Friday, April 26, 2024

ads for helpers

काही पोस्ट ' आखूड शिंगी बहू दुधी' ही म्हण सार्थ ठरवत आहेत. 

मुळात कुणी ही आपले समजून दुसर्‍याच्या घरी उत्पन्नाचे साधन म्हणून राहून काम करील ही अपेक्षाच अवास्तव आहे. 
राहील, काम ही करील पण आपले समजून....? 

प्रत्येक मदतनीसाला आपलं घर आहे, संसार आहे, अडचणी आहेत, 
विनापाश व्यक्ति मिळणे, इतके सोपे असते? 
पूर्णपणे अनोळखी व्यक्तिवर आपण आपला पेशंट, घर, कागदपत्र, सामानसुमान सोडून निर्धास्त राहू शकतो? 
साधं केर, फरशी करणारी मदतनीस आपण कोणा ओळखीच्यांकडे काम करते हे पारखून कामावर घेतो, आणि पूर्ण वेळ घर ज्याच्या हवाली करणार अशी व्यक्ति फेसबुकवर शोधू शकतो?

घरातल्या व्यक्ति आपल्याच पेशंट ची दुखणी वर्षानुवर्ष काढून कंटाळून जातात, आणि परक्या व्यक्तिने दीर्घ काळ ते न कंटाळता करावे आणि अशी माणसे या ग्रुपवर जाहिरात करून मिळतील हा भाबडा (कि अति आगाऊ) समज आपण करून घेतो आहोत का? 

रीतसर bureau चा स्टाफ ठेवला तर निदान तो reliable असतो, background check होऊन आलेला असतो, खरंतर एका मर्यादेबाहेर ते ही कोणाची खात्री देऊ शकत नाहीत. 

आणि सेवाभाव आपल्याला तरी खरंच असतो का हो कि तो आपण परक्यामधे असण्याची अपेक्षा करावी? खरे सेवावृत्ती असणारे विरळाच, ते शिवधनुष्य पेलणारे त्याचे मोल पैशात करत नाहीत.

पोस्ट चा सूर हेटाळणीचा लागला आहे त्या बद्दल अगदी मनापासून माफी मागते, शेवटी अडला जीव सर्व प्रकारे विविध options शोधत असतो, मी ही त्यातून गेल्यामुळे अनुभव आहे, अजूनही घेते आहे, 

समोर हजर असेल मदतनीस तर मला सुट्टी नाहितर ते काम आपले, जसं घर आपलं, त्याची साफसफाई ही जबाबदारी आपली, आली तर मदतनीस करतेच पण तिने सुट्टी न घेता ते करतच रहावं ही अपेक्षा जशी अवास्तव तसंच पेशंट आपला, त्यांचं करणं हे आपलं काम, दुसरा कितीही मोल दिले तरी ते आपले समजून करेल याची आशा ही नाही आणि अपेक्षा ही नाही.

माझ्या करण्यात मला सेवाभाव नाही फक्त कर्तव्यपूर्ती दिसते तर बाहेरची सेवाभाव का म्हणून आणि कुठून आणेल? ती वरचेवर कंटाळून सुट्टीवर गेल्यावर मला तिचा राग येत नाही, तिला मी इतक्या सुट्ट्या का घेतेस विचारत नाही, मी गपगुमान माझ्या पेशंट च्या कामाला हजर राहते.

अगदी मान्य आहे, परदेशस्थ किंवा काम सोडून कुणाला हे जमणे अशक्य आहे आणि म्हणूनच ही अशी शोधाशोध करतात सगळं ठाऊक आहे, पण अशा वेळेस एक घर एक दोन जेष्ठ परक्याच्या हवाली करण्यापेक्षा तेवढ्याच मोबदल्यात वृद्धनिवासात व्यवस्था करणे जास्त योग्य वाटते.

response to a post

#मनोगत 
मागच्या काही दिवसांमध्ये ग्रुप वर दोन पोस्ट वाचनात आल्या त्यातील एक होती डॉक्टर देवधरांची फॅमिली डॉक्टर नी काय सल्ला द्यावा याबद्दलची आणि दुसरी होती केअरटेकर बाबतीतले विचित्र अनुभव.
 
या दोन्ही पोस्टच्या संदर्भात माझे काही मनोगत मला मांडावेसे वाटते.
 
डॉक्टर देवधरांच्या पोस्ट मध्ये आलेल्या कमेंट्स वाचल्यावर असे लक्षात आले की अनेकांचे असे मत आहे की प्रत्येकाला राईट टू दिग्निटी असावा. 
लोळा गोळा होऊन दुसऱ्यांच्या वर अवलंबून जगणं लांबवण्यापेक्षा तो टप्पा यायच्या आधी प्रत्येकाने लिविंग विल करून आपल्याला कोणत्या टप्प्यावर उपचार नाकारायचे आहेत याबद्दल अगोदरच निर्णय घेऊन ठेवण्याकडे अनेकांची मतं दिसली.
 
याबद्दल प्रकर्षाने जाणवलेला विचार असा कि हे शक्य आहे फक्त त्यांना ज्यांनी हल्लीच्या काळात लिविंग विल म्हणजे काय याबद्दल विस्तृत माहिती कुठे सोशल मीडियावर किंवा वाचून ऐकून मिळवली आहे आणि जे आत्ता कदाचित ज्येष्ठ नागरिकत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत म्हणजे साठ आणि त्याहून थोडेसे पुढे मागे आणि त्यांच्या पाठोपाठ चे असणारे पन्नाशी च्या टप्प्यावर असणारे आमच्यासारखे.
 
माझ्या घरातील नात्यातील परिचयातील काही अतिज्येष्ठ मंडळी 85 वय पार करून आयुष्याच्या अंतिम टप्पयावर महिना महिना आयसीयू मध्ये राहून तिथूनच पुढच्या प्रवासाला गेले आहेत. काही टोकाच्या पार्किंन्सस डिमेंशियामुळे देवधर डॉक्टरांच्या केस प्रमाणेच जन्म मृत्यूच्या सीमारेषेवर आहेत. 
काही दोन दोन वर्ष अंथरूणात होती पण भानावर होती, काहींना आपण कुठे आहोत त्याचेही भान नाही, यातले काहींना अगदी शेवटच्या काही दिवसांमधे अन्न पाणी सोडून कंटाळून गेल्यावर मृत्यूचे वरदान मिळाले.
  
काही ज्येष्ठ असेही आहेत जे व्यवस्थित भानावर आहेत ते अनेक वर्ष परावलंबी जीवन देखील थाटामाटात जगत आहेत. केअर टेकर ना आपल्या इशाऱ्यावर नाचवत घरा दारावर हक्क गाजवत आहेत, त्यांना कुठेही अशा प्रकारच्या जगण्याचा कंटाळा आलेला नाही. 

अशा अतिज्येष्ठ व्यक्तींना लिविंग विल म्हणजे काय हे अजिबात माहित नाही. ते सोशल मीडियावर नाहीत त्याबद्दल त्यांच्या वाचनात कुठे आलेले नाही ऐकिवात आलेले नाही व पुसटसे कुठे वाचलं ऐकलं असेल पण त्याबाबत खोलवर जाऊन त्याची माहिती काढण्याचा त्यांच्यापैकी कोणीही प्रयत्न केलेला नाही.  

बाहेरून जर कोणी त्यांना किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींनी त्यांना याबाबत माहिती पुरवण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यातून निराळाच अर्थ बोध ही अतिज्येष्ठ मंडळी घेऊ शकतात आणि घेतात असे आढळले आहे. 
तू मला असं असं वाचून दाखवलं याचा अर्थ तुला मी ते करायला हवं आहे याचा अर्थ तू मला तसं करण्याबद्दल सुचवू पाहत होतीस असे अर्थ निघालेले आहेत त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याच्या भया पोटी तो विषय तिथेच थांबवणे श्रेयस कर ठरते. 
 
केअरटेकरच्या अनुभवाबद्दल लिहू तितकं कमीच आहे. मागे मी एकदा त्यावर एक लेख लिहिला होता. आपल्या ग्रुप वर अनेक वेळा केरटेकर हवेत याबद्दल जाहिराती येत असतात. त्या येण्याबद्दल काही आक्षेप नसतोच पण त्या ज्या प्रकारे आखूडशिंगी बहु दुधी टाईप अपेक्षा असतात त्यावर मी तो लेख लिहिलेला होता. 
 
ग्रुप वर आत्ताच आलेल्या केअरटेकर च्या अनुभवाच्या अनुषंगाने मला असं वाटतं की ब्युरो काय किंवा हे केअरटेकर मदतनीस काय आपल्या एका असमर्थतेचा व्यवस्थित फायदा उठवत असतात. ती असमर्थता म्हणजे आपल्या पेशंटची सतत 24 तास उठ बस करणं, बडदास्त ठेवणं न जमणं. 
 
ही असमर्थता विविध कारणांमुळे आलेली असते. नोकरी व्यवसायानिमित्त कुटुंबीयांनी दिवस दिवस घराबाहेर असणं. घरात असतील तरीही इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये पेशंटला सगळ्या गोष्टी जागच्या जागी आणि हातात देणे खरोखर अशक्य होऊन बसते. 
 कधी त्या पेशंटशी आपले इक्वेशन हे सुरुवातीपासूनच बिनसलेले असते त्यात त्याला परावलंबित्व आल्यावर कधी त्यालाही आपल्याकडून करून घ्यायला संकोच वाटत असतो कधी आपलेही मन आणि शरीर अशा अशावेळी असहकार पुकारते. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापैकी कारण कोणतेही असो दिवसाला पाचशे ते सातशे आठशे हा रेट देऊन महिन्याचे पंधरा-वीस हजार त्या पेशंट वर खर्च करण्याची तुमची तयारी असते म्हणून आपण त्या वाटेला जातो. 
 आता गरज तिथे पुरवठा या न्यायाने आपली असमर्थता कुणाचे तरी उपजीविकेचे साधन हे होणारच.  
हा साधा पैशाचा व्यवहार आहे, दहा ते बारा तासांसाठी आपण त्या मदतनीसाचा वेळ आणि श्रम भाड्याने घेत आहोत. तिथे जर सेवा भाव शोधायला गेलो तर ती आपली सगळ्यात मोठी चूक ठरते.  
मी माझ्या लेखात मागे म्हटल्याप्रमाणे पेशंटशी आपले नाते जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर आपल्यामध्ये देखील सेवाभाव क्वचितच आढळतो.  

अनेकांनी कमेंट्स मध्ये म्हटल्याप्रमाणे दिलेल्या पैशाचे भान मदतनीसाला असावे का तर हो नक्कीच असावे. पहिल्या दिवशीच त्याला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांची व्यवस्थित माहिती देता आली तर उत्तम. पहिलाच दिवस आहे जाऊ दे होईल हळूहळू सवय याचा बऱ्याचदा गैरफायदा घेतला जातो. 
 
ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अजिबातच चालढकल केलेली किंवा कमी जास्त केलेले चालणार नाही पेशंटच्या दृष्टीने ते योग्य ठरणार नाही त्या गोष्टींचा खुलासा पहिल्या दिवशीच करायला हवा. 

पेशंटकडे घरातील इतर कामवाल्या बायकांची चौकशी करू नये, घरातल्या इतर माणसांबद्दल त्यांच्या कामधंद्याबद्दल त्यांच्या मुलाबाळांबद्दल चौकशी करू नये, हे बेसिक नियम पहिल्याच दिवशी क्लिअर करावेत.
पेशंट ने देखील घरातील कोणत्याही खाजगी बाबी केअरटेकर मदतनिसाकडे बोलून दाखवू नयेत.
पेशंटच्या आणि तुमच्या नात्यांमध्ये कितीही दरी असेल तरी ती दरी कधी मदतनिसांसमोर उघड होणार नाहीत याची खबरदारी आपणच घ्यायला हवी.  
दहा-बारा तास आपल्या घरात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मदतनिसांना नात्यांमधले पॉलिटिक्स समजायला तसाही वेळ लागत नाही.  
तसा आपलाही पेशंट आपल्याला व्यवस्थित माहित असतो. मूळ स्वभाव त्यात वयापरत्वे आणि आजारपणामुळे त्यात झालेली भर यामध्ये मदतनीसाचे माणूस पण जपणे ही या सगळ्या कसरती मधली अत्यंत कठीण गोष्ट आहे.

helper questionnaire

मदतनीस किंवा ब्युरो ही सेवा घेण्याआधी काही प्रश्नावली किंवा चाचणी यादी तयार करता येईल का याबाबत एक पोस्ट वाचनात आली.
 माझ्या अनुभवानुसार ती यादी किंवा मुद्दे मी या पोस्टमध्ये मांडते. 
प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार त्यात भर घालावी किंवा बदल करावेत.

मदतनीसांकडून अपेक्षे बाबत मुद्दे: 

1) पेशंट  स्वतःचे काय  आणि किती करू शकतो याची माहिती देणे

 2) पेशंट  कोणत्या गोष्टी स्वतः करू शकत नाही

 3) पेशंटला डॉक्टरांनी   कोणती ऍक्टिव्हिटी आवर्जून करायला सांगितली आहे
 
4) पेशंटला डॉक्टरांनी काय करायला मनाई केलेली आहे  

5) मदतनीसानी पेशंटची करायची कामे 

6) मदतनिसांनी घरातल्या कामांमधली पेशंटशी निगडित करायची कामे 

7) कामावर येण्याची वेळ, कामावरून सुटण्याची वेळ परस्पर संमतीने ठरवणे 

8) मदतनिसाने पेशंट कडे खालील चौकशा करू नयेत :
घर, त्यातील माणसे, त्यांची कामे, त्यांची मुले बाळे 

9) मदतनीसाने पेशंटची बोलायची इच्छा आहे किंवा नाही हे बघून मग पुढील संभाषण वाढवायचे की नाही हे ठरवावे 

10) मदतनिसाला जर फोन आला तर पेशंटचे काम चालू असताना तो घेणे टाळावे

11)  पेशंटचे काम चालू नसताना जर फोन आला तर पेशंटची पूर्व परवानगी घेणे आणि बोलण्यासाठी पाच दहा मिनिटांची रजा घेणे
 
12) मदतनीसाला जर फोन करायचा असेल तर पेशंटची  कामाची वेळ नाही अशी वेळ बघून पेशंटची पूर्वपरवानगी घेऊन किती मिनिटे बोलू शकते याचा अंदाज घेऊन पंधरा मिनिटांची सुट्टी घेणे 

13) पेशंटला हवे असेल तेव्हाच टीव्ही, रेडिओ किंवा इतर करमणुकीची साधने सुरू केली जातील अन्यथा इतर वेळी ती बंद राहतील त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी भुणभण करू नये 

14) घरातील इतर कामगार वर्ग किंवा मदतनीस यांच्या वाट्याला जाऊ नये 
ते करत असलेल्या कामांचा क्वालिटी कंट्रोल करायला जाऊ नये  
त्याबाबतीत पेशंटच्या डोक्याशी कटकट करू नये 
तिने अमुक अमुक केलंच नाही, तिने आज हे झाडलंच नाही 
ही भांडी बघा अशीच राहिली आहेत यातले काहीही पेशंटला किंवा घरातल्यांना सांगायला येऊ नये
 घरातल्या कामवाल्या बाईच्या हलगर्जीपणाचा बोजा तुमच्यावर पडतोय असे वाटत असेल  तर कामवाल्या बाईशी डायरेक्टली डील करायला सांगावे.

पेशंट आणि परिवाराने पाळायच्या काही गोष्टी: 

1) मदतनीस माणूस आहे त्याला माणसाच्या गरजा आहेत.

 2) योग्य वेळी जेवणाची सुट्टी, त्यानंतर पेशंट ची वेळ सांभाळून पंधरा-वीस मिनिटे विश्रांती, अधेमधे दिवसातून एखादा आलेला फोन, एक दोन केलेले फोन हे मान्य असायला हवे.  

3) आपल्या पेशंटच्या स्वभावाचे आपल्याला व्यवस्थित भान हवे, त्याबाबत स्वीकृती हवी
 दरवेळी मदतनीसच चुकीचे असतील आपला पेशंटही चुकू शकतो ही शक्यता गृहीत धरायला हवी आणि त्यानुसारच मदतनीसाला किंवा पेशंटला दोघांनाही सौम्य प्रकारे समजावणे ही घरातल्यांची जबाबदारी असायला हवी. 

4) मदतनीसाला घरातली जादा कामे सांगताना ती फक्त आणि फक्त पेशंटशी निगडित असतील, त्याच्या स्वच्छतेच्या प्राथमिक गरजेच्या संबंधित असतील इतपतच सांगावी बाकी कोणासाठीही घरकाम करायला मदतनीस बांधील नाही हे पक्के लक्षात ठेवावे. 

5) मदतनीसाला ही सणवार आहेत, घरदार आहे, सणावारी त्यालाही सुट्टी लागणार, ती आनंदाने द्यावी सणवार असल्यामुळे त्यावेळी बदली मदतनीस मिळणार नाही याची पुरेपूर तयारी ठेवावी.

Wednesday, May 6, 2020

Forever host

परदेशात राहणारे आप्त या जमाती चे मला प्रचंड कौतुक आहे. कौतुक अश्याकरता नाही कि ते आपल्यापेक्षा संपन्न, स्वच्छ आणि सुलभ देशात राहतात, याचं कि तिकडे स्थायिक झाल्यामुळे त्यांना कायमचे " यजमानपद" किंवा " forever host " हे बिरूद चिकटलेले  असते. वरवर गोंडस भासणारे पण कायमचे झाल्यावर कटकटी चे  असे हे बिरूद. 
#ForeverHost


आपण परदेशात टूरिस्ट म्हणून जायचं ठरवताना सगळ्यात पहिले काय बघतो, " अरे अमुक अमुक या स्टेट मध्ये आहे, बर झालं" , " तिकडे तमुक तमुक आहे , काळजीच नको," हो कि नाही ? या बिचार्या फोरेवर होस्ट ना कायमच  उचक्या लागत असतील इतके  आपण भारतीय त्यांच्या कडे जायच्या प्लान्स ने त्यांच्या आठवणी काढत असतो. खासकरून मे महिना, दिवाळी, या टिपिकल भारतीय सुट्ट्या आल्या कि तर हमखास.

 नाताळच्या सुट्टीत तीच मंडळी इकडे येतात त्यामुळे तेवढीच काय ती त्यांना सूट. नाही तर कोणी न कोणी भारतीय कनेक्शन यांना कायमच गृहीत धरत असावं. अगदी सासूच्या मैत्रिणीच्या बहिणी पासून ते मेव्हण्याच्या भाचीच्या मैत्रिणी पर्यंत कोणीही यांना आपल्या येण्याची वार्ता कळवत असत. अगदी तंबू ठोकून राहायला येण्यापासून ते एक दिवसाचा स्टोप ओवर असो किंवा नुसती सौजन्य भेट असो या फोरेवर होस्ट ना कायमच एक प्रकारे डोक्यावर टांगती तलवार असेल. बर, ओळख वरवरची असो , त्यांचे काही प्रोग्राम्स  ठरलेले असो , त्यांना एखादा वीकेंड काहीही न करता नुसते लोळायचे असो, परदेशात स्थायिक आहेत म्हटल्यावर, त्यांनी भारतीय टूररिस्ट ना  अटेंड करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्यासारखी अपेक्षा आपण ठेवतो. 

एकदा पाहुणे आलेत म्हटल्यावर कोणत्या गोष्टी चुकत नाहीत ? आणि पहिल्यांदाच आलेत म्हटल्यावर तर अत्यंत प्रेमाने काही गोष्टी नव्हे लाड जी  हि मंडळी करतात त्याला तोड नाही. मुळात मनात जागा म्हणून घरात जागा करणे, एरपोर्ट पिकप, स्पेशल मेन्यू प्लानिंग, साईट सीइंग शेड्युल बनवून देणे, तेथील कल्चर, पदार्थ, खरेदी  सकट सगळ्या खासियातींचा आपल्याला आस्वाद घेता यावा म्हणून धडपडणे, आपल्या व्यस्त शेड्युल मधून आपल्याकरता वेळ काढणे, मुलांच्या विविध उपक्रमांमधून आपलं हवं नको बघणे. 

बर, येणारे काही आपण एकमेव नसतो. आपल्या आधी अनेकजण पाहुणचार घेऊन गेलेली असतात, नंतर हि ओघ सुरु राहणारच असतो. अगदी आपणच काही लाडके नसतो, इतरही त्यांचीच जोडलेली जीवाभावाची माणसे असतात तरी देखील हे बिरूद मिरवत आपली घरे, मने, वेळ, आपल्यासाठी सदैव खुली ठेवणारी हि मंडळी असतात. अगदी यांच्या आणि आपल्या  आधीच्या दोन पिढ्यांनी देखील शहरात घरे केल्यावर गावाकडच्या पाहुण्यांचं आगत स्वागत करण्यातच हयात घालवलेली असते सगळं सगळं काबुल असलं तरी म्हणून याचं योगदान किंचितही फिकं पडत नाही. उलट भयंकर तारेवरची कसरत आहे हि. या सर्वांबद्दल एकच भावना " तेथे कर माझे जुळती " 

माझ्या आजवरच्या उण्या पुर्या दोन परदेशवार्या ज्यांच्या जीवावर, घरावर, पाहुणचारावर पार पडल्या अश्या याच जमातीतील काही जिवलगांना tag करतेय. 
- मीनल 


Sunday, April 12, 2020

Gulab gang

जुही चावला ही अभिनेत्री म्हणजे अस्सल 24 कॅरेट सोनं. आजवर तिच्या निरागस चेहर्यानं, अवखळ हसण्यानं आणि अचूक काॅमेडी टायमिंग नं आपल्या ह्रदयावर अधिराज्य गाजवलं आहे. गुलाब गॅन्ग या चित्रपटात तिने तिच्या कारकिर्दीतील पहिल्या वहिल्या खलनायिकी भूमिकेला अचाट ताकदीने साकारून पुनश्च आपल्या क्षमतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
या भूमिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठे  ही उदात्तीकरण न करता, कुठलीही सहानुभूतीदर्शक पार्श्वभूमी न चिकटवता सुमित्रा देवी हे खलनायिकी पात्र लिहिलं गेलं आहे. आपल्या प्रत्येकात दडलेल्या वास्तववादी खलप्रवृत्ती च्या विविध छटा या भूमिकेत आहेत. ही खलनायिका परिस्थिती ने गांजलेली नाही कि अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली पीडिता नाही. सुमित्रा देवी हे टोकाचं स्वार्थी, मतलबी आणि प्रचंड महत्वाकांक्षी प्रकरण आहे. तिला शोषितांचे चे प्रश्न,अडचणी काही ही जाणून घ्यायचे नाहिये. तिला काहीही विचलित करत नाही,  ना रेप, ना खून, ना छळ. तिला दिसते फक्त संधी.
जुही चावला ने सुमित्रा देवी उभी करताना कुठल्याही भडक वेशभूषेचा आधार न घेता केवळ चेहर्यातून विविध भावछटा साकारत ही भूमिका अक्षरशः जिवंत केली आहे. 

Wednesday, April 1, 2020

MainBhiDirector

#MainBhiDirector
#Cinemagully
अमेरिका स्थित पेडियाट्रिशियन नादिया हाशमी यांचं हे दुसरं बेस्ट सेलर नाॅवेल. यातील नायिका फरीबा चं बालपण आईविना गेलं होतं. त्यातील कटू आठवणी मागे सोडून प्राक्तन म्हणून फरीबा लग्न बंधन स्वीकारते. एकूणच आयुष्याकडून फार अपेक्षा नसताना तिला नवर्यामधे मित्र गवसतो. आपल्या दोन मुलांना वाढवत शिक्षिका म्हणून काम करत तिचा सुखाचा संसार चालू असतो. तालीबानी राजवट उदयास येते आणि तिच्या संसाराला दृष्ट लागते. नवरा गमावून बसलेल्या फरीबा ला लेकरांना घेऊन जिवाच्या आकांताने पळ काढावा लागतो. इथून पुढची गोष्ट म्हणजे एका असहाय आईने लेकरांसकट लंडन स्थित बहिणी कडे पोहोचण्यासाठी केलेला खडतर प्रवास. या प्रवासात तिला आलेला माणुसकी चा प्रत्यय, वाट्याला आलेलं रेफ्यूजी चं जिणं, एका देशांतून दुसर्या देशात मजल दर मजल करत  केलेलं मार्गक्रमण सगळं सगळं कल्पनेपलीकडचे आहे.
प्रवासाच्या एका टप्प्यावर थोरल्या मुलाशी ताटातूट होणं तिच्या नशिबी येतं. अकाली प्रौढ झालेला हा मुलगा आपल्या आपलं अल्पजीवी रम्य बालपण आठवत संकटांना कसं तोंड देतो याचं अचंबित करणारे चित्रण पुस्तकात आहे.
यातील दोन प्रमुख व्यक्तीरेखांकरिता दोन नावं ठळकपणे डोळ्यासमोर उभी राहतात.
फरीबा : तब्बू
थोरला मुलगा सलीम: ह्रितिक/ आयुष्मान

Monday, March 30, 2020

Wosubahkabhitoayegi

वो सुबह कभी तो आएगी ......

जब समाचार का पहला शब्द करोना न हो
जब बाहर निकलने से पहले मास्क न ढूंढना पड़े
किसी भी ठेलें पर खाना फिर स नसीब हो
यहां वहां हाथ लगने से ब्लड प्रेशर ना बढ़ता रहे

वो सुबह कभी तो आयेगी .......

जब वर्क फ्राॅम होम के चक्कर से मुक्ति मिलें
जब राशन न मिलनें के डर से रोज ब्रेड लाना पडे
जब 8 कमरों में से आज कौन से कमरों का झाडू पोछा करूँ
ये सोचते सोचते कामवाली बाईंयो की बेकार की गपशप सुनाई दे

वो सुबह कभी तो आयेगी .......

सभी परीक्षार्थी के पास अपना अपना टाइम टेबल बराबर हो
कामयाबी चूमने की ज़िद कुछ कर गुजरने का जुनून सबमें दोबारा जाग उठे
होस्टल फिर स खुलें, मेस का वहीं बोरिंग खाना नसीब तो हो
रोज़ी रोटी छोड़ टॅन्करों में लोगों की भीड़ मे घुसकर गाँव न जाना पड़े

वो सुबह कभी तो आयेगी ........

जब बिना परीक्षा के ऊंची कक्षा में गए बच्चे छुट्टीयोंमें घर पर कैद न हो
जब अकेले रहते घूमते बुजुर्ग अपने मित्र परिवार में फिर से घुल मिल सकें
तंदुरुस्ती और मनचाहे फिगर के चहेते पूरी जोश से अपने वर्कआऊट कर पाएं
जब छुट्टी पे आए मेहमान अपने परिवार और कर्मभूमि में दोबारा लौट सकें

वो सुबह आएगी जरूर ........