिथल्या राहणीमानाला चिकटलेला दर्प काही त्यांची पाठ सोडत नाही. आपल्या या किड्या मुंगीच्या बकाल अस्तित्वाची घृणा उच्चभ्रू वर्गांचं प्रतिनिधित्व करणार्या मालकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे हे kim फॅमिली  व्यवस्थित जाणून असते.
Park फॅमिली च्या जीवावर Kim फॅमिली आपलं बांडगुळांचं आयुष्य जगत असताना गोष्टीला एक अतिशय नाट्यमय कलाटणी मिळते. Kim फॅमिली ला माहीत नसलेली एक वेगळीच बाजू त्यांच्या या प्लॅन ला सुरुंग लावायची शक्यता निर्माण करते. यातून एक विचित्र विषण्णावस्था त्यांच्या पुढे उभी ठाकते. शेवटी एक असा प्रसंग घडतो ज्यात  उच्चभ्रूवर्गाने  आपल्या शत्रूबाबत ही दाखवलेली हीनतेची भावना सहन न होऊन kim फॅमिलीतल्या बापाकडून एक प्रमाद घडतो.
ही चित्रपटाची ढोबळमानाने सांगितलेली गोष्ट. पण त्याचा सुन्न करणारा प्रभाव अनुभवायला चित्रपट पहायलाच हवा. चित्रपटात जे सांगायचं आहे ते फक्त subtitles मुळेच पोचतं असं नाही. त्यातील पात्रांचं व्यक्तीचित्रण, त्यांच्या मनातील चलबिचल पोचवणारी लेखणी, दिग्दर्शकाचं कसब, कलाकार तंत्रज्ञांचं कौशल्य सगळं सगळं मिळून तयार झालेलं हे आर्टवर्क सध्या सर्व OTT माध्यमांतून बघण्यास उपलब्ध आहे.



Saturday, March 21, 2020

Karonaanisocialmedia

करोना आणि सोशल मीडिया

कठीण समयी माणसांचं खरं रूप कळतं असं म्हणतात. या करोनापर्वाने ही समजूत खरी ठरवली आहे. सध्या सोशल मीडिया वर माणसांची  विविध रुपं बघायला मिळत आहेत. सोशल मीडिया खोटं आहे माणसं खरी आहेत,  ही फाॅरवर्ड्स तेवढ्यापुरती वाचून सोडून द्यायची , माणसं कायम आपली राहणार आहेत हे सगळं सगळं खरं असलं तरी आपल्या विचारसरणीचे प्रतिबिंब आपल्या सोशल मीडिया वरच्या वावरण्यातून दिसत असतं. आपण काय पोस्ट करतो, काय फाॅरवर्ड करतो, कोणत्या जोक्स वर हसतो, माना डोलावतो त्यातलं काय खरं मानतो, काय दुर्लक्ष करतो हे सगळं आपलं व्यक्तीमत्व दर्शवत असतं.
सुरवात जोक्स ने करुया. काही जोक्स खरंच चेहर्यावर हसू आणतात. या जोक्स च्या निर्मात्यांची कमाल वाटते. घटना कोणतीही असो अगदी महिला दिन ते गायब झालेलं मलेशियन एअरलाईन त्याला नवरा बायको च्या तू तू मैं मैं ची खमंग फोडणी देऊन तीच चावून चावून चोथा झालेली जोक्स ची मालिका रेटत राहतात. पण जेव्हा हे जोक्स निर्माते एखाद्याच्या व्यंगावर किंवा जीवन मरणाच्या व्यथेवर बळेबळेच कोट्या करायला लागतात तेव्हा चीड येते. त्यांच्या बरोबरीने आपणही जेव्हा या जोक्स ची मजा घेत पुढे पाठवत राहतो तेव्हा आपणही नकळत आपली पातळी सोडलेली असते.
या करोनापर्वात शाळकरी मुलं परीक्षा रद्द झाल्याने जाम खूष आहेत पण त्यांच्या आया मात्र हवालदिल झाल्या आहेत. 5वी /6वी /7 वी च्या परीक्षा रद्द झाल्याने जणू करियर चं वाटोळं होईल कि काय या भितीने आयांच्या तोंडचं पाणी पळालंय. 31 तारखेला मी गेलोच म्हणून समजा असं करोना वायरस यांच्या कानात सांगून गेल्याच्या आविर्भावात या आया शाळांनी एप्रिलमध्ये परीक्षा घेऊन टाकाव्यात असं सुचवतायत. कित्येकांनी शाळेतून एक्झाम कॅन्सलेशन चा निरोप आपल्या अदरवाईज टेक सॅव्ही मुलांपासून लपवायचा केविलवाणा प्रयत्न ही करून पाहिला. मुलांना शाळेने एक्झाम पेपर्स ऑनलाईन द्यावेत पण एक्झाम घ्यावी ही देखिल कळकळीची काही ' जागरूक ' पालकांची विनंती आहे.
या करोनापर्वात जागोजागी ज्ञानामृताचे असंख्य झरे फुटले आहेत. आपण शिकली सवरलेली माणसं सत्य असत्य न पडताळता येईल ते ज्ञानामृत प्राशन करून दुसर्याकडे त्वरित पिटाळतो. रसायन काय,  फवारणी काय, उपग्रहातून वायुगळती काय, ओंकार पठणाची लस काय कशाला कशाचा संबंध जोडून वाट्टेल ते पसरवणे सुरू आहे.
या सर्व गदारोळात काही थोर स्वयंघोषीत देशभक्त आपले वैयक्तिक हेवेदावे पोस्ट्स च्या खांद्यावर बंदुक धरून बाहेर काढतायत. बर्याचदा आपल्या देशाबाहेर वास्तव्य न करणे या एकाच कारणाने ते स्वतः ला देशभक्त म्हणवत असतात. ' पैसा मिळतो म्हणून परदेशात पळालात आता आपत्ती आल्यावर देश आठवला ' या टाईपच्या पोस्ट्स ही त्यांची बंदूक असते आणि हिरीरीने  त्या फाॅरवर्ड करण्यात ते धन्यता मानतात. आपण घराच्या 4 भिंतीत सुरक्षित आहोत म्हणून अधेमधे अडकलेल्यांवर हसणे याने आपलीच मनोवृत्ती उघड होते.
करोनाचं वादळ जात, पात, धर्म, वंश, देश, प्रांत काहीही न जुमानता धडकत असताना आपण मात्र अजूनही आपापल्या चाली रिती ,सवयी ,संस्कार च या संकटावर मात करतील असे ढोल बडवत आहोत. मात करणारे आपली रोगप्रतिकारशक्ती आपल्या धर्माबाबत चा अहंकार नाही.
एकीकडे आपणच हातावर शिक्का मारलेला असून देखिल मोकाट फिरतो आहोत तर दुसरीकडे आपल्या मोलकरीणीला साध्या सर्दी चे निमित्त करून घरात घेणं टाळतो आहोत. कुठे स्वयंशिस्तीने उरुस, जत्रा बंद करणारे आहेत तर कुठे रस्ते कसे मोकळे आहेत हे बघत फिरणारे इम्युनिटी चे पुतळे आहेत. एकीकडे परदेशातून आलेले आणि सेल्फ क्वारंटाईन करून घेतलेले सुरेश प्रभू आहेत आणि दुसरीकडे ट्रॅवलहिस्ट्री लपवणारे महाभाग आहेत.
एकूणच मजेशीर हालचाली आणि मतमतांतरं आजूबाजूला दिसतात. पोस्ट करणारी आपलीच आहेत,  त्यांच्या सोशल मीडिया वावरामधून त्यांना जज करायचा इथे हेतू नाहिए , सोशल मीडिया वरील पोस्ट्स मुळे परस्पर संबंध बिघडू न देण्याचा सूज्ञपणा आपल्या सर्वांना आहेच तरीही या गोष्टी आपल्यातल्या माणूसपणाचं खरंखुरं दर्शन जगाला घडवतात याची जाणीव कुठेतरी असावी एवढ्यासाठी  हा लेखन प्रपंच.
- मीनल देवस्थळे





Saturday, March 14, 2020

Rhymeorreason

Home they brought her warrior dead:
         She nor swoon'd nor utter'd cry:
All her maidens, watching, said,
         "She must weep or she will die."

Then they praised him, soft and low,
         Call'd him worthy to be loved,
Truest friend and noblest foe;
         Yet she neither spoke nor moved.

Stole a maiden from her place,
         Lightly to the warrior stepped,
Took the face-cloth from the face;
         Yet she neither moved nor wept.

Rose a nurse of ninety years,
         Set his child upon her knee—
Like summer tempest came her tears—
         "Sweet my child, I live for thee."

These are lines from the ever gripping poem by Alfred, Lord Tennyson.
These lines have this unique haunting effect on me whenever I come across them. Even then as a 7th grader, as the English teacher first recited and then unfolded the poem to the class, it tore the heart apart. The plot, the words, the flow and the emotions have a lasting impact upon us from start till the end. 
This is the story of a woman who has lost her husband in the battlefield. The martyr is brought home to the widow and the family. The widow on hearing the news is in a state of shock and although the body is right in front of her eyes, she refuses to believe her loss. All kith and kin have arrived to pay their last respects to the deceased. The crowd struck with grief is mourning. But the widow is unfazed and still. The family is now worried for her. They rightly believe that if the woman does not grieve, the pain she refuses to let out will eventually kill her. They try in all possible ways to help her vent out her feelings. 
They speak highly of her husband's ways and deeds so that her tears find their way out. But she is unmoved. Another young lady knowing that the widow is in a state of disbelief pulls out the veil from the face of the deceased. She hopes to bring her friend to come to terms with reality by doing so. Everyone is aghast to see that she does not budge. 
Finally rises an elderly nurse, her age depicting her bounty of experiences. Her simple gesture does the needful and the widow cannot hold any longer. The nurse places the warrior's child in the widow's lap. The touch of her flesh and blood triggers her to get back to her senses. Her will to succumb to her irreplaceable loss is shattered when she realizes she has to live for the sake of their child. The nurse knew this very well and thus subtly coaxed the widow to gather all her courage and look beyond her personal loss for the child's future.
The first thought that gripped my mind as I was introduced to the poem was the selfless sacrifice of the soldiers and officers of our motherland. I remember very vividly that our teacher compared the plot to similar acts of valor displayed by our brave men in uniform. With no prior acquaintances of any kind in the defense services we 12 year olds back then were clueless about the lifestyle and challenges faced by them. This poem came across as a big blow on the face and jolted me and my classmates into the world of our unsung heroes.